आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, १२ मार्च २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, March 12, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - घरातले वातावरण सामंजस्य असणार आहे. मुलांबरोबर उत्तम वेळ घालवणार आहात. नोकरी व्यवसायात प्रगती होईल, आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे.

वृषभ - हाती घेतलेल्या कामामध्ये यश येणार आहे. नातेवाईकांच्या भेटीगाठीने आनंद होईल. प्रॉपर्टीचे व्यवहार मार्गी लावू शकाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहणार आहे.

मिथुन - आर्थिक स्थिती सर्वसामान्य राहील. इतरांना मदत कराल. धार्मिक कार्यामध्ये सहभागी व्हाल. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. नोकरीमध्ये जरा ताण वाढण्याची शक्यता आहे.

कर्क - आजचा दिवस स्वतःसाठी व कुटुंबासाठी चांगला असणार आहे. मन आनंदी राहील. खरेदी होईल. मनासारखी खरेदी कराल. जोडीदाराशी चांगले संबंध राहणार आहे.

सिंह - आज आपण स्वतःला वेळ देणार आहात. स्वतःच्या आवडीच्या गोष्टींमध्ये वेळ घालवाल. लेखन-वाचन यासाठी वेळ काढणार आहात. नोकरीमध्ये उन्नती होईल.

कन्या - नोकरीमध्ये आपणास फारसा चांगला काळ नाही. मोठे धाडस करण्याचे टाळा. मोठी उलाढाल टाळणेच बरे. आर्थिक गुंतवणूक करू नका नुकसान होण्याची शक्यता आहे.

तुळ - आज आपले कामाचे नियोजन चांगले असल्यामुळे, कामे नीटनेटकी होणार आहेत. आपल्यामध्ये उत्साह भरपूर असणार आहे. व्यवसायातल्या योग्य निर्णयामुळे आर्थिक आवक चांगली राहील.

वृश्चिक - आज आपण आज दिवस चांगला जाणार आहे. नोकरी चांगला काळ आहे. मनासारखे बद्दल होणार आहे. वरिष्ठांच्या मनासारखे काम केल्यामुळे त्यांच्याशी चांगले संबंध राहतील.

धनु - आपल्या नोकरीमध्ये अपेक्षित घटना घडणार आहेत. नोकरीसाठी प्रवासाची शक्यता आहे. आपणास भाग्याची साथ मिळणार आहे. धार्मिक क्षेत्रांमध्ये रुची राहणार आहे. दानधर्म होईल.

मकर - उगाचच मानसिक चिंता सतावण्याची शक्यता आहे. मनोबल चांगले ठेवा. नोकरी मधील अडचणी विचारपूर्वक सोडवा. प्रवास शक्यतो टाळा. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

कुंभ - नको असलेली कामे समोर येणार आहेत. तरीही सकारात्मक विचार करून ती पूर्ण करा. आर्थिक आवक सामान्य राहणार आहे. व्यापार व्यवसायामध्ये स्वतः लक्ष घालणे आवश्यक आहे.

मीन - नोकरीच्या नवीन संधी येणार आहेत.घरामध्ये नातेवाईक येण्याची संभावना आहे. नातेवाईकांशी गाठीभेटी मुळे चर्चा होतील, चिंता दूर होणार आहे. उपयुक्त माहिती आपणास समजणार आहे.

तुमच्याही मोबाईलवर अचानक मोठा इमर्जन्सी अलर्ट आला? घाबरू नका; सरकारकडून देशभरात चाचणी सुरू, वाचा सविस्तर माहिती

Mumbai-Pune Missing Link : 'उद्घाटन झालं, पण मार्ग बंदच!' पुणे-मुंबई लेन सुरू न झाल्याने सोशल मीडियावर प्रवाशांचा संताप

Mumbai : ‘नीट’ परीक्षेमुळे मध्य रेल्वेचा रविवारचा ब्लॉक रद्द; शनिवारी मेगाब्लॉक, रात्री ११.१६ वाजता CSMTहून शेवटची लोकल

Mumbai : मेट्रो ६च्या कामासाठी पश्चिम रेल्वेचा १० तासांचा ब्लॉक; लोकल सेवांवर परिणाम, वाचा सविस्तर

Pune : सुट्टीसाठी आजीकडे आलेल्या ४ वर्षीय चिमुरडीवर बलात्कार; हत्या करुन शेणाच्या ढिगाऱ्यात लपवला मृतदेह