आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, २७ एप्रिल २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, April 27, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - संघर्षातून यश मिळेल अविरत प्रयत्न करावेत पण अव्यवहार्य धाडस टाळा वादविवादाला अधिक महत्व न देता कार्यरत राहणे महत्त्वाचे ठरेल. विवाह योग्य तरुण-तरुणींचे विवाह ठरतील.

वृषभ - काही वेळेस अचानक खर्च करावा लागेल. कौटुंबिक जीवनात अनुकूल घटना घडतील व्यवसायिकांना नव्या संकल्पना राबविण्यात यश लाभेल. नोकरी मधील वातावरण उत्साह वाढवेल.

मिथुन - धनप्राप्ती चांगली राहील सरकार दरबारी रखडलेली कामे मार्गी लावण्यात यशस्वी व्हाल आरोग्याची काळजी घ्यावी जीवनसाथी कडून योग्य ते सहकार्य मिळेल.

कर्क - दिवस थोडा सावधगिरीने वागण्याचा आहे मतभेदाचे प्रसंग युक्तीने हाताळा .आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न करू नका कामकाजाचे वेळापत्रक सांभाळावे लागेल.

सिंह - काही महत्त्वाच्या कामात यश मिळेल कलाकारांच्या कलेला वाव मिळेल मानसन्मान प्राप्त होईल कामानिमित्त प्रवास संभवतो मित्रपरिवारात वाद-विवाद टाळणे गरजेचे राहील.

कन्या - लहान-मोठ्या प्रसंगावरून होणारे वाद-विवाद टाळले तर मनस्ताप होणार नाही. कार्यमग्न राहणे हिताचे ठरेल जमीन जुबल याबाबतची रखडलेली कामे गतिशील होतील.

तुळ - थोडा मानसिक ताण तणाव राहील आपल्या उद्दिष्टपूर्तीसाठी अडथळ्यांची शर्यत पार करावी लागेल अनपेक्षित वाद विवाद निर्माण होऊ शकतात ते टाळणे आवश्यक राहील.

वृश्चिक - आपल्या कार्यक्षेत्रातील नव्या योजना कार्यान्वित होतील घेतलेल्या कष्टाचे चीज झाल्यासारखे वाटेल शत्रूंवर विजय मिळवाल कुटुंबा मधून सुवार्ता मिळतील.

धनु - आर्थिक व्यवहार जरा जपूनच करा. आवडणाऱ्या व्यक्तींपासून सावध राहा भागीदारी व्यवसायात मतभेद होण्याची शक्यता आहे कुटुंबांमध्ये काही महत्त्वाच्या बाबीत तडजोड करावी लागेल .

मकर - आपल्या कार्यात मग्न राहणे इष्ट ठरेल इतरांच्या भानगडीत मध्ये पडू नका नोकरी व्यवसायातील गुप्त शत्रूंच्या कारवायात वाढ होऊ शकते गाफील राहू नका आरोग्याची काळजी घ्या.

कुंभ - महत्त्वाच्या कामात आपल्या प्रयत्नांमुळे यश संपादन करता येईल मिळणाऱ्या यशाने हुरळून जाऊ नका कर्तव्य दक्ष राहा कार्य सिद्धी चा आनंद समाधान व आर्थिक लाभ देईल.

मीन - कुटुंबामधील वाद विवांता सामंजस्याने सोडवा मनाविरुद्ध काही बाबी घडणार आहेत परंतु नाराजी दर्शवली नका स्थावर विषयक व्यवहार लाभदायक ठरतील.

तुम्हालाही नकळत ताण येतोय? 'या' सवयी ठरू शकतात कारण; वाचा तज्ज्ञ काय सांगतात

जेवणाची चव वाढवणारा किसलेल्या कैरीचा गोड-तिखट मुरांबा; एकदा ट्राय कराच!

AC आणि पंखा एकत्र वापरल्याने वीज बिल कमी येते का? जाणून घ्या उन्हाळ्यात कूलिंग वाढवण्याची योग्य पद्धत!

डब्यातल्या पोळ्या घामट किंवा ओलसर होतात? 'या' ३ सोप्या ट्रिक्सने उन्हाळ्यातही राहतील मऊ आणि ताज्या!

उकाड्यात चिमुकल्यांची घ्या विशेष काळजी; पालकांनी लक्षात ठेवाव्यात 'या' महत्त्वाच्या गोष्टी