बिझनेस

उत्पादन वाढ ६ महिन्यांच्या उच्चांकावर; जानेवारीत PMI ५७.७ पर्यंत वाढला, नवीन निर्यात ऑर्डरमध्ये झपाट्याने वाढ झाल्याचा लाभ

भारताच्या उत्पादन क्षेत्राची वाढ २०२५ वर्षाची सुरुवात मजबूत झाली असून जानेवारीमध्ये सहा महिन्यांच्या उच्चांकाला स्पर्श केला.

Swapnil S

नवी दिल्ली : भारताच्या उत्पादन क्षेत्राची वाढ २०२५ वर्षाची सुरुवात मजबूत झाली असून जानेवारीमध्ये सहा महिन्यांच्या उच्चांकाला स्पर्श केला. निर्यातीतील ही वाढ जवळपास १४ वर्षांतील सर्वात मोठी वाढ असल्याचे सोमवारी एका मासिक सर्वेक्षणात म्हटले आहे.

हंगामी समायोजित एचएसबीसी इंडिया मॅन्युफॅक्चरिंग पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स (पीएमआय) डिसेंबरच्या ५६.४ च्या एका वर्षाच्या नीचांकावरून जानेवारीत ५७.७ पर्यंत वाढला. फेब्रुवारी २०११ पासून नवीन निर्यात ऑर्डरमध्ये सर्वात जलद वाढ झाली आहे. पीएमआयच्या भाषेत, ५० वरील अंक म्हणजे विस्तार, तर ५० पेक्षा कमी अंक आकुंचन दर्शवितात.

भारताच्या अंतिम उत्पादन पीएमआयने जानेवारीमध्ये सहा महिन्यांचा उच्चांक नोंदवला. देशांतर्गत आणि निर्यात मागणी दोन्ही मजबूत होती. त्यामुळे नवीन ऑर्डर वाढीला समर्थन मिळाले, असे प्रांजुल भंडारी, मुख्य भारतीय अर्थशास्त्रज्ञ, एचएसबीसीमधील म्हणाले.

चांगल्या देशांतर्गत मागणी आणि आंतरराष्ट्रीय विक्रीतील वाढ यामुळे नवीन ऑर्डर्समध्ये भरीव वाढ झाल्याचे श्रेय वस्तू उत्पादकांनी दिले. त्यानंतर, भारतातील उत्पादकांनी उत्पादनाचे प्रमाण वाढवणे सुरू ठेवले. नवीनतम वाढ लक्षणीय आणि ऑक्टोबर २०२४ नंतरची सर्वात वेगवान होती.

पुढील काळात कंपन्या उत्पादनांबद्दल अधिक आशावादी आहेत. जवळपास ३२ टक्के कंपन्यांनी वाढीचा अंदाज वर्तवला आणि फक्त १ टक्के कंपन्यांनी कपातीची अपेक्षा व्यक्त केली.

पॅनेल सदस्यांच्या मते, वाढीव देशांतर्गत मागणी, चांगले ग्राहक संबंध, अनुकूल आर्थिक परिस्थिती आणि विपणन प्रयत्न या सर्व गोष्टी वाढीच्या शक्यतांसाठी चांगले संकेत देतात. या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीच्या सुरुवातीस मजबूत विक्री नफा आणि उत्साहवर्धक अंदाजामुळे कंपन्यांना अतिरिक्त कामगारांची नियुक्ती करण्यास प्रवृत्त केले.

सर्वेक्षणात पुढे नमूद करण्यात आले आहे की, भारतातील उत्पादकांमध्ये क्षमतेचा दबाव सौम्य राहिला आहे. अलीकडच्या काही महिन्यांत मजबूत रोजगार निर्मिती करणे कंपन्यांना त्यांचे प्रमुख उद्दिष्ट ठेवावे लागले, असे सर्वेक्षणात म्हटले आहे.

एचएसबीसी इंडिया मॅन्युफॅक्चरिंग पीएमआय हे एस ॲण्ड पी ग्लोबलद्वारे सुमारे ४०० उत्पादकांच्या पॅनेलमधील खरेदी व्यवस्थापकांना पाठविलेल्या प्रश्नावलीच्या प्रतिसादातून संकलित केले आहे.

उत्पादन खर्च दुसऱ्या महिन्यातही कमी

रोजगार पीएमआयने उत्पादन उद्योगात मजबूत रोजगार निर्मिती सुचवली, कारण निर्देशांकाची मालिका तयार झाल्यापासून निर्देशांक सर्वोच्च पातळीवर वाढला. महागाई आधारित उत्पादन खर्च दुसऱ्या महिन्यासाठी कमी झाला. त्यामुळे उत्पादकांवर अंतिम उत्पादनाच्या किमती वाढवण्याचा दबाव कमी झाला, भंडारी यांनी नमूद केले. किमतीच्या आघाडीवर, खर्चाचा दबाव ११ महिन्यांतील सर्वात कमकुवत झाला, परंतु मागणी वाढल्याने विक्रीच्या किमती वाढल्या.

सातारा जिल्ह्यात ५७, तर पुणे जिल्ह्यात २३२ मतदान केंद्रे; पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांसाठी उद्या मतदान

ठाणे-भिवंडीत पाणी कपातीचे संकट; ठाण्यात आजपासून ३६ तास, तर भिवंडीत दर बुधवारी १८ तास पाणीपुरवठा बंद

Cyber Fraud Alert : तुम्हालाही व्हॉट्सॲपवर लग्नपत्रिका आलीय? सावधान... APK फाइलमुळे क्षणात खातं होईल रिकामं

दिवेआगर दुर्घटनेप्रकरणी ५ जणांवर गुन्हा, सहलीत निष्काळजीपणा; पुण्यातील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

डेटा लीकप्रकरणी HDFC बँक अधिकाऱ्यांची चौकशी