ठकास महाठक

पैसे घेऊन दिन गेला मिठाईच्या दुकानात, पेढ्यांचा भाव त्याने विचारला गाणे गात...
ठकास महाठक
Published on

काव्यकट्टा

एकनाथ आव्हाड

पैसे घेऊन दिन गेला
मिठाईच्या दुकानात
पेढ्यांचा भाव त्याने
विचारला गाणे गात

मिठाईवाला मिठाई म्हणे,
चारशे रुपये किलो
दिन म्हणाला,
‘मला द्या, फक्त पाव किलो’

मिठाईवाल्याने पाव किलो
दिनला दिली मिठाई
दिन म्हणे,
‘पाव किलोलाच कमी वाटते काही’

मिठाईवाला म्हणे,
‘जास्त ओझं नको तुला
म्हणून थोडी कमी दिली
कळले का रे मुला’

दिनने मग वीस रुपयांच्या
चारच दिल्या नोटा
मिठाईवाला म्हणे,
‘अरे, करू नकोस तोटा’

दिन म्हणे, ‘पैसे मोजायचा
त्रास तुमचा वाचवला
म्हणून वीसची एक नोट
कमी दिली तुम्हाला’

मिठाईवाला चिडून म्हणे,
‘माझ्यावर उलटवलास डाव’
दिन म्हणे, ‘जसाच तसा,
हाच माझा स्वभाव’

साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कारप्राप्त लेखक

logo
marathi.freepressjournal.in