आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, १ फेब्रुवारी २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, February 1, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - आपली आज समाधानी वृत्ती राहणार आहे. नवीन लोकांच्या ओळखी होतील. सोपी कामे हातावेगळी करून टाका. घाईघाईने कोणतेही निर्णय घेऊ नका. निर्णय विचारपूर्वक घ्या.

वृषभ - नवीन व्यवसायासाठी गुंतवणूक करण्याचा विचार असेल व्यवसायासाठी नवीन मार्ग सुचतील. नवीन उधारी करू नका. खर्चाचे प्रमाण वाढते राहणार आहे.

मिथुन - नवीन परिचय होण्याची शक्यता आहे. तुमच्यावर महत्त्वाची जबाबदारी लिहून पडण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहणार आहे.

कर्क - दैनंदिन कामे मार्गी लागणार आहेत. नोकरीत आपली स्थिती चांगली राहणार आहे. वरिष्ठांचे सहकार्य आपणास मिळणार आहे. हे सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हाल.

सिंह - धार्मिक कार्यात सहभागी होणार आहात.हातून दान-धर्म घडणार आहे. प्रवासाचे योग येतील. भाग्याची चांगली साथ राहील. आपल्याला धनलक्ष्मी प्रसन्न राहणार आहे.

कन्या - घरामध्ये वाद विवाद टाळणे आवश्यक आहे. सकारात्मक विचारांना प्राधान्य द्या. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. आर्थिक आवक चांगली राहील. मनात विचारांची गर्दी होईल.

तुळ - विविध मार्गाने धनप्राप्ती होईल. एखाद्या समारंभात सहभागी होण्याची शक्यता आहे. नवीन ओळखी होणार आहेत. मित्रमैत्रिणींच्या काठी होतील भेटवस्तूंची देवाणघेवाण होईल.

वृश्चिक - नोकरीस सामान्य परिस्थिती राहणार आहे. वाद-विवाद टाळणे आवश्यक आहे.मनामध्ये विचार राहणार आहेत. घरगुती वाद आपणास त्रस्त करणार आहेत. आरोग्याची काळजी घ्या.

धनु - घरामध्ये आनंदी वातावरण असणार आहे. नोकरीत चांगला कालावधी आहे. तरुणवर्गाला प्रेमात यश मिळणार आहे. तुला प्रेमाची कबुली देण्यास हरकत नाही. मुलांची प्रगती होणार आहे.

मकर - आज आपली दैनंदिन कामे मार्गी लागणार आहेत. प्रॉपर्टी व्यवहार पुढे सरकणार आहेत. घरातील महत्त्वाची जबाबदारी आपल्यावर सोपवण्यात येणार आहे.

कुंभ - तरुणांना नोकरी व्यवसायामध्ये चांगली संधी मिळणार आहे. आपल्या कामांमध्ये प्रगती होणार आहे. नोकरीस ची अपेक्षित संधी येण्याची शक्यता आहे. पैशाची आवक चांगली राहणार आहे.

मीन - प्रगतीचा वेग उंचावणार आहे. पैशाची आवक चांगली राहणार आहे. आज अचानक धनलाभ होऊ शकतो. मित्र नातेवाईक यांच्याशी संपर्क राहणार आहे.

Union Budget 2026 : मुंबई-पुणे प्रवास होणार सुसाट; नवीन आयकर कायदा १ एप्रिलपासून; अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा एकाच क्लिकवर

भारताच्या 'ऑरेंज इकॉनॉमी'ला मिळाला IIT चा दर्जा! बजेट २०२६ मध्ये क्रिएटर इकॉनॉमीसाठी मोठी घोषणा

Thane : महापालिकेत नवीन समीकरणांची नांदी; स्थायी समिती व स्वीकृत पदांसाठी शिंदेसेना-भाजपमध्ये लॉबिंग

रायबाकिनाला जेतेपद; आर्यना सबालेंकाचा झंझावात रोखला; ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावणारी कझाकस्तानची पहिली टेनिसपटू

Nirmala Sitharaman : यंदाची 'बजेट डे साडी' आहे खास! काय आहेत वैशिष्ट्य? याआधीही नेसल्या होत्या युनिक साड्या; पाहा Photo's