दिवाळी अंक २०२६ : कॉक्रोचचा करंट!

राजा तर चक्रावलाय, त्याचे बगलबच्चेही भांबावलेत; वेगवेगळे डाव टाकले जाताहेत...
दिवाळी अंक २०२६ : कॉक्रोचचा करंट!
दिवाळी अंक २०२६ : कॉक्रोचचा करंट!
Published on: 

दीपक परब

राजा तर चक्रावलाय
त्याचे बगलबच्चेही भांबावलेत,
वेगवेगळे डाव टाकले जाताहेत
काय करावं तेच कळेना झालंय
साला, एक कॉक्रोचने बना दिया
राजसत्ताको निकम्मा...

ईडी, सीबीआय, इसी
सारे बगलेत मारून
विरोधकांना नाक घासायला लावून
प्रसंगी पदरात पाडून पवित्रही केलंय पण,
साला, एक कॉक्रोचने बना दिया
राजसत्ताको निकम्मा...

आमचा वारू चौफेर उधळत होता
जे हवंय ते सहज साध्य होत होतं
दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए,
असं सारं कसं मनासारखं घडत होतं
पण, साला, एक कॉक्रोचने बना दिया
राजसत्ताको निकम्मा...

आपण शेण खाल्लंय हे
हळूहळू साऱ्यांनाच कळलंय
आता पुढे करायचं काय?
या प्रश्नाने डोकं भणभणलंय त्यातच
साला, एक कॉक्रोचने बना दिया
राजसत्ताको निकम्मा...

आता लवकरच होणार अनभिषिक्त सम्राट
कुणीच अडवू शकणार नाही आपली वाट
असा सारा माहोल जमवला
अन्, एक ग्यानू आडवा आला
त्याने केला मोठा गफला अन्..
साला, एक कॉक्रोचने बना दिया
राजसत्ताको निकम्मा...