आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य,१ जुलै २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, July 1, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - कोणतेही मोठे धाडस टाळा.कोणतेही वादग्रस्त परिस्थिती समोर आली तरी आपण शांत राहिले पाहिजे. व्यापार व्यवसायिकांना मात्र चांगली परिस्थिती असणार आहे.

वृषभ - कलाक्षेत्रातील व्यक्तींना आजचा दिवस चांगला जाणार आहे नवीन संधी प्राप्त होतील. कला क्षेत्रामध्ये काही नवीन करून दाखवण्याची हीच वेळ आहे.

मिथुन -आपणास आज मानसिक मनोबल वाढवण्याची गरज आहे. आर्थिक नियोजन नीट करा, देण्याघेण्याचा व्यवहार करताना दक्षता बाळगा,चुकीचे व्यवहार करू नका.

कर्क - कुटुंबातील सहजीवन आपणास सुखावून जाईल. राजकीय व्यक्तींनी दक्ष राहणे गरजेचे, नको त्या व्यक्तींकडून मानसिक त्रास होण्याची शक्यता. व्यावसायिकांना आर्थिक लाभ होतील.

सिंह - आपणा स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.घरामध्ये वैद्यकीय खर्च होण्याची शक्यता आहे. आजच्या दिवसात कर्जफेड किंवा कर्जवसुली करून घ्या.

कन्या - तरुण-तरुणींचे महत्वाचे प्रश्न सुटतील. नोकरी मध्ये शुभ घटना घडतील. काम केल्याचे श्रेय मिळाल्या सारखे वाटेल. पगार वाढीची शक्यता आहे. शुभ ग्रहांचे भ्रमण आपणास फायदेशीर जाईल.

तुळ -आई वडिलांच्या प्रकृतीची चिंता वाटणार आहे.मानसिक ताण तणावाची शक्यता आहे. नैसर्गिक ग्रहांची साथ मिळाल्यामुळे आपण सर्व गोष्टीतून सहीसलामत बाहेर पडाल. खोळंबलेली कामे पूर्ण करा.

वृश्चिक - वैयक्तिक लेव्हल वर आपण गतिमान राहणार आहात. वादग्रस्त प्रकरण उद्भवण्याची शक्यता आहे, आपण त्यावरआपण व्यवस्थित मात कराल. छोटा मोठा प्रवास होऊ शकतो.

धनु - बेरोजगारांना नोकरी मिळेल. भागीदाराच्या प्रश्नातून काही त्रास झाले असल्यास त्यातून सुटका होईल. तरुणांचे भाग्योदय होणार आहे. आर्थिक लाभ होणार आहेत. कुसंगती पासून लांब राहावे.

मकर - मानसिक शारीरिक आणि व्यावहारिक पथ्ये कटाक्षाने पाळा, बेकायदेशीर व्यवहार नकोत,अवसानघातकी निर्णय टाळा. उधारीचे व्यवहार जपून करा नोकरीमध्ये भाग्योदय होईल.

कुंभ - काही ग्रह आपणास विचित्र फले देण्याची शक्यता आहे. आपण सावध असावे. सार्वजनिक जीवनामध्ये सर्व पथ्ये पाळावीत. अनपेक्षित प्रवास संभवतो. अधिक पैसे मिळवण्यासाठी शॉर्टकट नको.

मीन - विचित्रपणे आर्थिक कोंडी झालेली निघून जाईल. नोकरीमध्ये भाग्योदय होईल. व्यापार व्यवसायिकांच्या व्यवसायामध्ये तेजी निर्माण झाल्यामुळे, आर्थिक प्रश्न सुटून जाणार आहेत.

मुंबईने नाना शंकरशेठ यांना कधीच विसरू नये

जुलै महिना कसा जाईल? बघा मेष आणि वृषभ राशीचे भविष्य

ब्रेकफास्टमध्ये काहीतरी वेगळं खायचंय? झटपट बनवा क्रिस्पी ओनियन रिंग्स

Mumbai : चेंबूर बस दुर्घटनेत ११ वर्षीय विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू; अन्य चार विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर

Mumbai : चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळले; काही विद्यार्थी जखमी, बचावकार्य सुरू, Video