मेष - आजचा दिवसभरात मनासारख्या घटना घडल्यामुळे आनंदी आणि उत्साही राहाल आत्मविश्वासात वृद्धी होईल अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे जमिनीच्या व्यवहारात सावधानता बाळगा.
वृषभ - जवळपासचे प्रवास घडतील हितचिंतकांच्या सहवासात राहाल नोकरीत चांगली स्थिती राहील पैशाची आवक उत्तम राहील महत्त्वाच्या कामात यश मिळेल कौटुंबिक सुख मिळेल.
मिथुन - भावंडांच्या भेटीगाठी होतील कुटुंब परिवारातून वाढते सहकार्य मिळेल मनात सकारात्मक विचार ठेवण्याची गरज व्यवसाय धंद्यात चांगली परिस्थिती राहील.
कर्क - घरातील लहान-मोठ्या वादविवादाच्या घटनेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करा रागावर योग्य ते नियंत्रण ठेवा मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील जीवनसाथीचे म्हणणे पूर्णपणे ऐकून घ्या.
सिंह - आर्थिक आवक चांगली राहील चैनीच्या वस्तूंची खरेदी करू शकाल मनोरंजनाकडे कल राहील लहान-मोठे प्रवासाचे योग सामाजिक समारंभास उपस्थित रहाल.
कन्या - कुटुंब परिवारात किरकोळ कारणावरून कुरबूर होईल तसेच आपल्या कार्यक्षेत्रात वादविवाद टाळा नोकरीत बदल होऊ शकतात सहकाऱ्यांशी वाद घालू नका काही कारणाने दगदग होईल.
तुळ - आर्थिक परिस्थिती उत्तम राहील पैशाची आवक चांगली राहून एखाद्या व्यवहारात बराच फायदा होईल मात्र तब्येतीची काळजी घ्या आपल्याला झेपतील एवढीच कामे स्वीकारा.
वृश्चिक - आपल्या जीवनसाथी बरोबर काही कारणांनी गैरसमज होऊ शकतात एखाद्या वादामुळे मनस्ताप सहन करावा लागण्याची शक्यता व्यवसायातील परिस्थिती सर्व सामान्य राहील.
धनु - रोजच्या दैनंदिन कामात प्रयत्नशील राहणे गरजेचे राहील. कुटुंब परिवारातील मुलांना मार्गदर्शनाची गरज भासेल आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता.
मकर - व्यवसाय-धंद्यात अचानक उद्भवलेल्या कामांमुळे गोंधळून जाण्यासारखे वातावरण तयार होईल शांतपणे आपल्या समोरील निर्णय घ्या वाहने सावकाश चालवा नोकरीत चांगली परिस्थिती राहील.
कुंभ - आज दिवसभरात अनपेक्षित घटना घडू शकतात पण त्या सकारात्मक राहतील स्थावर बाबतचे प्रश्न सोडविता येतील मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील.
मीन - जुन्या गुंतवणुकीतून फायदा होईल नवीन गुंतवणूक करण्याची इच्छा होईल. मात्र आर्थिक व्यवहार सावधानतेने करा .कुटुंबातील विद्यार्थ्यांकडून आनंद दायक वार्ता मिळतील.