आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, २७ मे २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, May 27, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - आपल्या व्यक्तिमत्त्वाची समोरच्या व्यक्तीवर ती छाप पडेल. आपले म्हणणे समोरच्या व्यक्तीला पटवून देण्यात यश मिळेल परंतु आपल्या बोलण्यामध्ये आक्रमकता कमी ठेवा.

वृषभ - पूर्वी केलेले नियोजन उपयोगी पडेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहिल्याने खर्च मनसोक्त कराल परंतु उत्साहाच्या भरात अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक सुख मिळेल.

मिथुन - बरेच दिवस एखादे महत्त्वाचे काम पूर्ण होण्याची आपण वाट बघत असाल तर ते काम आज पूर्ण होऊ शकते महत्त्वाच्या व्यक्तींच्या गाठीभेटी होतील. खर्चामध्ये अनपेक्षित वाढ.

कर्क - कामाची व्याप्ती वाढल्यामुळे कार्य मग्न रहाल. व्यवसाय धंद्यात जास्तीची जबाबदारी स्वीकारावी लागेल. अचानक काही सरकारी स्वरूपाची कामे उद्भवल्या मुळे धावपळ करावी लागेल.

सिंह - भागीदारीच्या व्यवसायात काही महत्वाचे निर्णयाबाबत भागीदार आपल्यावरती अवलंबून राहील शांतपणे व पूर्ण विचारांती निर्णय घेण्याची गरज. आर्थिक परिस्थिती चांगली राहील.

कन्या - आप्तेष्ट नातेवाईक अथवा मित्रमंडळी यांच्या सहवासात दिवस आनंदात जाईल मनोरंजनासाठी खर्च करावे काहींना प्रवासाचे योग आहेत. प्रवासाचे नियोजन होईल.

तुळ - स्वतःवर खर्च करण्याची इच्छा होईल मित्रमंडळींच्या मध्ये प्रिय व्हाल सामाजिक कार्यात मन रमेल. जवळचे प्रवास घडू शकतात पण प्रवासात अतिआत्मविश्वास व स्पर्धा टाळा.

वृश्चिक - व्यवसाय धंद्यामध्ये नवीन संकल्पनांचा तसेच नवीन तंत्रज्ञानाचा वापर केल्यास तो व्यवसाय साठी पोषक ठरून व्यवसाय वृद्धी होण्यास मदत होईल. आर्थिक परिस्थिती चांगली राहील.

धनु - नोकरीमध्ये वरिष्ठांची मर्जी सांभाळण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील वेळप्रसंगी आपल्या मतास जरा बाजूला ठेवा. आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न करू नका.

मकर - कुटुंब परिवारात कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य बरोबर वादविवादाची शक्यता आहे. त्यांचे म्हणणे पूर्णपणे ऐकून आपली प्रतिक्रिया व्यक्त करा. मित्रमंडळींच्या सह मनोरंजनासाठी खर्च कराल.

कुंभ - दैनंदिन कामे सुकर होतील. सकारात्मक विचारांच्या व्यक्ती भेटल्यामुळे समाधान मिळेल महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल गुरुतुल्य व्यक्तींचे मार्गदर्शन लाभेल.

मीन - अचानक धनलाभ होण्याची शक्यता व्यवसाय-धंद्यात जुनी येणी वसूल झाल्यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारेल काही नवीन निर्णय घेऊ शकाल आपली देणी चुकती करू शकाल.

'हापूस'वर गुजरातचा डोळा; नावावर वलसाडची दावेदारी, बाजारपेठ काबीज करण्याचा डाव

'गोकुळ'च्या अध्यादेशासाठी मोजले ८० लाख! राज्य सरकारकडून ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांना देयक अदा

साखर कारखानदारीला 'घरघर'! ऊस गाळप करणाऱ्या राज्यातील सहकारी कारखान्यांची संख्या १०० च्या आत, कारखान्यांच्या पुनरुज्जीवनासाठी विशेष समिती

Mumbai : उद्यान, मैदानात आता राज्य सुरक्षा मंडळाचे जवान तैनात; अमित साटम यांची आयुक्तांबरोबर बैठक संपन्न

Mumbai : बांधकामस्थळी सेफ्टी नेट बंधनकारक; तरंच सीसी, ओसी, सभागृहाची मंजुरी