छापील पुस्तकापासून माणूस दूर जाईल का?

पुस्तक हातात घेऊन वाचण्याची सवय कमी होत आहे, हे वास्तव नाकारता येणार नाही. मात्र इलेक्ट्रॉनिक वाचन वाढते आहे म्हणून छापील पुस्तकांचा अंत होईल, असे मानणे घाईचे ठरेल. कारण पुस्तक हे केवळ माहितीचे साधन नसून माणसाच्या स्मृती, भावना आणि संस्कृतीचा भाग आहे.
छापील पुस्तकापासून माणूस दूर जाईल का?
'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

समाजचिंतन

जगदीश काबरे

पुस्तक हातात घेऊन वाचण्याची सवय कमी होत आहे, हे वास्तव नाकारता येणार नाही. मात्र इलेक्ट्रॉनिक वाचन वाढते आहे म्हणून छापील पुस्तकांचा अंत होईल, असे मानणे घाईचे ठरेल. कारण पुस्तक हे केवळ माहितीचे साधन नसून माणसाच्या स्मृती, भावना आणि संस्कृतीचा भाग आहे.

किंडलसारख्या वाचन अँपचा, भ्रमणध्वनीचा, संगणकाचा आणि विविध प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक पुस्तकांचा वाढता वापर पाहता माणसाच्या वाचनाच्या सवयींमध्ये मोठा बदल होत आहे, हे नाकारता येत नाही. पूर्वी पुस्तक वाचण्यासाठी छापील पुस्तक हातात घेणे अपरिहार्य होते; पण आज त्याच पुस्तकाचे इलेक्ट्रॉनिक रूप सहज उपलब्ध होते. एका छोट्याशा भ्रमणध्वनीत किंवा वाचनयंत्रात शेकडो, हजारी पुस्तके साठवता येतात.

प्रवासात, प्रतीक्षेत किंवा घराबाहेर असतानाही वाचन करता येते. अक्षरांचा आकार बदलणे, प्रकाशाची तीव्रता नियंत्रित करणे, शब्दाचा अर्थ तत्काळ शोधणे, पुस्तकातील एखादा उतारा शोधणे आणि वाचन जिये बांबले तिथून पुढे सुरू करणे अशा सुविधा इलेक्ट्रॉनिक वाचनाला अधिक सोयीच्या बनवतात. त्यामुळे पुढील काळात इलेक्ट्रॉनिक वाचनाचे प्रमाण निश्चितच वाहत जाण्याची शक्यता आहे. परंतु इलेक्ट्रॉनिक वाचन वाढले महणजे छापील पुस्तके पूर्णपणे नष्ट होतील, या निष्कर्षावर उडी मारणे घाईचे ठरेल. कारण इतिहासात प्रत्येक नवीन माध्यमाच्या आगमनावेळी जुन्या माध्यमाच्या अंताची भविष्यवाणी करण्यात आली होती; पण तसे काही घडले नाही. जसे की चित्रपट आल्यावर रंगभूमी अपिल असे मानले गेले, दूरदर्शन आल्यावर चित्रपटगृहे बंद पडतील असे वाटले, संगणक आल्यावर कागदाचा अंत होईल असे सांगितले गेले आणि भ्रमणध्वनी आल्यावर दूरध्वनीचे जुने प्रकार नाहीसे होतील असे मानले गेले. प्रत्यक्षात झाले असे की नवीन माध्यमांनी जुन्या माध्यमांचे स्वरूप, वापर आणि सामाजिक स्थान बदलले, त्यांना सर्वस्वी नष्ट केले नाही.

