राशीभविष्य

फेब्रुवारी महिना कसा जाईल? बघा धनु आणि मकर राशीचे भविष्य

तुमच्यासाठी कसा आहे फेब्रुवारी महिना? जाणून घ्या...

नवशक्ती Web Desk

२, ३, १०, १३, १८, २२,२५,२६,२७


डॉ. सविता महाडिक, ज्योतिष भूषण

धनु

नशिबाची साथ मिळणार आहे

धनु रास ही गुरुची रास आहे या राशीतील सव्वादोन नक्षत्र म्हणजे मूळ नक्षत्र व पूर्वषाढा नक्षत्र, उत्तरा शाढा नक्षत्र होय पूर्वाशाढा ही शुक्राचे नक्षत्र आहे उत्तराशाढा हे नक्षत्र रवीचे नक्षत्र आहे मूळ नक्षत्र केतूचे नक्षत्र आहे मूळ नक्षत्र राक्षसगणी नक्षत्र आहे पूर्वा शाढा हे नक्षत्र मनुष्यगणी नक्षत्र आहे उत्तराशाढा हे मनुष्य गणि नक्षत्र आहे मूळ नक्षत्राची वैशिष्ट्ये म्हणजे जातक गर्विष्ठ धनवान अहिंसक सुखी भोगी स्थिर बुद्धी असणारा रागीट तेजस्वी राजकारणी कुलश्रेष्ठ महत्त्वकांक्षी विषयासक्त दयाळू एकांतप्रिय स्वावलंबी बाग बगीचांची आवड असणारा कठीण प्रसंगात वारंवार सापडणारा,पूर्वाशाढा नक्षत्राची वैशिष्ट्य म्हणजे जातक आनंदी अशा स्त्रीने युक्त गर्विष्ठ मैत्री कायम टिकवणारा पैशाचा लोभी कैदेत सापडणारा नोकरीची आवड असणारा असा असतो उत्तराशाढा नक्षत्राची वैशिष्ट्य म्हणजे जातक हा नम्र धार्मिक परमेश्वरावरती श्रद्धा असणारा अनेक मित्र असणारा विद्वान कृतज्ञ सौभाग्य शरीर स्थळे व मजबूत पक्षांची आवड शिस्तबद्धतेची आवड लष्करी बाणा असतो.

शिक्षण : शिक्षक क्षेत्रातील कोणत्याही शाखेमध्ये आपण शिक्षण घेत असला तर आपल्याला जरा जास्त अभ्यास करण्याची आवश्यकता आहे आपले लक्ष केंद्रित करण्यासाठी विशेष प्रयत्नांची आवश्यकता आहे त्यासाठी इतरांचे मार्गदर्शन घ्यावे लागले तरी आपण ते जरूर घ्या त्याचा फायदा होईल व हिताचे ठरेल. वेळेचे नियोजन उपयोगी पडेल इतरत्र वेळ वाया घालवू नका आलेल्या संधीचा चांगला फायदा करून घ्या कला व क्रीडा क्षेत्रामध्ये आपले कर्तृत्व सिद्ध करण्याच्या अनेक संधी उपलब्ध होतील परदेशी जाऊन उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न योग्य प्रयत्न केल्यास सफल होतील.

पारिवारिक : परिवारात काही वेळेस समज गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे काही वेळेस कुटुंबातील शांतता भंग होऊ शकते विशेषतः परिवारातील महिलांच्या संवादात फरक पडू शकतो त्यामुळे महिलांनी कमी बोलणे महत्त्वाचे ठरेल स्वतःच्या कामात लक्ष दिल्यास परिवारासाठी ते उपयोगी ठरेल व शांतता टिकेल काही वेळेस मात्र आपल्याला कुटुंब परिवारातील शांतता टिकवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील आर्थिक चांगला राहील. आप्तेष्ट नातेवाईक अथवा भावंडे यांच्याबरोबर वादविवाद टाळणे हिताचे ठरेल एखाद्या समारंभात मानपानावरून रंगाचा बेरंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नोकरी-व्यापार-व्यवसाय : आपल्या जीवनातील प्रत्येक कार्यक्षेत्रात आपल्याला सदरच्या कालावधीमध्ये नशिबाची साथ मिळणार आहे. तुम्ही केलेल्या नियोजनात अपेक्षेनुसार यश मिळेल. आपल्या कुटुंब परिवारातून तसेच आपल्या कार्यक्षेत्रातून म्हणजेच नोकरी धंदा व्यवसायातून आपल्याला हवे तसे सहकार्य हव्या त्या व्यक्तींचे मिळणार आहे नशीब आपल्या बाजूने आहे शुभ ग्रहांचे उत्कृष्ट पाठबळ मिळू शकते दीर्घकाळ रखडलेली महत्त्वाची कामे मार्गी लागतील चालू नोकरीमध्ये अपेक्षित घटना घटित होऊन परिस्थितीजन्य लाभ मिळतील काहींचा परदेशी भाग्यदय होऊ शकतो.

