चला, बनवूया व्हेजी-आर्ट

मुलांनो, घरातल्या घरात आपली कल्पकता दाखवण्याची एक नामी संधी म्हणजे ‘व्हेजी-फ्रूट आर्ट’! यामुळे तुम्ही किचनमध्ये जाऊन छान कलाकृतीच बनवणार नाही, तर या भाज्यांशी तुमची मैत्रीही होईल आणि हळूहळू त्या खायलाही आवडू लागतील.
चला, बनवूया व्हेजी-आर्ट
चला, बनवूया व्हेजी-आर्ट
Published on

व्हेजी क्राफ्ट

अलकनंदा पाध्ये

मुलांनो, घरातल्या घरात आपली कल्पकता दाखवण्याची एक नामी संधी म्हणजे ‘व्हेजी-फ्रूट आर्ट’! यामुळे तुम्ही किचनमध्ये जाऊन छान कलाकृतीच बनवणार नाही, तर या भाज्यांशी तुमची मैत्रीही होईल आणि हळूहळू त्या खायलाही आवडू लागतील.

१. काकडीच्या टेकडीवरच्या गाजर-मुंग्या

कृती- प्लेटवर काकडीचे काप ठेवून टेकडी बनवा. गाजराचे गोल काप जोडून मुंगीचे शरीर तयार करा. कोथिंबिरीची देठं वापरून मुंगीचे पाय आणि डोक्यावरच्या स्पर्शिका बनवा. शेवटी काळ्या मिरीने डोळा बनवला की झाल्या मुंग्या तयार!

२. गप्पा मारणारे काकडीचे पक्षी

कृती- काकडीचे दोन गोल काप (एक मोठा व एक लहान) जोडून पक्षाचे शरीर व डोकं बनवा. काकडीचा अर्धा काप पंख म्हणून लावा. कोथिंबिरीच्या देठाने चोच आणि पाय तयार करा. काळ्या मिरीचा डोळा लावून तुमचा बोलका पक्षी तयार करा!

३. गाजराची नाजूक फुले

कृती- कोथिंबिरीची लांब देठं प्लेटवर ठेवून झाडाच्या फांद्या तयार करा. गाजराचे गोल काप घेऊन त्यातून छोटा त्रिकोणी भाग कापून फुलांचा आकार द्या. ही फुले कोथिंबिरीच्या देठांच्या टोकावर व्यवस्थित मांडा. झाली तुमची सुंदर गाजराची फुले तयार!

हे सर्व फोटो पाहा आणि तुम्हीही या कलाकृती नक्की करून बघा. काकडी, गाजर, कोथिंबीर, काळीमिरी हे पदार्थ घरात सहज उपलब्ध असतात. गरज पडल्यास मोठ्यांची मदत घ्या. तुम्हालाही अशा काही कल्पना सुचत असतील तर त्या ट्राय करा आणि सुट्टी सार्थकी लावा.

alaknanda263@yahoo.com

logo
marathi.freepressjournal.in