दिवाळी अंक २०२६ : तृषा

अशी झिरपावी तृषा, घोट दरियाचा घ्यावा...
दिवाळी अंक २०२६ : तृषा
दिवाळी अंक २०२६ : तृषा
Published on: 

आदित्य दवणे

अशी झिरपावी तृषा
घोट दरियाचा घ्यावा
तडा गेलेला गाभारा
मग ओलसर व्हावा

मेघ यावे बोलावून
त्यात चमकावी वीज
देवाजीला आठवावी
झाली धरतीची झीज

सात जन्माचा दुष्काळ
असा क्षणात मिटावा
जणू थांबल्या भक्ताला
गळी विठ्ठल भेटावा