जून महिना कसा जाईल? बघा धनु आणि मकर राशीचे भविष्य 
राशीभविष्य

जून महिना कसा जाईल? बघा धनु आणि मकर राशीचे भविष्य

तुमच्यासाठी कसा आहे जून महिना? जाणून घ्या...

नवशक्ती Web Desk

डॉ. सविता महाडिक, ज्योतिष भूषण

धनु

विशिष्ट यश मिळवता येईल

मूळ नक्षत्राचे चार चरण, पूर्वाषाढा नक्षत्राचे चार चरण, उत्तराषाढाचे पहिले चरण असे नऊ चरण मिळून धनु राशी तयार होते. मूळ नक्षत्राची नाडी आद्य, योनी श्वान आहे, गण राक्षस आहे, आराध्य वृक्ष राळ आहे. दान लोह आहे, देवता निरुत्ती आहे, मुख अधो आहे, दृष्टी सुलोचन आहे, स्वामी केतू, तत्त्व जल, संज्ञा तीक्ष्ण आहे. पूर्वाषाढा नक्षत्राची नाडी मध्य आहे, योनी वानर, गण मनुष्य, आराध्य वृक्ष वेत, दान कंबल, देवता उदक आहे, स्वामी शुक्र, तत्त्व जल व संज्ञा उग्र आहे.

उत्तराषाढा नक्षत्राची नाडी अंत्य व योनी मुंगूस आहे, गण मनुष्य, आराध्य वृक्ष फणस आहे, दान महिशी, देवता विश्व आहे, दृष्टी मंद, मुख ऊर्ध्व, स्वामी सूर्य, तत्त्व पृथ्वी, संज्ञा ध्रुव आहे.

शिक्षण : सध्याच्या या चालू काळामध्ये शिक्षणात प्रगती होईल, तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या जातकांची विशेष प्रगती होऊ शकते, परंतु त्यासाठी अभ्यास करणे गरजेचे आहे व त्या अभ्यासामध्ये सातत्य हवे. परिश्रम घेण्याची तयारी हवी. नेहमीपेक्षा जास्त कष्ट घ्यावेत. अभ्यासामध्ये मन एकाग्र करण्यासाठी विशेष प्रयत्नांची आवश्यकता आहे. इतरत्र वेळ वाया घालवू नये तसेच खूप संगत टाळावी, परदेशातील शिक्षणासंबंधी सुद्धा प्रयत्न करावे लागतील तसेच कला- क्रीडा क्षेत्रात अतिशय चांगली प्रगती होईल. आपले कर्तृत्व मैदानावरती सिद्ध करता येईल. खेळामध्ये आपले कसब दाखवता येतील.

पारिवारिक : कालावधीच्या सुरुवातीला विशिष्ट बाबतीत यश मिळवू शकाल. तरुण-तरुणींना अतिशय अनुकूल ग्रहमान आहे. त्यांचे प्रश्न सुटतील, उत्साह वाढेल, नोकरीत परिस्थितीजन्य लाभ होईल, मात्र कुटुंबातील वृद्धांनी आरोग्यविषयक पथ्य पाळायला पाहिजेत. जुनाट व्याधींचा उपद्रव होऊ शकतो. व्यावसायिक कर्ज मंजुरीतून धन्यता मिळेल. प्रश्न सुटतील, तसेच आपल्या मौल्यवान वस्तू, महत्त्वाची कागदपत्रे, दागदागिने, वाहने इत्यादींकडे लक्ष ठेवा, चोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचप्रमाणे विचित्र खर्च काही वेळेस होऊ शकतो. त्याचप्रमाणे आर्थिक बाबतीमध्ये फसवणुकीचे प्रसंग उभे राहू शकतात. कोणताही जुगार टाळा. आपल्या कार्यक्षेत्रात विशिष्ट कायदेशीर प्रश्न उभे राहू शकतात. तसेच कुटुंबातील महिलांशी वादविवाद टाळावेत, तरुण-तरुणींचे नोकरीविषयक प्रश्न संपुष्टात येतील.

नोकरी, व्यवसाय, धंदा : समाजातील सन्माननीय तसेच थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल त्यांच्या सहवासाबरोबर त्यांची मदत मिळेल वेळप्रसंगी मार्गदर्शन मिळेल त्यांच्या मदतीमुळे आपण आपली महत्त्वाची कामे पूर्ण करू शकाल. दीर्घकाळ रखडलेली व्यावसायिक कामे तसेच खासगी स्वरूपाची कामे पूर्ण होतील. समाजातील उच्चभ्रू वर्तुळात संपर्क वाढेल. त्यामुळे आपली सामाजिक पतप्रतिष्ठा वाढेल. आपण इतरांना मदत करू शकाल. त्यांचे प्रश्न सोडवू शकाल. कुटुंबात वातावरण अनुकूल राहील. महिन्याच्या पूर्वार्धामध्ये जुन्या गुंतवणुकीतून विशिष्ट लाभ होतील, मात्र नवीन गुंतवणूक करताना विशेष काळजी घ्या, फसू नका.

