डॉ. सविता महाडिक, ज्योतिष भूषण
सिंह
विशेष उत्कर्ष होईल
सिंह ही सूर्याची रास आहे. सिंह राशीतील सव्वादोन नक्षत्र म्हणजे मगा नक्षत्र व पूर्व फाल्गुनी व उत्तरा फाल्गुनी. या नक्षत्रांचा समावेश सिंह राशीमध्ये होतो. माघार नक्षत्र हे केतूचे नक्षत्र आहे. पूर्व फाल्गुनी हे शुक्राचे नक्षत्र आहे, तर उत्तरा फाल्गुनी हे सूर्याचे नक्षत्र आहे. मघा हे राक्षसगणी नक्षत्र आहे. उत्तरा फाल्गुनी हे नक्षत्र मनुष्यगणी नक्षत्र आहे व पूर्व फाल्गुनी हे नक्षत्र पण मनुष्यगणी आहे. मघा नक्षत्राचे स्वरूप म्हणजे नोकरचाकर खूप ठेवणारा, धनवान, भोगी देव, पितृभक्त उद्योगशील, बलवान, गर्विष्ठ, जगप्रसिद्ध, हिमती व विलक्षण साहसी, मजबूत शरीर, वर्ण काळा, राजकारणी असे स्वरूप असते. पूर्वा भाद्रपदा नक्षत्राचे स्वरूप म्हणजे जातक दाता, भाषणप्रिय, चपळ, कांतीवन, प्रवासी, राज्य व्यापारी, तालीमबाज, सत्वगुणी कामी नाट्यकला संपन्न, असा असतो उत्तरा भाद्रपदाचा जातक. स्वतःच्या विद्येवर धन कमावणारा, उदार वृत्तीचा, चांगल्या लोकांचा सहवास ठेवणारा. सहसा कोणतेही व्यसन न करणारा, कृतज्ञ, लोकप्रसिद्ध, परंतु निष्काळजी. आळसाकडे प्रकृती असली तरी निश्चय केल्यास ध्येय गाठण्यासाठी विश्रांत उद्योग व श्रम घेणारा असा जातक असतो. मघा नक्षत्राचे चार चरण, पूर्व भाद्रपदा नक्षत्राचे चार चरण, उत्तरा भाद्रपदाचे एक चरण मिळून सिंह रास तयार होते.
शिक्षण : शिक्षण क्षेत्रातील कोणत्याही शाखेतील शिक्षण घेण्यासाठी अनुकूल ग्रहांची साथ आपल्याला मिळणार आहे. तरी काही ग्रहांमुळे अभ्यासात अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच क्षेत्रातील शिक्षणासाठी अभ्यासात सातत्य ठेवणे आवश्यक आहे. इतरत्र वेळ न घालवता अभ्यासावर लक्ष केंद्रित करायला पाहिजे. कला व क्रीडा क्षेत्रातील जातकांनी सुद्धा सरावावर जास्त लक्ष देणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे प्रयत्नात सातत्य ठेवणे गरजेचे आहे. म्हणजेच उज्ज्वल भविष्यासाठी ते प्रयत्न सफल होतील.
पारिवारिक : काही वेळेस कुटुंबामध्ये लहानसहान कारणांवरून वादविवादाची शक्यता नाकारता येत नाही. घरातील विसंवाद मिटविण्यासाठी व शांतता प्रस्थापित करण्यासाठी आपल्याला सुसंवाद प्रत्येकाशी साधावा लागेल. थोडक्यात आपल्याला पुढाकार घ्यावा लागेल व गैरसमज दूर करावे लागतील. त्यामुळे काही कामांना विलंब लागण्याची शक्यता आहे.
नोकरी-व्यापार-व्यवसाय : सुरुवातीपासूनच या कालावधीमध्ये आपल्याला भाग्यकारक घटना होताना दिसतील. आपल्यासमोरील कामे आपण वेगाने व पूर्ण आत्मविश्वासाने पूर्ण करू शकाल. नवीन कामे तेवढ्याच उमेदीने हाती घ्याल. आपल्याला कार्यक्षेत्रात यशाची परंपरा लाभणार आहे. व्यवसाय-धंद्यातील परिस्थिती सुधारून व्यावसायिक तेजीचा अनुभव घ्याल, उलाढाल वाढून नफ्याच्या प्रमाणात वाढ होईल. नवीन संकल्पना वापरता येतील. भागीदारीच्या व्यवसायात विशेष उत्कर्ष होईल. स्पर्धकांवर मात करू शकाल. आपल्या स्वतःच्या मालकीच्या जागेत व्यवसाय सुरू करण्याचे नियोजन करू शकाल.
