

विशेष
सुधीर गाडगीळ
नव्वदीच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या सुरेल प्रवासात डोकावताना भेटतात बाबांचे संस्कार, चार बहिणींवरील निरतिशय प्रेम आणि कवितेचा अर्थ सुरांतून उलगडणारा प्रतिभावंत संगीतकार. सुधीर गाडगीळ यांच्या लेखणीतून उलगडणाऱ्या या आठवणी म्हणजे 'बाळासाहेबां'च्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक अनोळखी पैलू उलगडणारा सुरेल दस्तावेज!
हृदयनाथजींच्या मनात नेमकं काय चालतं, त्यांच्या संगीतामागच्या कहाण्या काय आहेत आणि त्यांच्या स्वभावाचे कोणते पैलू आजवर चाहत्यांपासून अनोळखी राहिले आहेत?" सुधीर गाडगीळ यांच्या खास शैलीत हा संवाद आजही रंगला, तर कदाचित अशाच अनेक प्रश्नांची उकल होईल. २६ ऑक्टोबर हा पं. हृदयनाथ मंगेशकर यांचा जन्मदिवस. या निमित्ताने त्यांच्या आयुष्यातील सुरेल आठवणी, गाण्यांच्या निर्मितीमागच्या रंजक कहाण्या आणि त्यांच्या स्वभावाचे आजवर अनोळखी राहिलेले पैलू पुन्हा एकदा उलगडून पाहण्याची संधी मिळते. हृदयनाथजींच्या मनात डोकावायचं, तर त्यांच्या सुरांच्या वाटेनेच जावं लागतं ! त्यांच्या संगीताइतकंच त्यांचं व्यक्तिमत्त्वही गूढ, अनवट आणि अनेक पदरांनी नटलेलं आहे.
लोकप्रिय निवेदक आणि मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी हृदयनाथजींशी अनेकदा मनमोकळा संवाद साधला आहे. त्यांच्या संगीतमय मुलाखतींमधून 'मोगरा फुलला' सारख्या अजरामर रचनांमागच्या आठवणी, लतादीदींची गायकी आणि संगीतनिर्मितीचा प्रवास अशा अनेक विषयांना उजाळा मिळाला. या संवादांतून समोर येणारे हृदयनाथजी म्हणजे केवळ प्रतिभावान संगीतकार नव्हे, तर शब्दांचा अर्थ जाणणारे, कवितेच्या अंतरंगात शिरणारे आणि प्रत्येक सुरामागे स्वतंत्र विचारविश्व उभे करणारे कलावंत. जुन्या आठवणींच्या धाग्यांना आजच्या काळाशी जोडत हृदयनाथजींशी पुन्हा एकदा मनमोकळा संवाद साधला, तर तो केवळ मुलाखत न राहता सुरांच्या आणि स्मृतींच्या दुनियेत नेणारा एक अनोखा अनुभव ठरेल. त्यांच्या वाढदिवसानिमित्त, सुधीर गाडगीळ यांनी एका पुस्तकात लिहिलेला हा लघुलेख-ते अगदी स्पष्टपणे म्हणाले की, 'माझं माझ्या मुलांवर किंवा बायकोवरही नाही इतकं मनःपूर्वक प्रेम माझ्या चार बहिणींवर आहे आणि त्यांचंही माझ्यावर आहे. आम्हां पाच मंगेशकर भावंडांच्या प्रेमाच्या राज्यात कुणीही शिरू शकत नाही. दुही माजवू शकत नाही. या प्रेमाच्या प्रांतात ढवळाढवळ करू शकत नाही.'
