मनोरंजन

'वेलकम 3'च्या माध्यमातून तब्बल १९ वर्षांनी अक्षय-रवीना एकत्र येणार? चाहत्यांची उत्सूकता शिगेला

हा चित्रपट पुढच्या वर्षी 25 डिसेंबरला (ख्रिसमस) चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

नवशक्ती Web Desk

अभिनेता अक्षय कुमार सध्या त्यांच्या 'ओह माय गॉड २' या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाने चित्रपटगृहात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. त्याच्या या चित्रपटाने सनी देओलच्या 'गदर २'ला बऱ्यापैकी टक्कर दिली आहे. त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. अक्षयच्या गेल्या काही चित्रपटांकडे बघितले तर त्याचे सलग सहा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले होते. मात्र, 'ओह माय गॉड २' ने आता अक्षयच्या फ्लॉप सिनेमांवर फुल स्टॉप लावला आहे.

आता अक्षय त्याच्या पुढच्या चित्रपटात त्याची एक्स गर्लफ्रेंड रवीना टंडन सोबत दिसणार असल्याचं सगळीकडे बोललं जात आहे. बॉलिवूडमध्ये असा एक काळ होता ज्यावेळी अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांची जोडी बॉक्स ऑफिसवर सुपरहिट असायची. त्या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं. ही जोडी बॉलिवूडमधील सर्वात हिट जोड्यांपैकी एक आहे. या शिवाय दोघांनी एकमेकांना बराच काळ डेट सुद्धा केलं होतं. मात्र, काही काळानंतर दोघेही वेगळे झाले. त्याचं प्रेम प्रकरण आणि ब्रेकअप आणि नंतर दुसऱ्याशी लग्न झाल्यानंतर दोघांची जोडी कधीच मोठ्या पडद्यावर पाहायला मिळाली नाही.

त्या दोघांचे चाहते त्याच्या जोडीला खुप मिस करत होते. त्यांना एकत्र पाहण्यासाठी चाहते अजूनही उत्सुक आहेत. आता तब्बल 19 वर्षांनंतर पुन्हा एकदा ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय कुमार आणि रवीना टंडन आता 'वेलकम 3' या सिनेमात एकत्र काम करणार आहेत. 'वेलकम टू द जंगल' मध्ये ही जोडी प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन करणार आहे.

अक्षय कुमारसह या चित्रपटात संजय दत्त, अर्शद वारसी, दिशा पटानी, सुनील शेट्टी आणि जॅकलिन फर्नांडिस हे कलाकार देखील दिसणार आहेत. दरम्यान, नाना पाटेकर आणि अनिल कपुर हे मात्र यावेळी या चित्रपटात दिसणार नाहीत. हा चित्रपट पुढच्या वर्षी 25 डिसेंबरला (ख्रिसमस) चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

IND vs SA: मालिका विजयाची आज संधी; अहमदाबाद येथे भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिकेशी पाचवा टी-२० सामना

बांगलादेश पुन्हा पेटले! शेख हसीनांचा कट्टर विरोधक उस्मान हादीच्या मृत्यूनंतर हिंसाचार; हिंदू तरुणाला ठार केले, मीडिया कार्यालयांना जाळले

Thane: शिंदेंच्या मतदारसंघात भाजपला सेनेसोबत युती नको; भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आक्रमक

शेजाऱ्याने ५ वर्षांच्या चिमुकल्याला 'फुटबॉल'सारखं तुडवलं; धक्कादायक CCTV Video व्हायरल, गुन्हा दाखल

निवृत्तीपूर्वी जज फारच षटकार मारत आहेत! सुप्रीम कोर्टानेच न्यायव्यवस्थेतील भ्रष्ट कारभारावर ओढले ताशेरे