शुभ दिनांक : ३, ५, ६, ७, १०, १३, १८,२२,२५,२६
कन्या
प्रगतीचा आलेख उंचावेल
कन्या रास ही बुधाची रास आहे. कन्या राशीमध्ये सव्वादोन नक्षत्र येतात. उत्तरा नक्षत्र, हस्त नक्षत्र व चित्रा नक्षत्र या नक्षत्रांचा समावेश होतो. उत्तरा नक्षत्र हे सूर्याचे नक्षत्र आहे. चित्र नक्षत्र हे मंगळाचे नक्षत्र आहे व हस्त नक्षत्र हे चंद्राचे नक्षत्र आहे. उत्तरा नक्षत्र हे मनुष्य गणी नक्षत्र आहे. हस्त नक्षत्र हे देवगणी आहे. चित्रा नक्षत्र हे राक्षसगणी नक्षत्र आहे. नक्षत्राची गुणवैशिष्ट्ये म्हणजे जातक गुणवान, भाग्यवान, शांत, श्रीमंत, चांगल्या लोकांचा सहवास लाभणारा, निर्व्यसनी, कृतज्ञ. स्वतःच्या ध्येयासाठी अविश्रांत कष्ट करणारा, मेहनत घेणारा असा असतो. हस्त नक्षत्राचा जातक परोपकारी समाजकल्याणाची आवड असणारा, काही वेळेस मद्यपी पण असू शकतो. सुंदर, कलाकुशलता असते. विद्वान, गाडीघोडा यांची आवड असणारा व त्याचा उपभोग घेणारा, धार्मिक, चैनी, निर्लज्ज, उत्साही, चोरी करण्याची सवय असू शकते. चित्रा नक्षत्राचा जातक वेगवेगळी वस्त्रं वापरणारा, फुलांची आवड असणारा, विचित्र वेशधारी, सुंदर डोळे, तामसी, कधी कधी दुर्गुणी विषयासक्त, गानप्रिय, संशयी, गणितात प्रावीण्य लाभलेला, गोड, शास्त्राची आवड असणारा, रत्नपारखी, बुद्धी तसेच विद्या कमी असणार असा आढळतो, उत्तरा नक्षत्राचे तीन चरण, हस्त नक्षत्राचे चार चरण, चित्रा नक्षत्राचे दोन चरण मिळून कन्या रास तयार होते.
शिक्षण : शिक्षणातील आपले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आपल्याला जास्त कष्ट घेण्याची तयारी ठेवावी लागेल, परंतु अभ्यास करताना छोटे-मोठे अडथळे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मन अभ्यासावर केंद्रित करण्यासाठी इतरत्र वेळ न घालवता अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी विशेष प्रयत्नांची आवश्यकता आहे. तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या जातकांना ग्रहमानाचा विशेष फायदा होईल. त्यामुळे त्यांना यश सोपे होईल, परंतु योग्य दिशेने प्रयत्न करायला पाहिजे. त्याचप्रमाणे सातत्यही अभ्यासात ठेवणे आवश्यक आहे. कला, क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींना अनुकूलता लाभेल. परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेण्याचे मार्ग प्रशस्त बनतील. त्या कामी आपल्याला कुटुंबातून, मित्रमंडळींकडून, ओळखीतून तसेच गुरुजनांकडून सहकार्य वेळोवेळी मिळू शकते. त्याचप्रमाणे त्यांचे मार्गदर्शनसुद्धा लाभेल. त्यामुळे परदेशी आपले भविष्य चमकवू शकाल.
पारिवारिक : काही वेळेस कुटुंबातील नेहमीच्या जबाबदाऱ्यांपेक्षा काही अतिरिक्त जबाबदाऱ्या अपरिहार्यपणे स्वीकाराव्या लागण्याची शक्यता आहे.
नोकरी-व्यापार-व्यवसाय : काही वेळा अनुकूल ग्रहमान मोठ्या प्रकारचे लाभ मिळवून देईल. प्रगतीचा आलेख उंचावेल. त्याचबरोबर कुटुंबातील विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाह ठरतील. त्यांना आपला आवडता जीवनसाथी निवडण्याची संधी मिळेल. विद्यार्थिनींना आपल्या आवडत्या क्षेत्रात कार्य करण्यास मिळाल्याने ते आनंदीत राहतील. सार्वजनिक जीवनात उपद्रव निर्माण होऊ शकतो. त्यामुळे वादविवाद टाळणे महत्त्वाचे राहील. विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत स्पर्धात्मक यश मिळवू शकतील. कलाकार, खेळाडूंना नवीन संधी प्राप्त होतील. परदेशातूनही संधी प्राप्त होऊ शकतात.
शुभ दिनांक : २, ३, ५, ६, १०, १८, १९, २०, २६, २८