गारेगार आंबा

आंब्याचे दिवस आहेत, तर आंब्याचं झटपट होणारं आइस्क्रीम करूया. साहित्य : दोन पिकलेले आंबे, दीड कप दूध, फ्रीजमधलं बर्फ तयार करायचं भांडं, एक मीडियम प्लास्टिक डबा.
गारेगार आंबा
नवशक्ति अक्षररंग
Published on

आंब्याचे दिवस आहेत, तर आंब्याचं झटपट होणारं आइस्क्रीम करूया.

साहित्य : दोन पिकलेले आंबे, दीड कप दूध, फ्रीजमधलं बर्फ तयार करायचं भांडं, एक मीडियम प्लास्टिक डबा.

कृती : तुम्हाला आंबे कापता येत असतील तर ठीक आहे. नाहीतर आईकडून कापून घ्या. ते डब्यात भरून फ्रिजरमध्ये ठेवा. फ्रिजरमध्ये बर्फ करण्याच्या भांड्यात पाण्याऐवजी दूध टाका. त्याचा बर्फ तयार झाला की आंब्याचे तुकडे जे बर्फाप्रमाणे कडक झाले असतील ते काढून थोडे रूम टेंप्रेरेचरवर आले की मिक्सरच्या भांड्यात फिरवून घ्या आणि ते वाटीत घेऊन सगळ्यांसोबत खा किंवा मिश्रण पातळ वाटत असेल तर थोडा वेळ पुन्हा फ्रिजरमध्ये ठेवा आणि तासाभराने खा. ही रेसिपी वाचून नक्कीच तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल. होना? चला, मग लागा मँगो आइस्क्रीमच्या तयारीला आणि सर्वांची वाहवा मिळवा... yesss आणि हा लेख, रेसिपी शेअर करा… शेअरिंग इज always Caring!

logo
marathi.freepressjournal.in