डॉ. सविता महाडिक, ज्योतिष भूषण
तुळ
नवीन संकल्पना फलदरूप होतील
तुळ राशीमध्ये चित्रा नक्षत्राचा तिसरा व चौथा चरण स्वाती नक्षत्राचे चार चरण विशाखा नक्षत्राचा पहिला दुसरा तिसरा चरण मिळून अशा नऊ चरणांनी युक्त तूळ राशी तयार होते. चित्रा नक्षत्राची नाडी मध्य आहे. योनी व्याघ्र आहे. गण राक्षस असून आराध्य वृक्ष बेल आहे. दान पीत वस्त्र आहे. देवता त्वष्टा आहे. मुख तिरपक आहे गोष्टी चिविट आहे. स्वामी मंगळ पप्पू वायू संज्ञा मृदू आहे. स्वाती नक्षत्र या नक्षत्राची नाडी अत्यं, योनी महिषी आहे. गण देव असून आराध्य वृक्ष अर्जुन आहे. दान लाल गाय व देवता वायू मुख तिरपक व दृष्टी सुलोचन आहे. स्वामी राहू तत्त्वागणी संज्ञा चर आहे. विशाखा नक्षत्राची नाडी अंत्य योनी व्याघ्र आहे. गण राक्षस आहे. आराध्यक्षवृक्ष नागकेशर आहे. दान ताम्र देवता इंद्र आहे. मुख अधो दृष्टी अंध स्वामी गुरु संज्ञा मिश्र आहे.
शिक्षण: या महिन्यातील ग्रहमान शिक्षणासाठी अनुकूल असले तरी आपणास प्रामाणिकपणे अभ्यास करणे तसेच त्यामध्ये सातत्य ठेवणे गरजेचे आहे. मन अभ्यासामध्ये केंद्रित करण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज राहणार आहे. कला व क्रीडा क्षेत्रात चांगले यश मिळू शकते. ज्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा द्यावयाचे आहेत, त्यांना ग्रहमानाची अनुकूलता लाभणार आहे. परीक्षा जागरूकतेने देणे गरजेचे आहे. लक्ष देऊन प्रश्नपत्रिका सोडवणे आवश्यक आहे. परदेशासंबंधी शिक्षणासाठी केलेल्या प्रयत्नांना चांगले यश लाभू शकते.
पारिवारिक: सुरुवातीला विशिष्ट धैरशाची छाया जाणवू शकते. अपयश निघून जाईल. सरकारी माध्यमातून लाभ होतील. आपल्या कार्यक्षेत्रात जुगार सदृश्य व्यवहार टाळणे हितकारक ठरेल. अपेक्षित गाठीभेटी होतील त्यातून आपली कार्य पूर्ण करू शकाल. व्यावसायिक पथक प्रतिष्ठा वाढेल. तरुणांना तसेच तरुणींना शिक्षण नोकरी आणि विवाह इत्यादी घटकातून उत्तम फलदायी हा कालावधी होईल. कुटुंब परिवारातील एखादी स्त्री चिंता जाणवू शकते. चालू नोकरीमध्ये मानाचे स्थान मिळेल. कुटुंब परिवारातील वृद्धांच्या समस्या डोके वर काढू शकतात. त्याकडे वेळीच लक्ष देणे हितकारक राहील. कुटुंब परिवारातील विवाह योग्य तरुण-तरुणींचे विवाह ठरतील काहींचे ओळखीतून विवाह.
नोकरी व्यवसाय धंदा: या काळामध्ये मागील परिस्थितीत फरक झालेल दिसेल. भाग्य आपल्याबरोबर असल्याचा अनुभव येईल. थोड्याच प्रयत्नांनी आपल्या समोरील कार्य पूर्ण होत असल्याचे अनुभवून आश्चर्य वाटेल. व्यवसाय धंद्यातील उत्सव प्रदर्शनातून मोठे लाभ मिळू शकतात. नवीन संकल्पना फलदरूप होतील उत्पन्न वाढेल बुद्धिजीवी आणि स्वतंत्र व्यवसायिकांना नव्या संधीतून लाभ मिळतील. आर्थिक परिस्थिती मजबूत राहील. मात्र स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या जुनाट व्याधी नव्याने डोके वर काढू शकतात. दीर्घकाळ रखडलेली जमीन जुमला स्थायी संपत्ती वडिलोपार्जित संपत्ती इत्यादी विषयीचे व्यवहार गतिमान होऊन पूर्णत्वाकडे वाटचाल करतील. वाद-विवाद मतभेद संपुष्टात येतील. उच्च शिक्षण घेण्याचे मार्ग प्रशस्त होतील.
