आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, २८ फेब्रुवारी २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, February 28, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - समाजामध्ये आपले वर्चस्व वाढणार आहे. अवघड कामे सुद्धा सहज रित्या पूर्ण करण्याची मानसिकता आपल्या मध्ये असणार आहे. पेंडिंग कामे पण पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.

वृषभ -आपल्यावर कामाचा ताण असणार आहे. थोड्या प्रकृतीच्या कुरबुरी असल्यामुळे चिडचिड होऊ शकते.आपल्या जोडीदाराशी वैचारिक मतभेद होण्याची शक्यता आहे.

मिथुन -आपल्या कार्यक्षेत्रात चांगल्या प्रकारे वाढ होणार आहे.आपण आपल्या बुद्धी चातुर्याने व कौशल्याने कोणत्याही प्रकारच्या कठीण समस्या चांगल्या प्रकारे सोडवू शकाल.

कर्क -आपल्या कार्यक्षेत्रात आपल्या अधिकारांमध्ये वाढ होणार आहे. ज्या व्यक्ती सरकारी नोकरी करतात त्यांना आजचा दिवस अतिशय चांगला आहे.

सिंह -आपल्या कार्यक्षेत्रात काही नवीन योजना आपण अमलात आणण्याचा प्रयत्न करत होता त्या योजना आता कार्यरत होतील. त्यातून सामाजिक आणि आर्थिक फायदा होणार आहे.

कन्या - आज आपल्या मध्ये मनोबल फार कमी असणार आहे. त्यामुळे कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेण्याचे टाळा. व्यापार व्यवसायामध्ये हवे तसे परिणाम मिळणार नाहीत.

तुळ - आपल्या व्यापार-व्यवसायात नवीन योजना अमलात आणू शकता. त्यातून आपल्याला चांगले फायदे मिळू शकतात.आपला जबाबदारीचा व्यवसाय असेल तर त्यामध्ये चांगली वृद्धी होईल.

वृश्चिक - आपल्या जीवनसाथी व बरोबर छोट्या कारणांनी वाद-विवाद होऊ शकतात. नोकरी करणाऱ्यांना आजचा दिवस चांगला आहे. आपल्याला सहकारी व्यक्तींचे सहकार्य मिळणार आहे.

धनु - विद्यार्थी वर्गाला काही नवीन करण्याची प्रेरणा मिळणार आहे. कला क्षेत्रातील व्यक्तींना तसेच लेखकांना चांगली संधी मिळणार आहे. व्यापार व्यवसायामध्ये नवीन नवीन योजना कार्यान्वित कराल.

मकर - आपण आपल्या कार्यक्षेत्रात किंवा खाजगी आयुष्यात प्रत्येक गोष्टी मध्ये सतर्क राहणे आवश्यक आहे. कोणी आपल्या पद प्रतिष्ठेला बाधा आणत नाही ना याची काळजी घ्या.

कुंभ - ज्या जातकांचा व्यवसाय इम्पोर्ट एक्सपोर्ट आहे, त्यांना विदेशांमधून नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थितीमध्ये आता पेक्षा चांगली सुधारणा होणार आहे.

मीन - उत्पन्नाचे नवे साधन मिळू शकते. आर्थिक येणी येणार असतील तर ती येतील. कुटुंबीयांसाठी काही खर्च करणार आहात. जास्त खर्च झाला तरी पण त्याच प्रमाणात आपल्याला राहणार आहे.

विद्यापीठांचे खासगीकरण धोक्याची घंटा

Holi 2026 : होळी स्पेशल ड्रायफ्रूट्स थंडाई; पाहुण्यांसाठी परफेक्ट ड्रिंक, नोट करा रेसिपी

आता जिल्हा परिषदेतही स्वीकृत सदस्य; राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण  निर्णय

Mumbai : प्रदूषण रोखण्यासाठी झाडाझडती; BMCच्या दणक्यानंतर २२२४ बांधकाम साइट्सवर सेन्सर मशीन कार्यान्वित

४८ तासांपूर्वी विमान तिकीट रद्द केल्यास अतिरिक्त शुल्क नाही; DGCAने विमान तिकीट परताव्याचे नियम बदलले