पुस्तकाचाबतही अशीच प्रक्रिया घडण्याची शक्यता अधिक आहे. इलेक्ट्रॉनिक पुस्तक छापील पुस्तकाची जागा काही क्षेत्रांत घोईल, परंतु छापील पुस्तकाचे अस्तित्या त्यामुळे संपेलच असे नाही. या मागील एक महत्त्वाचे कारण म्हणजे पुस्तक हे केवळ माहिती साठविण्याचे साधन नसून ती एक सांस्कृतिक वस्तू आहे. पुस्तकाच्या कागदाचा स्पर्श, त्याचा वास, मुखपृष्ठ, पान उलटण्याची क्रिया, पुस्तकावर केलेल्या खुणा, एखाद्या जुन्या पुस्तकातून मिळणारी आठवणींची अनुभूती आणि स्वतःचा

पुस्तकसंग्रह असणे यांना इलेक्ट्रॉनिक पुस्तके पूर्णपणे पर्याय होऊ शकत नाहीत. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील एखाद्या पुस्तकाला काही विशिष्ट कारणांमुळे भावनिक मूल्य प्राप्त झालेले असते. मग ते पुस्तक केवळ मजकूर राहत नाही; ते एखाद्या काळाची, व्यक्तीची, विचाराची किंवा जीवनानुभवाची स्मृती बनते. त्यामुळे ज्ञानाच्या वापरासाठी इलेक्ट्रॉनिक माध्यम अधिक उपयुक्त ठरले, तरी पुस्तकाच्या सांस्कृतिक आणि भावनिक मूल्यामुळे छापील पुस्तक टिकून राहण्याची शक्यता मोठी आहे.

भ्रमणध्वनीवर वाचताना वाचक सतत इतर सूचनांच्या, संदेशांच्या, चित्रफितींच्या आणि सामाजिक माध्यमांच्या आकर्षणात असतो. त्यामुळे दीर्घकाळ एका विषयावर एकाग्र होऊन वाचण्याची क्षमता कमी होण्याचा धोका आहे. छापील पुस्तक वाचताना पुस्तक आणि वाचक यांच्यामध्ये इतर डिजिटल व्यत्यय तुलनेने कमी असतात. म्हणून गंभीर साहित्य, तत्त्वज्ञान, इतिहास, समाजशास्त्र किंवा विज्ञान यासारखे विषय सखोलपणे वाचण्यासाठी छापील पुस्तकाला अजूनही पर्याय नाही. इलेक्ट्रॉनिक माध्यम वाचन अधिक सुलभ करते; पण सुलभता आणि एकाग्रता या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. पूर्वी एखादे पुस्तक मिळवण्यासाठी ग्रंथालयात जावे लागे किंवा पुस्तक विकत घ्यावे लागे. आज इलेक्ट्रॉनिक माध्यमांमुळे जगातील अनेक ग्रंथ काही क्षणांत उपलब्ध होऊ शकतात. दुर्मिळ पुस्तके, जुन्या आवृत्त्या, संशोधन ग्रंथ आणि विविध भाषांतील डिजिटल साहित्यही विसरतील असे म्हणण्यापेक्षा लोक पुस्तके वाचण्याची पद्धत बदलतील हे विधान जास्त संयुक्तिक ठरेल, त्यामुळे छापील पुस्तकाचा डास काही विशिष्ट क्षेत्रांत अधिक वेगाने होऊ शकतो. संदर्भग्रंथ, शब्दकोश, वर्तमान घडामोडींशी संबंधित साहित्य, शैक्षणिक सामग्री आणि त्वरित शोध घेण्यासाठी लागणारी माहिती यासाठी डिजिटल रूप अधिक सोयीचे आहे. अशा सामग्रीसाठी मोठमोठी पुस्तके जवळ बाळगण्याची अआवश्यकता कमी होईल. परंतु कादंबऱ्या, कविता, आत्मचरित्रे, कलात्मक पुस्तके, संग्रहणीय आवृत्या आणि भेट म्हणून दिली जाणारी पुस्तके यांना छापील पुस्तकांच्या स्वरूपात मिळू शकते. त्यामुळे भौगोलिक अंतर, पुस्तकांची उपलब्धता आणि काही प्रमाणात आर्थिक अडथळे कमी होतात. विशेषतः विद्याभ्यांसाठी आणि संशोधकांसाठी ही क्रांती अत्यंत महत्त्वाची आहे.