शुभ दिनांक : २, ३, १०, १३, १८, २२,२५,२६,२७

मकर

उत्तम शुभ फळे प्रतिपादित होतील

मकर रास ही शनीची रास मानली गेलेली आहे या राशीतील सव्वा दोन नक्षत्र म्हणजे उत्तराशाढा नक्षत्र ,श्रवण नक्षत्र व धनिष्ठा नक्षत्र आहेत.श्रवण नक्षत्र चंद्राचे नक्षत्र आहे. उत्तराशाढा नक्षत्र रवीचे नक्षत्र आहे धनिष्ठा नक्षत्र मंगळाचे आहे. उत्तरा शाढा नक्षत्र मनुष्यगणि आहे आहे धनिष्ठा नक्षत्र राक्षसगणी आहे.उत्तरा शाळा नक्षत्राची वैशिष्ट्य म्हणजे जातक विद्वान नंबर धार्मिक अनेक मित्र असणारा कृतज्ञ सौभाग्य मजबूत पशुपक्ष्यांचे आवड असणारा असलेला असा असतो श्रवण नक्षत्राचा जातक श्रीमान पंडित उदार अशा स्त्रीने युक्त कीर्तिमान कांतीमान शास्त्रीय ईश्वर भक्त आचारसंपन्न कर्तुत्ववान स्पष्टवक्ता सत्यवक्ता साहसी लोकप्रिय मित्रमंडळींच्या वर्तुळामध्ये प्रिय होणारा असा असतो धनिष्ठा नक्षत्राची वैशिष्ट्य म्हणजे जातक श्रीमंत शूर खादाड दुष्ट गायनप्रिय साहसी हिंसक निर्लज्ज चंचल धर्मावर प्रेम करणारा पराक्रमी धनलोभी पराक्रमी मित्र कमी स्त्रियांचा द्वेष करणारा अविचारी दुःख भोगणारा असा असतो उत्तरा शाढा नक्षत्राचे तीन चरण श्रवण नक्षत्राचे चार चरण आणि धनिष्ठा नक्षत्राचे दोन चरण मिळून मकर रास तयार होते.

शिक्षण : शिक्षणाच्या बाबतीत अनुकूल कालावधी असला तरी नियमित अभ्यास करावा लागणार आहे त्याचा पूर्णपणे व चांगला उपयोग होईल प्रयत्न योग्य दिशांनी होतील कला क्रीडा क्षेत्रातील जातकांना आपले कर्तृत्व सिद्ध करण्याच्या योग्य त्या संधी उपलब्ध होतील परदेशा संबंधीत शिक्षणासाठी योग्य ग्रहमान लाभलेले आहे कला आणि क्रीडा क्षेत्रात कामगिरी होऊ शकते प्रसिद्धी मिळू शकते.

पारिवारिक : कुटुंब परिवारातील जबाबदारी जास्त पडणार आहे त्याची तयारी ठेवा जास्त आलेल्या जबाबदारीमुळे मन बेचैन होऊ शकते अशा वेळेस मन शांत ठेवणे जरुरी आहे काही वेळेस महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागण्याची शक्यता आहे कोणताही लहान मोठा निर्णय पूर्णपणे विचारांती व शांतपणे घेतल्यास तो आपल्या हिताचा ठरेल कुटुंब परिवारातील सदस्यांचे विशेषता कुटुंबातील ज्येष्ठांचे सहकार्य लाभेल आर्थिकदृष्ट्या चांगला कालावधी आहे.

नोकरी-व्यापार-व्यवसाय : अनुकूल ग्रहमानाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला या काळामध्ये उत्तम शुभ फळे प्रतिपादित होतील कुटुंब परिवारात सुवार्ता मिळतील कुटुंब परिवारातील तरुण-तरुणींचे प्रश्न मिटतील विशेषतः नोकरी संबंधित समस्या संपुष्टात येऊन नोकरीविषयक कामे होतील त्याचप्रमाणे त्यांच्या विवाह ठरण्यातील अडचणी दूर होऊन विवाह निश्चित होतील काहींचे प्रेम विवाह संभवतात विद्यार्थी विद्यार्थिनींना शुभ कालावधी आपल्या आवडत्या क्षेत्रात कार्य करण्याची संधी मिळेल त्याचप्रमाणे परदेशी जाऊन उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न साकार होऊ शकते मात्र प्रामाणिक कष्ट व परिश्रम घेण्याची तयारी ठेवा प्रयत्न सफल होतील उज्वल भविष्य आपली वाट बघत आहे आपल्या कार्यक्षेत्रातील व्यवसाय धंद्यातील महत्त्वाची सरकारी कामे मार्गी लावू शकाल त्यासाठी जास्तीचा वेळ व खर्च करावा लागण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे दीर्घकाळ रखडलेली कामे गतिशील होतील.

शुभ दिनांक :२, ३, ५, १०, १८, १९, २०,२६,२८

हनीमून मर्डर 2.0 ! पत्नीनेच काढला पतीचा काटा; प्रियकरासह रचला होता कट, पोलिसांच्या तपासात झाला धक्कादायक खुलासा

Mumbai : भांडुपमधील लग्नाच्या रिसेप्शनमध्ये थरार! लिफ्ट तिसऱ्या मजल्यावरून थेट बेसमेंटमध्ये कोसळली; एकच गोंधळ, अनेकजण जखमी

"मुंबई-पुणे हायस्पीड ट्रेन होईल तेव्हा होईल, पण आधी.."; एक्स्प्रेस-वे कोंडीवरून राज ठाकरे संतापले; म्हणाले - "सरकारने टोल परत करावा"

सिक्रेट अकाउंट, कोरियन आकर्षण अन् 'ती' डायरी...; तीन सख्ख्या बहिणींच्या आत्महत्या प्रकरणात नवीन माहिती समोर

३३ तासांनंतर...मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अभूतपूर्व कोंडी फुटली, अखेर टँकर हटवला