आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, ७ ऑक्टोबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, October 7, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - हाती घेतलेले काम सातत्याने केल्याने त्यामध्ये सुयश लाभणार आहे. महत्त्वाची कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न केल्यास लवकर लागतील. कामामध्ये सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल.

वृषभ - अपेक्षित काम वेळेवर होणार नाही कामांमध्ये भरपूर वेळ जाणार आहे, त्यामुळे कामाचे प्लॅनिंग करा. व्यवस्थित नियोजन केल्यास आर्थिक नुकसान होणार नाही.

मिथुन - नवीन संधी मिळतील, अपेक्षित संधीची वाट बघत होता ती येईल .तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव राहणार आहे. महत्त्वाच्या कामात चातुर्य दाखवा, त्यामुळे यश येणार आहे.

कर्क - कुटुंबातील जबाबदाऱ्या वाढणार आहेत. महत्त्वांच्या गरजांकडे लक्ष द्यावे लागणार आहे. महत्वाच्या कामांमध्ये कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य मिळेल.

सिंह - व्यापार-व्यवसायात संभावित बदल होणार आहेत. यासाठी केलेले नियोजन आपणास फायदेशीर ठरणार आहे. आपल्या कर्तृत्वाचा ठसा निर्माण कराल.

कन्या - आत्मविश्वासाने काम करावेलागणार आहे. महत्त्वाची कामे आज करून घ्या. सरकारी कामे काही राहिलेली असल्यास तीही आज करून घ्या.

तुळ - जनसंपर्क वाढणार आहे. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल, मोठ्या लोकांची संबंध येतील. सुसंवाद होतील. मोठ्या प्रमाणावर काम करण्याचा संकल्प असेल, त्यासाठी व्यवस्थित नियोजन करा.

वृश्चिक - मन अनुत्साही असेल. काम करावे असे वाटणार नाही. हाताखालील लोकांचे सहाय्य घ्यावे लागणार आहे. जास्त काम हे करावे लागणार आहे.

धनु - अपेक्षित सुसंधी लाभतील आपली मते दुसऱ्याला व्यवस्थित पाठवून द्याल. नोकरी व्यवसायांमध्ये जास्त उलाढाली होतील अपेक्षित परिणाम आपणास मिळणार आहे.

मकर - हितशत्रू डोके वर काढणार आहे. उगाचच वादविवादाला तोंड फोडू नका ,तुमचे मत बरोबर आहे ते ते कालांतराने समोर येणारच आहे. आपल्या कामामध्ये मन लावून लक्ष द्या.

कुंभ -आजची महत्त्वाची कामे तुम्ही जिद्द आणि चिकाटीने पूर्ण कराल. नवीन नवीन परिचय होतील. त्यातून नवीन संधी मिळणार आहे. प्रतिष्ठा उंचावेल.

मीन - नोकरी व्यवसायात प्रगती कराल. नवीन आव्हाने समोर आली तरी योग्य काम हातून होईल. अपेक्षित गाठीभेटी होऊन नवीन कामे हाती घ्याल जनसंपर्क वाढवण्याचा प्रयत्न करा.

नवी मुंबई विमानतळावरून FLY91ने घेतली भरारी! 'या' ४ ठिकाणी थेट विमानसेवा; पहिल्या फ्लाइटचं खास स्वागत, VIDEO

Thane : भविष्यात ठाण्यात पाणी टंचाईचे सावट गडद; ३१ एमएलडीची तूट

Mumbai : बेस्ट, रेल्वे, MMRDA पालिकेचे थकबाकीदार; पाण्याच्या बिलापोटी चार हजार कोटी थकवले

भटक्या श्वानांना आता कायमस्वरूपी निवारा; निर्बीजीकरणानंतर भटक्या कुत्र्यांचे ठिकाण बदलणार, प्रती श्वान १५५ रुपये खर्च करणार

'ऑक्टोबर हिट'चा सिंधुदुर्गाला तडाखा; वाढत्या उष्णतेने नागरिक हैराण; तापमान ३४ ते ३६ अंश दरम्यान