

विशेष
सोहम प्रिया
युवा दिनाच्या निमित्ताने तरुणाईच्या ऊर्जेचा आणि स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने राष्ट्राच्या स्वातंत्र्याचा विचार करताना आजची 'जेन झी' पिढी केंद्रस्थानी येते. बदलत्या काळासोबत तिची भाषा, विचार करण्याची पद्धत आणि अपेक्षाही बदलल्या आहेत. मात्र या बदलांच्या केंद्रस्थानी भारताला अधिक सक्षम, समृद्ध आणि प्रगत बनवण्याची आकांक्षा आहे.
हॅलो फ्रेंड्स! ऐकायला जरा चमत्कारिक वाटलं का ? बहुधा, हाय, हॅलो फ्रेंड्स, डुड अशा शब्दांची सवय आता झाली असेल.. कारण गेल्या महिन्याभराचा घटनाक्रम बघता आपण एक सामाजिक स्थित्यंतर अनुभवत आहोत, 'नमस्कार मित्रांनो' ते 'हॅलो फ्रेंड्स' हे त्याच बदलाचं प्रातिनिधिक स्वरूप माणर्ण अगदीच चुकीचं ठरणार नाही. गेल्या महिन्यात दिल्लीत जंतरमंतरवर झालेल्या 'जेन झी' (Gen 2) आंदोलनाचे पडसाद संपूर्ण देशात उमटत आहेत. 'सुरक्षित परीक्षा पद्धती' या अत्यंत महत्त्वाच्या मुझ्यावर सुरू झालेलं हे आंदोलन खरं तर आम्हा 'जेन झो' पिढीचं सामाजिक अस्तित्व ठळकपणे दाखवून देणारं ठरलं हे नक्की. परंतु हे नक्की हक्कांसाठी केलं गेलेलं आंदोलन होतं का, की निव्वळ भावनावेग? कारण अत्यंत योग्य मुद्दधावर सुरू झालेलं आंदोलन हळूहळू काहीसं भरकटत गेलं आणि एक विद्यार्थी, जेन झी महणून जरा दुःख देणारी गोष्ट महणजे या सगळ्याचा शेवट केवळ 'राजीनामा' या राजकीय निर्णयात होऊन, शिक्षण पद्धतीमध्ये, परीक्षा पद्धतीमध्ये अपेक्षित सर्वकष बदल मात्र झालेच नाहीत. परीक्षेचं स्वरूप बदललं, कायदे आणखी कड़क करण्यात आले हे झालंच; तरीही मूल्यमापन पद्धतीवर या चळवळीचा काहीच प्रकाश पडला नाही.
हे आंदोलन सुरू झाल्यानंतर साहजिकच मी एक जेन झी म्हणून बरीच माहिती मिळवताना अनेक गोष्टीची जाणीव व्हायला लागली. विद्यार्थ्यांच्या मंचावर शिक्षण, व्यवस्था याची साधक-बाधक चर्चा न होता काही असामाजिक, देशविरोधी विचारांचा शिरकाव व्हायला लागला, शांतीपूर्ण आंदोलनाला क्रांतीचं स्वरूप देण्याच्या प्रयत्नात हिंसेला काही प्रमाणात प्रोत्साहन मिळालं आणि काही प्रमाणात का होईना पण प्रसिद्धीसाठी हपापलेल्या राजकीय व्यवस्थेने या आंदोलनाचं केव्हा अपहरण केलं याचा पत्ताच लागला नाही. म्हणूनच शिक्षण व्यवस्था या व्यापक विषयावर चर्चा करण्याऐवजी केवळ राजीनामा, कारवाई, आरोप, प्रत्यारोप या असंबंध चतुःसूत्रीमध्ये ही संपूर्ण चळवळ बांधली गेली, खरं तर आंदोलनाला मिळालेला राजकीय रंग हा माझ्या मते दुर्दैवी असला, तरीही या रंगाच्या लोकशाहीच्या पटलावर उमटलेल्या छटा या त्याहून जास्त वेदनादावी होत्या. संसदेच्या अधिवेशनादरम्यान झालेली चर्चा हे याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. शिक्षण सोडून, परीक्षा व्यवस्था सोडून विद्यार्थ्यांना क्रांतिकारी ठरवत ज्या प्रकारे विरोधी बाकांवरील सदस्यांनी मूळ प्रश्नाला फाटा देत नवीन प्रश्न समोर आणले आणि सत्ताधाऱ्यांनी देखील, मुख्य मुद्दा सोयीस्करपणे बाजूला जातो आहे हे बघत आरोपांना प्रतिउत्तर देण्याचं काम केलं, हे चित्र एक विद्यार्थी, मतदार, नागरिक म्हणून आमच्या संपूर्ण पिढीसाठी नक्कीच लज्जास्पद आहे.