याहून महत्त्वाचा बदल माणजे पुढील पिढ्यांसाठी पुस्तक या शब्दाचा अर्थच बदलू शकतो. आज पुस्तक म्हटले की अनेकांच्या मनात कागदाची पाने, मुखपृष्ठ आणि बांधणी असलेली वस्तु येते. भविष्यात एखाद्या तरुणाच्या दृष्टीने पुस्तक महणजे वाचण्यासाठी उपलब्ध असलेली डिजिटल सामग्री असू शकते. जसे आज अनेक तरुणांना पत्र लिहिण्याची जुनी पद्धत अपरिचित आहे, तसेच भविष्यातील काही पिढ्यांना छापील पुस्तक हे मुख्य वाचनमाध्यम वाटणार नाही. परंतु याचा अर्थ ते पुस्तक हातात घेऊन वाचणे विसरतील अअसा होत नाही. महणून लोक पुस्तके वाचणे स्वरूपात मागणी राहू शकते. म्हणजे भविष्यात छापील पुस्तकाचे प्रमाण कमी होईल, पण त्याचे अस्तित्व अधिक निवडक आणि विशिष्ट स्वरूपाचे होण्याची शक्यता आहे.

या बदलाकडे केवळ तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहणेही योग्य नाही. पुस्तक वाचण्याची सवय टिकवणे हा समाजाच्या बौद्धिक आरोग्याचा प्रश्न आहे. माध्यम कोणतेही असो, दीर्घ लेख वाचण्याची, तर्क समजून घेण्याची, विचारांशी असहमती नोंदवण्याची, कल्पनाशक्ती वापरण्याची आणि एखाद्या विषयावर शांतपणे चिंतन करण्याची क्षमता टिकणे अधिक महत्वाचे आहे. भ्रमणध्वनीवर हजारी पुस्तके उपलब्ध असूनही जर माणूस फक्त लहान संदेश, शीर्षके आणि चित्रफिती पाहत राहिला, तर माहितीची उपलब्धता वाहूनही सखोल ज्ञान मिळवण्याची ओढ कमी होऊ शकते, उलट एखादा माणूस इलेक्ट्रॉनिक पुस्तकात तल्लीन होऊन शेकडो पाने वाचत असेल तर त्याचे वाचन छापील पुस्तकाइतकेच अर्थपूर्ण असू शकते. म्हणून भविष्यातील संघर्ष हा छापील पुस्तक आणि इलेक्ट्रॉनिक पुस्तक यांच्यातील नसून सखोल वाचन आणि वरवरच्या माहितीत रममाण होणे यात असणार आहे. खापील पुस्तक कदाचित आजच्या सारखे सर्वत्र दिसणार नाही. पुस्तकांची दुकाने, ग्रंथालये आणि घरातील पुस्तकांचे कपाट वांचे स्वरूपही बदलू शकते. परंतु माणसाला विचार समजून घेण्यासाठी, कल्पना आत्मसात करण्यासाठी आणि स्वतःशी संवाद साधण्यासाठी पुस्तकाची गरज लागणारच आहे, कारण माध्यम बदलले तरी ज्ञानाची आणि चिंतनाची गरज संपत नाही.

त्यामुळे भविष्यात लोक छापील पुस्तके वाचणे विसरून जातील हा अंदाज अतिशयोक्त आहे. अधिक वास्तववादी अंदाज असा वर्तवता येईल की छापील पुस्तक हे वाचनाचे एकमेव प्रमुख माध्यम राहणार नाही; तर इलेक्ट्रॉनिक वाचनाचे प्रमाण वाढेल एवढेच. परंतु छापील पुस्तक पूर्णपणे नाहीसे होणार नाही. भविष्यात दोन्नती माध्यमे परस्परपूरक असतील, ज्यांना वेग, उपलब्धता आणि सोय महत्त्वाची वाटेल ते इलेक्ट्रॉनिक पुस्तकांकडे वळतील, ज्यांना पुस्तकाचा स्पर्श, संग्रह, सौंदर्य, स्मृती आणि एकाग्र वाचनाचा अनुभव महत्वाचा वाटेल ते छापील पुस्तकाकडे परततील. अखेरीस बदलणार आहे तो पुस्तकाचा आकार आणि माध्यम, माणसाची वाचण्याची आणि जाणून घेण्याची मूलभूत गरज नाही. त्यामुळे छापील पुस्तकांपासून वाचक दूर जाईल हा समज गैरसमजच आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये.

लेखक समाजचिंतक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन प्रसारक आहेत.

jetjagdish@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in