आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, ११ ऑक्टोबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, October 11, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष- आपले कार्य वाढवण्यासाठी आपणास सु संधी मिळणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रात यश मिळणार आहे तसेच प्रसिद्धी ही आपणास मिळू शकते.

वृषभ - आपण आज जे कार्य कराल त्यामध्ये आपणास यश येईल. काम करण्याची कार्यक्षमता वाढणार आहे उत्तम मनोबल असल्यामुळे आनंदाने काम कराल.

मिथुन - कामात यश येण्यासाठी आपण खूप काम कराल सातत्याने काम करून यश मिळवा. आपल्या प्रयत्नांना चांगले यश मिळणार आहे.

कर्क - आर्थिक लाभाचे योग आहेत. पण तसे आपण खर्चही कराल. कुटुंबामध्ये अचानक खर्च करावा लागणार आहे . घरातील वातावरण सांभाळावे लागणार आहे.

सिंह - आरोग्याच्या तक्रारी कमी होतील, त्यामुळे आपण उत्साही व आनंदी रहाल. कामाचे प्लॅनिंग करून कामाला सुरुवात करा. नवीन नवीन कामे मिळतील.

कन्या - मानसिक अस्वस्थता जाणवेल आरोग्याच्या तक्रारी थोड्याफार असू शकतात. त्यामुळे महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. | महत्वाच्या निर्णयांमध्ये चुका होऊ शकतात. प्रवासाचे योग आहेत.

तुळ - दैनंदिन कामे नीट होतील. कामाचे अपेक्षित परिणाम मिळतील. महत्त्वाच्या कामांसाठी सहकाऱ्यांची मदत घ्यावीच लागेल त्यामुळे आधीच त्या दृष्टीने प्रयत्न करा.

वृश्चिक - स्वतःच्या विचारावर ठाम राहा, आपण घेतलेले निर्णय योग्य असतील, त्यामुळे त्यानुसार निर्णय घेतल्याने आपणास यश येईल. यश आपलेच आहे.

धनु - घरातील वातावरण समाधानकारक असेल. जे कामाचे नियोजन केले असेल ते पूर्ण होईल सामाजिक कार्यांमध्ये कार्यरत रहाल, त्यामुळे प्रतिष्ठा उंचावेल.

मकर - आरोग्याच्या बाबतीत हलगर्जीपणा करू नका. नोकरीमध्ये कामामध्ये कामाच्या संधी येतील. नवीन नोकरीसाठी इंटरव्ह्यू असेल तर चांगला होईल. आत्मविश्वासाने कामे करा.

कुंभ - जोडीदाराचे सौख्य लाभेल जोडीदाराशी वागता बोलता ना त्यांच्या मानसिकतेचा विचार करणे आवश्यक आहे. व्यापार-व्यवसायात आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले असणार आहे.

मीन - कुठलाही निर्णय घेताना विचारपूर्वक घेणे आवश्यक आहे. निर्णय चुकू शकतो, किंवा समोरची व्यक्ती आपणास फसवू शकते. त्यामुळे प्रॅक्टिकली विचार करणे आवश्यक आहे.

Navratri 2026 : नवरात्रीचे नऊ दिवस अन् देवीची नऊ रूपं! प्रत्येक रूपामागे दडलाय खास अर्थ, तुम्हाला माहीत आहे का?

Navratri 2026 Wishes : 'उदे गं अंबे उदे!' नवरात्रीनिमित्त प्रियजनांना पाठवा खास मराठी शुभेच्छा संदेश अन् HD कार्ड्स

Navratri 2026 : उकडलेल्या रताळ्यांना द्या कुरकुरीत ट्विस्ट; उपवासासाठी 'असा' बनवा झटपट चाट

Mumbai : उद्या मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक; पश्चिम रेल्वेवर मध्यरात्री जम्बो ब्लॉक, कोणत्या लोकल रद्द? जाणून घ्या

Mumbai CJP Protest : अभिनेता इम्रान खान पोलिसांच्या ताब्यात; व्हॅनमधून फोटो शेअर करत म्हणाला...