मुळात आधी सांगितल्याप्रमाणे मूळ आंदोलनाला क्रांतीचं स्वरूप देताना लागलेलं हिंसक वळण हे तर 'जेन झी'च्या विचारांचं नक्कीच प्रतीक नाही. आंदोलनादरम्यान वापरण्यात आलेली भाषा- मग ती देशाबद्दल असो, पंतप्रधानांबद्दल असो, देशाचं रक्षण करणाऱ्या, कायद्याचं रक्षण करणान्या जवान व पोलिसांबाबत असो अथवा आपलं काम करणाऱ्या कोणा पत्रकाराबद्दल असो-मानसिक वैफल्यतेचं हे बीभत्स प्रदर्शन खूप जास्त क्लेशकारक होतं. जेव्हा एखादी चळवळ इतकी मोठी होते, तेव्हा त्याला वेगळं वळण लागू न देण्याची जबाबदारी ही त्याहून मोठी असते. विज्ञान, संस्कृती, शास्त्र, इतिहास या सर्व क्षेत्रांना जोडून, त्याला आधुनिकतेची जोड देऊन पुढे नेणाऱ्या 'जेन झी' मधील काही अपरिपक्व घटकांना मिळालेली ही प्रसिद्धी नक्कीच चुकीची आहे, आम्हाला क्रांतिकारी महणून रेखाटताना, स्वातंत्र्यसैनिकांसोबत तुलना करताना अनेकांना या गोष्टीचा साफ विसर पडला की, आज भारत स्वतंत्र आहे, कायदा आपल्याला अधिकार देतो, आज हक्कांची लढाई सुद्धा कायद्याने लढता येते, स्वातंत्र्यसंग्राम ही केवळ हक्कांची नाही, तर स्वाभिमानाची, अभिमानाची, अस्मितेची आणि त्यागाची कहाणी आहे. आपल्या देशात आपले कायदे यावेत, आपण आपल्याला हक्क द्यावेत यासाठी झालेला संग्राम म्हणजे स्वातंत्र्याची लढाई आहे; त्याला या आंदोलनासोबत जोडणं हे माणजे ज्योतीने तेजाची आरती करण्यासारखं आहे.
या संपूर्ण कालावधीत, भारताचं भविष्य असणाऱ्या 'जेन झी' ची भारतीय लोकशाही मूल्यं आणि संविधानात नमूद 'स्वातंत्र्याची' ओळख यावर अनेक मतं मांडली गेली, हे मुद्दे चर्चेत येण्याचं प्रमुख कारण महणजे 'संसद मार्च' अर्थात संसदेवरील मोर्चा, एक नागरिक माणून किंवा एक सजग जेन झी माणून माझ्या मते घडलेला हा प्रकार अत्यंत चुकीचा आणि लोकशाही मूल्यांचं पालन न करणारा होता. संसद ही लोकशाहीचं मंदिर आहे. देशाचे मुद्दे जिथे चर्चिले जातात, अशा महत्त्वाच्या ठिकाणावर निघालेल्या या मोनि आंदोलनाया राजकीय लाभ घेणाऱ्यांना आयतं कोलीत दिलं, घडलेल्या प्रकारामुळे आम्ही जेन झी भारताचं भविष्य अशा पद्धतीने घडवणार का? हा एक मोठा प्रश्न सर्वांसमोर पडला, परंतु ही वस्तुस्थिती नाही.
