मेष - जमिनीच्या बद्दलची तसेच स्थावर मालमत्तेची कामे मार्गी लावता येतील तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आपल्या कर्तुत्वाने क्लिष्ट प्रश्न सोडविण्यात आघाडीवर राहाल.
वृषभ - व्यवसायिक जुनी येणी वसूल झाल्यामुळे आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा होईल आरोग्य चांगले राहून प्रवास घडू शकतात कुटुंबासाठी काही महत्त्वाची खरेदी कराल.
मिथुन - आरोग्य उत्तम राहून महत्त्वाची कामे पूर्ण करू शकाल दैनंदिन कामे मार्गी लागतील. व्यवसायात अनुकूल घटना घडून प्रगती तसेच उन्नती होईल.
कर्क - कोणत्यातरी गोष्टीची मनाला हूर लागेल त्यामुळे मानसिक अस्वस्थता जाणवेल आपल्या मौल्यवान वस्तू महत्त्वाची कागदपत्रे यांची काळजी घ्या. वाहन सुरक्षित ठिकाणी पार्क करा.
सिंह - इतरांच्या समस्या सोडवाल. बुद्धिजीवी मंडळींना अनुकूल काळ. कलाकार साहित्यिक व विद्यार्थी यांना आपल्या क्षेत्रात भरीव कार्य करता येईल. कौटुंबिक सौख्य लाभून मानसन्मानाचे योग.
कन्या - नोकरीत उत्तम संधी मिळतील नोकरीसाठी जवळचे तसेच दूरचे प्रवास करावे लागतील नोकरीत नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात तसेच वेतन वृद्धि व पदोन्नती होईल.
तुळ - मित्रमंडळी व कुटुंबातून आपल्याला सहकार्य तसेच मदत मिळू शकते त्याचा फायदा जरूर घ्या. आपले भले कशात आहे हे लक्षात ठेवून पुढील निर्णय घ्या जिद्द व चिकाटी वाढेल.
वृश्चिक - अचानक धनलाभ होण्याची शक्यता अनेकानेक मार्गांनी धनलाभ होऊ शकतो मित्रमंडळींबरोबर मौजमजेत दिवस घालवून मुक्त असते खर्च कराल.
धनु - आपला इतरांवर प्रभाव राहील महत्त्वाची कामे मार्गी लागतील. कुटुंबात लहान मोठ्या कारणांवरुन वाद-विवाद संभवतात.
मकर - करमणूक तसेच मनोरंजनाकडे कल राहील प्रवास घडतील पण प्रवासात काळजी घेणे महत्त्वाचे ठरेल अतिआत्मविश्वास नको.
कुंभ - अपेक्षित महत्त्वाचे पत्रव्यवहार पूर्ण होतील. कुटुंबातील सदस्यांच्या मागण्या वाढल्यामुळे खर्चात वाढ होईल. व्यवसाय धंद्यात अनपेक्षितरित्या खर्चिक बाबी पुढे येतील.
मीन - सकारात्मक घटना घडल्यामुळे मानसिकता स्थिर राहून योग्य निर्णय घेऊ शकाल व्यवसाय समाधानकारक राहील व्यवसायात केलेले बदल सकारात्मक ठरतील.