शुभ दिनांक : २, ४, ५, ८, ११, १६, ९, २०, २३, २४
अशुभ दिनांक : १३, १४, १५, २८, ३०

मकर

अलौकिक लाभ होतील

उत्तराषाढा नक्षत्राचे दुसरे व तिसरे चरण, श्रवण नक्षत्राचे चार चरण, धनिष्ठा नक्षत्राचे पहिला व दुसरा चरण असे नऊ नक्षत्र चरणांनी मकर राशी तयार होते. उत्तराषाढा नक्षत्राची नाडी अंत्य आहे. योनी मुंगूस आहे, गण मनुष्य, आराध्य वृक्ष फणस, दान महिषी व विरव देवता आहे. मुख ऊर्ध्व, दृष्टी मंद आहे, गुरू रवी, तत्त्व पृथ्वी, संज्ञा ध्रुव आहे.

श्रवण नक्षत्राची नाडी अंत्य व योनी वानर आहे, गण देव, आराध्य वृक्ष रुई आहे. दान भोजन, देवता विष्णू आहे, मुख ऊर्ध्व, दृष्टी सुलोचन आहे, संज्ञा चर आहे.

धनिष्ठा नक्षत्राची नाडी मध्य आहे. योनी सिंह आहे, गण राक्षस व आराध्यक्ष शमी आहे, दान सोने व रूपे देवता वसू आहे, मुख ऊर्ध्व, दृष्टी अंध आहे, स्वामी मंगळ, तत्त्व पृथ्वी, संज्ञा चर आहे.

शिक्षण : शिक्षणासाठी अनुकूल कालावधी जरी असला तरी अभ्यासाप्रति हलगर्जीपणा चालणार नाही. आळस झटकला पाहिजे, इतरात्र कोणत्याही प्रकारे वेळ न घालवता अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. कला व क्रीडा क्षेत्रासाठी विशेष अनुकूल ग्रहमान असल्यामुळे चांगले यश मिळू शकते तसेच स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी परिश्रमामध्ये कमी पडू देऊ नका. परदेशातील शिक्षणासाठी सुद्धा जास्त प्रयत्न करायला पाहिजेत तरच चांगले यश मिळू शकते. कोणत्याही प्रकारचा कंटाळा करणे किंवा इतरांवर अवलंबून राहणे धोकादायक ठरू शकते.

पारिवारिक : तरुण-तरुणींनी कुसंगत टाळणे अतिशय महत्त्वाचे ठरेल तसेच वाहन चालवताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण हवे. त्याचबरोबर वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक राहील. सरकारी नियम भंग टाळा, तसेच वाहने सांभाळा, व्यावसायिकांना अतिशय चांगले लाभ मिळू शकतात. सरकारी योजनांचा फायदा मिळू शकतो. थोरामोठ्यांच्या सहकार्यात लाभ होऊ शकते. त्यांची मदतही मिळेल. मार्गदर्शन लाभेल. वैवाहिक जीवनामध्ये सुवार्ता मिळतील. कलाकारांना मोठा वाव मिळू शकतो. प्रसिद्धी मिळेल. सरकारी नोकरी मिळू शकते. उत्सव, समारंभाला हजेरी लावाल. निमंत्रण मिळेल. चैनीवर खर्च कराल. अन्नपाण्यातील संसर्गापासून जपा तसेच व्यसनांपासून लांब राहा.

नोकरी, व्यवसाय, धंदा : समाजातील सन्माननीय तसेच थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल, त्यांच्या सहवासाबरोबर त्यांची मदत मिळेल, वेळप्रसंगी मार्गदर्शन मिळेल, त्यांच्या मदतीमुळे आपण आपली महत्त्वाची कामे पूर्ण करू शकाल, दीर्घकाळ रखडलेली व्यावसायिक कामे तसेच खासगी स्वरूपाची कामे पूर्ण होतील. समाजातील उच्चभ्रू वर्तुळात संपर्क वाढेल. त्यामुळे आपली सामाजिक पतप्रतिष्ठा वाढेल. आपण इतरांना मदत करू शकाल. त्यांचे प्रश्न सोडवू शकाल. परिवारात वातावरण अनुकूल राहील. महिन्याच्या पूर्वार्धामध्ये जुन्या गुंतवणुकीतून विशिष्ट लाभ होतील, मात्र नवीन गुंतवणूक करताना काळजी घ्या. फसू नका किंवा इतरांच्या बोलण्यात येऊ नका. वैवाहिक जीवनात मोठ्या सुवार्ता मिळतील. राहत्या घराचे प्रश्न मिटतील. घरातील भौतिक सुखसुविधा वाढवण्यासाठी खर्च होईल. त्याचप्रमाणे कुटुंबातील शिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींकडून त्यांच्या प्रगतीपर वार्ता कानी आल्यामुळे घरात आनंदी वातावरण राहील.

शुभ दिनांक : ४, ५, ८, ९, १७, २३, २४, २७
अशुभ दिनांक : १३, १४, १५, २८, ३०

आजचे राशिभविष्य, ५ जून २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Cleaning Tips : डब्याची बॅग फक्त वरून पुसून उपयोग नाही; 'या' सोप्या उपायांनी करा डीप क्लिनिंग

पेडीक्यूअरवर पैसे खर्च करण्यापूर्वी गरम पाण्याची ही ट्रिक करून पाहा; पाय होतील मऊ-मुलायम

आमटी-रस्सा विसरा अन् ट्राय करा शेवगा फ्राय; भात, पोळी, भाकरीसोबत लागेल भन्नाट

पोहे चिकट होतात म्हणून त्रासलात? परफेक्ट पोह्यांसाठी जाणून घ्या सीक्रेट टिप्स