चला, बनवूया व्हेजी-फ्रूट आर्ट

मुलांनो, श्रावण महिना आला की अवघा निसर्ग हिरवागार फुलून निघतो!
चला, बनवूया व्हेजी-फ्रूट आर्ट
चला, बनवूया व्हेजी-फ्रूट आर्ट
Published on

व्हेजी क्राफ्ट

अलकनंदा पाध्ये

मुलांनो, श्रावण महिना आला की अवघा निसर्ग हिरवागार फुलून निघतो! चहूकडे सुंदर वातावरण असतं आणि या काळातच नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन असे अनेक सण अन् व्रत-वैकल्ये येतात. घर कसं उत्साहाने भरून जातं! अशा या मंगलमय वातावरणात तुम्हीही तुमच्या कल्पकतेची जादू दाखवू शकता.

१. व्हेजी फ्रूट राखी

  • साहित्य : मुळा किंवा बटाट्याची गोल चकती, गाजराची लहान चकती, डाळिंबाचे दाणे आणि कोथिंबिरीचे लांब दांडे.

  • कृती : मुळा किंवा बटाट्याच्या मोठ्या पांढऱ्या गोल चकतीवर गाजराची त्यापेक्षा थोडी छोटी गोल चकती मध्यभागी ठेवा. तिच्या सभोवताली डाळिंबाचे दाणे सुंदर पाकळ्यांसारखे लावा. आता दोन्ही बाजूंना कोथिंबिरीचे दांडे ठेवून धागा बनवा आणि टोकांवर डाळिंबाचे दाणे ठेवून आकर्षक राखी तयार करा!

२. व्हेजी फ्रूट रांगोळी

  • साहित्य : डाळिंबाचे लालचुटूक दाणे आणि काकडीच्या सालीच्या हिरव्या पट्ट्या.

  • कृती : काकडीच्या सालीच्या पट्ट्या वापरून ताटात एकमेकांना जोडलेले छान चौकोन बनवा. आता या चौकोनांच्या कोपऱ्यांवर आणि मध्यभागी डाळिंबाचे दाणे ठेवून मस्त रांगोळी सजवा!

alaknanda263@yahoo.com

logo
marathi.freepressjournal.in