आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य,९ एप्रिल २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, April 9, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

Swapnil S

मेष - अभिनेते नाट्य कलाकार गायक संगीतकार अशा व्यक्तींना हा दिवस भरपूर यश मिळवून देईल. नवीन कामे मिळतील. आपल्या हातून एखादी चांगली कलाकृती सादर होईल.

वृषभ - आपल्या कार्यक्षेत्रात अनुकूल वारे वाहण्यास सुरुवात होईल. अधिकार कक्षा रुंदावतील विरोध मावळेल. आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर वाद-विवाद टाळावा.

मिथुन - सत्तेचा गैरवापर टाळावा कोणालाही अपमानास्पद वागणूक देऊ नका. सद्वर्तन ठेवा. सकारात्मक घटना घडतील. विचारवंतांचे चिंतन-मनन योग्य दिशेने सुरू राहील.

कर्क - काही महत्त्वाच्या घटना घटित झाल्यामुळे मनस्थिती थोडीशी संवेदनशील आणि अस्वस्थ बनू शकते. पोकळ डामडौल याच्या आहारी जाऊ नका. मित्रपरिवारात जास्त वेळ जाईल.

सिंह - एकांतात राहून विशेष नियोजन आणि कामांची आखणी करावी. काही चांगले अनुभव येतील. नवीन कामांची आखणी यशस्वी होईल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील.

कन्या - दैनंदिन कामे पूर्ण करण्यासाठी धावपळ करावी लागेल कोणत्याही कामात वाद-विवाद टाळा आपल्या क्षमता इतकीच तांबे अंगावर घ्या.

तुळ - आजचा दिवस अनुकूल आणि आनंदी राहील मनाची प्रसन्नता लाभेल. सदाचारी वृत्ती वाढू शकते. हातातील कामे सहज मार्गी लागतील.

वृश्चिक - प्रगती कारक दिवस राहील. प्रकृतीच्या काही तक्रारी वाढू शकतात. थोडा शारीरिक त्रास होण्याची शक्यता कामाचा उरक जास्त असला तरी थोडेसे प्रकृतीकडे लक्ष देणे गरजेचे ठरेल.

धनु - मानसिक ताण तणाव बऱ्याच प्रमाणात कमी झालेला अनुभवता येईल. आपल्या कामात कार्यमग्न राहाल. संपादक कवी लेखक प्रकाशक यांना आर्थिक लाभ होऊ शकतो.

मकर - आपले कौशल्य सिद्ध करण्याच्या अनेक संधी उपलब्ध होतील. मात्र आपण कार्य दक्ष राहणे जरुरीचे आहे. व्यवसाय धंद्यामध्ये दिवस प्रगती कारक राहील.

कुंभ - अभ्यास भवितव्य आणि महत्वकांक्षा याविषयी जागरूक कराल. अतुल मिळालेली ही प्रेरणा भविष्यात उपयोगी पडेल. घरातील वातावरण आनंदी आणि चांगले राहील.

मीन - आपल्या कार्यक्षेत्रात नवीन संकल्पना व नवीन तंत्रज्ञान यांचा वापर करून व्यवसायास पोषक वातावरण तयार कराल. कामांमधील उत्साह वाढेल. व्यवसाय धंद्यात जुनी येणे वसूल होईल.

महावितरण कंपनीच्या विभाजनावर शिक्कामोर्तब; शेतीच्या वीजपुरवठ्यासाठी स्वतंत्र कंपनी महावितरणचा IPO येणार

आता राज्यभरातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास चार वर्षांचा होणार; विद्यापीठांमध्ये २०२६-२७ पासून 'ऑनर्स' आणि 'संशोधन' पदवीचे नवे पर्याय उपलब्ध

Mumbai : बेस्टला आर्थिक बळाची गरज; महाव्यवस्थापकांचे पालिका आयुक्तांना निवेदन; एकरकमी ४ हजार कोटी देण्याची मागणी

उरण : आदिवासी वाड्यांची पाण्यासाठी वणवण; रानसई-पुनाडे धरणात अवघा ४७% साठा

आंतरजातीय विवाहामुळे जैन कुटुंबावर सामाजिक बहिष्कार; ठाण्यातील धक्कादायक प्रकार