शुभ दिनांक : 2, 8, 9, 11, 16, 17, 19,20,24,27
अशुभ दिनांक : 13,14,15,28,30
वृश्चिक
जीवनातील अविस्मरणीय प्रसंग घडतील
विशाखा नक्षत्राचा चौथा चरण अनुराधा नक्षत्राचे चार चरण जेष्ठा नक्षत्राचे चरचरण असे एकूण नऊ चरण मिळून वृश्चिक रास तयार होते. विशाखा नक्षत्राची नाडी अंत्य आहे. योनी व्याघ्र आहे गण राक्षस आहे. आराध्य वृक्ष नागकेशर आहे. देवता इंद्राग्नी मुख अधो व दृष्टी अंध आहे. स्वामी गुरु आहे तत्व वायू संज्ञा मिश्रा आहे. अनुराधा नक्षत्राची नाडी मध्ये आहे. योनी मृग गण देव आराध्यक्ष नागकेशर आहे. दान शय्या आहे. देवता मित्र आहे. तिरपक आहे व दृष्टी अंध आहे. स्वामी शनी संज्ञा मृदू आहे तत्व पृथ्वी जेष्ठा नक्षत्राची नाडी अध्याय योनी मृग आहे. गण राक्षस आहे. आराध्य वृक्ष सांभर असून दान पादत्राण आहे. देवता इंद्र आहे. मुख तिरपक असून दृष्टी चीवीट आहे सज्ञा तीक्ष्ण. स्वामी बुध तत्त्व पृथ्वी आहे.
शिक्षण: शिक्षण साठी फारसा अनुकूल काळ नाही. ग्रहमान फारसे अनुकूल नाही. त्यामुळे अभ्यासात सातत्य ठेवण्याची आवश्यकता आहे. थोड्याफार अडचणी आल्या तरी त्या अडचणींना पार करून अभ्यासात लक्ष दिले गेले पाहिजे. कुसंगत टाळली पाहिजे. वेळेचा अपव्यय टाळावा योग्य दिशेने प्रयत्न करावा. कला क्रीडा क्षेत्रात अतिशय चांगले यश मिळू शकते, पण त्यासाठी सतत प्रयत्न करायला पाहिजे. प्रयत्न यशस्वी होण्यासाठी त्यामध्ये सातत्य पाहिजे. इतरांची मदत घ्यायला पाहिजे. परदेशासंबंधी शिक्षणासाठी अचानक अडचणी उद्भवू शकतात. त्यासाठी योग्य दिशेने प्रयत्न करणे हिताचे ठरून यशस्वी व्हाल.
पारिवारिक: कुटुंब परिवारामध्ये स्वतःच्या भावनांचा उद्रेक टाळणे महत्त्वाचे ठरेल. कुटुंबातील स्त्री वर्गाची मने जपा वादविवाद टाळणे हिताचे ठरेल. जुन्या गुंतवणुकीतून चांगले अर्थ लाभ होऊ शकतात. सहकुटुंब सहपरिवार प्रवासाचे योग आहेत, मात्र प्रवासामध्ये संसर्ग टाळा मोठे दैवी चमत्कार घडवणारे ग्रहमान आहे. स्वतःच्या आरोग्याला सांभाळा. शारीरिक वेदनायुक्त व्याधीतून त्रास होण्याची शक्यता. आपल्या मौल्यवान वस्तू महत्त्वाची कागदपत्रे दाग दागिने वाहने चोरीला जाण्याची अथवा घाट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या गोष्टींकडे लक्ष ठेवा. कुटुंब परिवारातील तरुण-तरुणींचे नोकरी विषयक प्रश्न संपुष्टात येतील. नोकरी मिळू शकते. विद्यार्थ्यांना विशिष्ट स्पर्धात्मक यश मिळेल, पण त्यासाठी प्रयत्नांची आवश्यकता आहे. व्यावसायिक वसुली होईल.
नोकरी व्यवसाय धंदा: कुटुंब परिवारातील शिक्षण घेणाऱ्या मुला मुलींच्या बाबतीत जर काही चिंता असतील अथवा समस्या असतील तर त्या संपुष्टात येतील. त्यामुळे समाधानी राहाल. आपल्या कुटुंब परिवारात स्नेह प्रेमभावनेत वृद्धी पहावयास मिळेल. कुटुंब परिवारातील ज्येष्ठ मंडळींचा आशीर्वाद लाभेल. पित्याच्या माध्यमातून अथवा समाजातील प्रभावशाली व्यक्तींकडून दीर्घकाळ रखडलेली कामे पूर्ण होतील. त्यांचे मार्गदर्शन तसेच मदत मिळेल. खाजगी क्षेत्रात कार्यरत असलेल्या जातकांना आपल्या अपेक्षा पूर्ण होताना आढळतील. वरिष्ठांची मर्जी राहील. सामाजिक तसेच धार्मिक कार्यात आपल्याला काम करण्याची संधी प्राप्त होईल.
शुभ दिनांक : 4, 5, 8, 12, 17, 19, 23,27
अशुभ दिनांक : 13,14,15,28,30