आजचा 'जेन झी' राजकीयदृष्ट्या परिपक्व आहे, सामाजिक भान जपणारा आहे, आपलं कर्तव्य बजावणारा आहे, आपले हक्क जाणणारा आहे, आपल्या हक्कांसाठी व्यवस्थेला प्रश्न विचारणारा आणि प्रसंगी आपल्या समस्या स्वतः सोडवणारा सुद्धा आहे. 'लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांचे लोकांसाठी बनवलेले सरकार' या व्याख्येमध्ये 'लोकांनी आपल्या कर्तव्यांची जाण ठेवून, लोकांची लोकांसाठी त्यांच्या हक्क, आकांक्षा आणि स्वप्नांना पूर्णत्वास नेण्यासाठी-बनवलेली व्यवस्था' असा व्यापक बदल करणारी ही पिढी आहे. स्वातंत्र्याला अधिकार आणि हक्कापुरते मर्यादित न ठेवता, आपल्या कर्तव्यांची मुक्तपणे पूर्तता करण्यासाठीची व्यवस्था माणून पाहण्याची दूरदृष्टी सुद्धा 'जैन झी'कडे आहे. याचमुळे, आम्हा 'जेन झी'ना सामाजिक, राजकीय समज नाही किंवा आम्ही त्याकडे दुर्लक्ष करतो असं नाहीये. या समाजात राहुन व्यवस्था चालवणाऱ्या सर्वांनी हे लक्षात घ्यायला हवं की, अगदी लहान वयातच प्रचंड निर्णयक्षमता असणारी आमची पिढी आहे. कायद्याने न कळत्या वयात स्वतःचं भविष्य घडवत परीक्षांच्या 'रंट रेस'मध्ये दबाव सांभाळत सतत धावणारी ही पिढी आहे आणि म्हणूनच उद्याच्या भारताकडून मोठ्या अपेक्षा ठेवणारी आणि त्यांना पूर्ण करण्यात योगदान द्यायला तयार असलेली ही पिढी आहे. आम्ही भारताला केवळ एक देश माणून बघत नाही, तर एक जागतिक शक्ती म्हणून बघतो. जागतिक शक्ती केवळ संरक्षण, उद्योग यावर नाही, तर मूल्यजतन, पर्यावरण, शिक्षण, आरोग्य या सर्व कसोट्यांवर उतरणारी असते. सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये जैववैज्ञानिक प्रगतीचा वाटा खूप कमी आहे; हाच सध्या काहीसा नसलेला समतोल साधून पुढे जाणारा भारत आम्हाला तयार करायचा आहे. रोजगार मागणारी पिढी न घडवता रोजगार निर्माण करण्याची शिकवण देणारी शिक्षण व्यवस्था आम्हाला हवी आहे,
अभिव्यक्ती स्वातंत्र्य वापरताना आपण दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर घाला तर घालत नाही आहोत ना?' असा प्रश्न स्वतःला विचारणारा समाज आम्हाला अभिप्रेत आहे. राजकीय अलिप्ततेला राजकीय दुर्लक्ष न समजता विधायक कार्यात आम्हाला सहभागी करून घेणारी व्यवस्था आम्हाला हवी आहे आणि हे सगळे करताना आमच्या गुणांची वर्गवारी न करता, गुणांची पारख करणारी परीक्षा व्यवस्था आम्हाला हवी आहे, कारण, भारताचे 'जेन झी' हे फक्त भारताचे नाही, तर उद्याच्या जगाचंसुद्धा भविष्य आहेत. आज प्रचंड वेगाने विस्तारणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), तंत्रज्ञान, आरोग्य विज्ञान वा क्षेत्रांमध्ये आघाडी घेण्यासाठी सर्वोत्तम वयोगटातील लोकसंख्या असणाऱ्या काही देशांपैकी भारत एक आहे. 'अमृत भारत २०४७' हे केवळ एक स्वप्न किंवा राजकीय घोषणा नाही, तर ते डिजिटल युगाचे मानकरी असणाऱ्या आमच्या पिढीचं लक्ष्य आहे. जागतिकीकरणादरम्यान झालेल्या स्थलांतरांमध्ये एनआरआय (NRI) झालेल्या भारताच्या जेन झौला 'जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी' या वचनाची गोडी पटवून देत, पुन्हा भारताकडे वळवत सिंधू संस्कृतीच्या मुळांना, चाणक्य, भास्कराचार्य, चरक यांचा वारसा, मौर्य, चोल राजवटींच्या पराक्रमाला, महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज, राणी लक्ष्मीबाई यांसारख्या थोरांच्या शिकवणीला आणि लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, स्वातंत्र्यवीर सावरकर, भगत सिंग या आणि अशा अनंत वीरांच्या त्यागाला सोबत घेत उद्याच्या समृद्ध, विकसित, सामर्थ्यशाली भारताचं उज्ज्वल भविष्य आम्ही बघत आहोत. आणि म्हणूनच, भारताचे जेन झी हे आत्मनिर्भर, कार्यकुशल व्यवस्था असणाऱ्या, सामाजिकदृष्ट्या एकसंध, भावनिकदृष्ट्या प्रगल्भ आणि राष्ट्रविचाराने परिपूर्ण पिढीचा पाया घालत राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात योगदान देणार, याची एक जेन झी महणून मला पूर्ण खात्री आहे. तेव्हा आपल्या भावनांचा वापर प्रगल्भपणे, ठोस कार्यासाठी करत, लोकशाही मूल्यं जपत आणि 'राष्ट्र प्रथम' या विचारसरणीने प्रेरित होऊन स्वातंत्र्याचा आनंद घेऊया।
sohamskofficial.07@gmail.com