सिनेसृष्टीतील टॅलेंटेड आणि स्टायलिश अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिच्या कुटुंबासोबत लंडन व्हेकेशनवर आहे. या सुट्ट्यांचा मनमुराद आनंद घेत रणबीरसोबतचा रोमँटिक व्हिडीओ आलियाने तिच्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
‘रामायण’ चित्रपटाची शूटिंग पूर्ण करून रणबीर कपूर कुटुंबासोबत लंडनला रवाना झाला आणि तिथूनच आलियाने एक खास व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओला तिने ‘ट्विर्ल गर्ल’! असे क्युट कॅप्शन दिलंय.
यात रणबीर आलियाचा हात पकडून तिला फिरवताना दिसत आहे. लंडनच्या सुंदर लोकेशन्सवर शूट करण्यात आलेल्या या व्हिडीओला तिने ‘दिल मेरे’ हे रोमँटिक गाणं सुद्धा लावलं आहे, जे या व्हिडीओला अधिक सिनेमॅटिक बनवतं. आलिया-रणबीरचीही क्यूट केमिस्ट्री अनेक फॅन्सना कपल गोल्स देतेय.
आलिया नेहमीच तिच्या आयुष्यातील असे खास क्षण चाहत्यांसोबत शेअर करत असते.
वर्कफ्रंटबद्दल सांगायचं, तर रणबीर कपूर ‘रामायण’ या बहुप्रतीक्षित चित्रपटात प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत झळकणार आहे. तसेच संजय लीला भन्साळींच्या ‘लव्ह अँड वॉर’मध्येही तो झळकणार असून, या चित्रपटात आलियाही आहे. आलियाच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये ‘अल्फा’ ही वुमन-सेंट्रिक स्पाय थ्रिलर फिल्म आहे, ज्यात ती ॲक्शन अवतारात दिसणार आहे.