त्याचं कारणही त्यांनी आपली आरंभीच्या जीवनातील दारिद्र्याची दुःस्थिती हे असल्याचे सविस्तर सांगितले. ते म्हणाले की, 'प्रपंचाचा गाडा रेटण्यासाठी रेकॉर्डिंगच्या कामासाठी लोकलने मालाडकडे जाणारी दीदी ! मला कडेवर घेता घेता स्वतःचा संसार सांभाळत गाणं गाणारी जिद्दी आशाताई, लहान मुलांची गाणी करणारी मीना आणि चित्रांचं प्रेम असणारी उषाताई. साऱ्यांना एकच पाठबळ होतं संगीताचं ! ते सूर आले होते बाबांकडून ! या दीनानाथांकडून !' आणि त्यांच्या या वक्तव्याची प्रचिती रसिकांना वेळोवेळी येतही असते. अद्वितीय गळा, तल्लकपणा, निकोप सूर, भावमधुरता, - प्रयोगशीलता, आक्रमक ताना आणि स्वरचमत्कृती हे मा. दीनानाथांचे गुण या पाचही भावंडांमध्ये पाहायला मिळतात. त्यामुळे ही मंगेशकर मंडळी दीनानाथांची देन असूनही 'सूर्याची पिल्ले' झाली नाहीत. प्रत्येकजण गाणे समजून घेऊन त्याच्या अर्थानुसार गाणे गातो.
दुसऱ्या दिवशी मी तो कागद आशाताईला दिला. आशाताई ते गाणे गायली. काल ९० वर्षांची आशाताई मला भेटली. जुन्या आठवणी निघाल्या. एकदम हरवून म्हणाली, 'बाळ, तुझी इतकी गाणी मी गायले... जीवलगा, केव्हातरी पहाटे, तरुण आहे रात्र अजुनी, मी मज हरवून बसले ग, मागे उभा मंगेश, जांभूळ पिकल्या झाडाखाली, नभउतरू आलं... ही सगळी गाणी फार लोकप्रिय झाली. पण मला असे वाटते की तुझे आवडते ते गाणे ज्याबद्दल सगळ्यांनाच शंका होती, ते गाणे मी सर्व गाण्यांपेक्षा फार उत्कृष्ट नाही पण उत्कट गायले आहे, असे मला ठामपणे वाटते. ते गाणे अर्थासहित...
स्वतःच्या प्रतिभेमुळे स्वतंत्रपणे जगणारा स्वयंप्रकाशित ग्रह आहे. पण प्रत्येकापाठी 'बाबां'ची समर्थ परंपरा नि सूर आहेत. फार वर्षांपूर्वी हृदयनाथजीनीच कार्यक्रमाच्या दौऱ्यातील गोष्टीत सांगितलं होतं की, त्यांच्या लहानपणी त्यांना अरेबियन नाईट्स किंवा कॉमिक्स वाचायला दिली नव्हती, तर घरात असायची बाबांची नाटकांची पुस्तकं! 'संन्यस्त खड्ग' मधून सावरकरांची ओळख झाली, 'भावबंधन'मधून गडकरी भेटले. कादंबऱ्यासुद्धा 'वीरधवल', 'उषःकाल' निवडल्याने भाषेची गोडी वाढली. पायाच्या आजाराच्या एकाकी अवस्थेत ज्ञानेश्वरांपासून गालिबपर्यंत अनेक भाषाप्रभूंशी त्यांची गट्टी जमली. ग्रेस, आरती प्रभू, ना. धों. महानोर यांच्या शब्दांची त्यांनी केलेली निवड हे त्याचंच द्योतक आहे. त्यामुळेच “चाली लावण्यापूर्वी तुम्हाला कवी जवळचा वाटतो की कविता?” असे विचारताच ते म्हणाले होते की, “कवितेचा अर्थ!” त्यामुळेच शांताबाईंच्या मोगऱ्याच्या कळ्यांसारख्या शब्दांना हृदयनाथजींनीच चाली दिलेल्या आहेत. महाराष्ट्राचं लोकजीवन मांडण्याचा प्रयत्नही कोळी गीतामधून साधला. मीरेची मधुराभक्ती सूरतालातून सजीव केलीय.
लोकगीतातील रांगडपणणा, आजोळच्या (खानदेशच्या) गाण्यांची भावमुग्धता, कोळी गीततला आवेग, त्यांच्या सुरावटीत आहेत. भक्ती, शौर्य, शृंगार, उदासी, विरह, आनंद, चैतन्य या विकारांना सामावून घेणारा चिदाकाश भरून टाकणारा ब्रह्मानंद पं. हृदयनाथजींच्या संगीतानं दिलाय. त्यामुळे आशाताई आणि दीदी दोघीजणी त्यांच्या चाली म्हणताना जास्त सतर्क असतात. स्वतः हृदयनाथजींना ही नियतीची कृपा वाटते.