आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, १४ फेब्रुवारी २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, February 14, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - आपले सर्वांशी चांगले संबंध असणार आहेत. व्यवसायातील वाढीमुळे आपण आनंदित राहणार आहात. आपल्या कार्यक्षेत्रात चांगल्या सुधारणा होणार आहेत.

वृषभ - नोकरीमध्ये खूप काम असल्यामुळे जास्त धावपळ होण्याची शक्यता आहे. कामाचा ताण जाणवणार आहे. आपणास नोकरीमध्ये सहकार्य कमी मिळण्याची शक्यता आहे.

मिथुन - तुमची अमारिया सर्जनशीलता आणि उत्साह तुम्हाला अधिक फायदेशीर दिवसांकडे घेऊन जाणार आहे तुम्हाला एखादी आनंदाची बातमी समजू शकते. संततीची प्रगती होणार आहे.

कर्क - तुमच्या वैयक्तिक मार्गदर्शन तुमचे नातेसंबंध सुधारणार आहे. घरातील व्यक्तींचे आपल्याला हवी तशी साथ मिळणार आहे. आर्थिक बाबतीत सल्ला घेताना घरातील ज्येष्ठ मंडळींना प्राधान्य द्यावे.

सिंह - आजचा दिवस आपणास चांगला जाणार आहे. आपल्या कार्यक्षेत्राच्या बाबतीत योग्य व्यक्तीशी विचारविनिमय होणार आहेत. त्यामुळे व्यवसाय वाढीसाठी चांगले प्रयत्न होणार आहेत.

कन्या - आपल्या मनातील नकारात्मक विचार काढून टाका. सकारात्मक विचारांनी आपल्या व्यवसायामध्ये वाढ होऊन आर्थिक फायदे होणार आहेत. निर्णय योग्य ठरणार आहेत.

तुळ - या कार्यक्षेत्रामध्ये आपण उत्साहाने काम करणारा आहात. आपल्या कार्यक्षेत्रात नवीन संधी येण्याची शक्यता आहे. पण काही कारणांनी आपण ती घेणार नाही. अनामिक हुरहुर वाटणार आहे.

वृश्चिक - आज मनावर आपल्या कसला तरी मानसिक ताण असणार आहे. व्यवसायातील घडामोडींचा दूरपर्यंत विचार करून पुढचे निर्णय घ्या. समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवू नका.

धनु - सहज म्हणून मित्रांशी संवाद साधाल. आपल्याला आनंद मिळणारच आहे शिवाय काही नवीन माहिती मिळाल्यामुळे आपली स्वतःची प्रगती होण्याची शक्यता आहे. दिवस आनंदात जाणार आहे.

मकर - मनातील उदासीनता दूर करा. तुमच्या उदासीनतेवर तुम्ही मात करणार आहात. आनंदी राहा कामाला उत्साहाने सुरुवात केल्याने त्याचे चांगले फायदे होणार आहेत.

कुंभ - आपल्या हातून मोठी कामे होणार आहेत. त्यामुळे सामाजिक प्रतिष्ठा वाढणार आहे. तसेच आज आपला अध्यात्म तिकडे ओढा असणार आहे. धार्मिक प्रवास होऊ शकतात.

मीन - आपले मनोबल उत्तम ठेवणे फार आवश्यक आहे. अन्यथा कामांमध्ये चुका होतील. व्यापार व्यवसायात चांगले लक्ष द्या. आर्थिक प्रमाण ठीक-ठाक असणार आहे.

अमरावतीत मोठी कारवाई! लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयाजच्या घरावर बुलडोझर; अनधिकृत बांधकाम पाडले, VIDEO

Navi Mumbai : हापूस आंबा झाला स्वस्त; APMCमध्ये दरात घट, १५००रुपयांपासून पेटी उपलब्ध

चहाच्या टपरीवर रेल्वे कर्मचारी कोसळला; ३ मिनिटे तडफडल्यानंतर मृत्यू, घटना CCTV मध्ये कैद

वेदांता पॉवर प्लांट स्फोटातील मृतांचा आकडा वाढला; मॅनेजमेंटविरूद्ध FIR नोंदवा, न्यायालयीन चौकशी करा - काँग्रेसची मागणी

Mumbai : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर मुंबादेवी मंदिरात आंबा महोत्सव; भक्तांसाठी खास सोहळा