

फ्रूट क्राफ्ट
अलकनंदा पाध्ये
जेव्हा आपण स्वयंपाकघरात असतो, तेव्हा आपल्या अवतीभवती अनेक सुंदर रंग विखुरलेले असतात. मोबाईल आणि टीव्हीच्या जगात रमणाऱ्या मुलांना निसर्गाच्या या रंगांशी जोडण्यासाठी ‘व्हेजी-फ्रूट आर्ट’ ही एक उत्तम संकल्पना आहे. यामुळे मुलं केवळ आनंदाने फळं खाणार नाहीत, तर त्यांच्यातील कलाकारही जागा होईल आणि कल्पकता वाढेल.
फळे : संत्र्याच्या फोडी, चिक्कूचे काप, डाळिंबाचे दाणे किंवा चिक्कूच्या बिया.
भाज्या : श्रावण घेवड्याच्या शेंगा (Green beans), काकडीच्या साली किंवा कोथिंबीरीची देठं.
कसे कराल? दिलेले फोटो पाहून तुम्ही ही कलाकृती साकारू शकता.
संत्र्याची फुले : एका पांढऱ्या प्लेटवर संत्र्याच्या ३-४ फोडी एकत्र ठेवून फुलाचा आकार द्या. फुलाच्या मध्यभागी डाळिंबाचा एक लाल दाणा ठेवा. फुलांचे देठ म्हणून ‘श्रावण घेवड्याच्या’ शेंगा वापरा आणि पानांसाठी काकडीच्या सालीचे पातळ काप करून सजवा. तयार झाली तुमची सुंदर अशी संत्र्याची फुले!
चिक्कू मॅन : चिक्कूचे गोल काप करून त्यापासून डोके आणि शरीर तयार करा. बाजूला छोटे काप लावून हात आणि पाय बनवा. चिक्कूच्या काळ्या बियांचा वापर करून डोळे तयार करा. पहा, तुमचा गोड ‘चिक्कू मॅन’ तयार झाला!
तर मग, कशी वाटली ही आयडिया? तुम्हीही तुमची बुद्धी चालवा आणि या सुट्टीत ‘व्हेजी-फ्रूट आर्ट’चे असे मजेशीर प्रयोग नक्की करा!
alaknanda263@yahoo.com