मनोरंजन

Asha Bhosle Last Public Appearance : सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनच्या लग्नात हजेरी; हसतमुखाने पापाराझींना केला नमस्कार, VIDEO

आशा भोसले यांची शेवटची सार्वजनिक उपस्थिती अर्जुन तेंडुलकरच्या लग्नात पाहायला मिळाली होती. या कार्यक्रमातील त्यांचा हसतमुख VIDEO सध्या व्हायरल होत असून चाहत्यांना भावूक करत आहे.

Mayuri Gawade

भारतीय संगीतविश्वातील दिग्गज गायिका आशा भोसले यांच्या निधनाने कलाक्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. वयाच्या ९२व्या वर्षी रविवारी (१२ एप्रिल) त्यांचे निधन झाले. प्रकृती खालवल्याने त्यांना शनिवारी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अतिशय थकवा आणि छातीच्या संसर्गामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान मल्टी-ऑर्गन फेल्युअरमुळे त्यांची प्राणज्योत मालवली.

शेवटची सार्वजनिक उपस्थिती ठरली भावूक करणारी

आशा भोसले यांच्या निधनानंतर त्यांच्या शेवटच्या सार्वजनिक उपस्थितीचे व्हिडिओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असून, चाहत्यांना भावूक करत आहेत. मार्च महिन्यात त्यांनी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोक यांच्या लग्नसमारंभाला उपस्थिती लावली होती.

मुंबईतील द सेंट रेजिस मुंबई येथे झालेल्या या कार्यक्रमात आशा भोसले यांचा खास अंदाज पाहायला मिळाला. यावेळी त्यांनी हसतमुखाने पापाराझींना नमस्कार करत अभिवादन करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतलं.

पाहा व्हिडिओ

त्यांच्या या साधेपणाने आणि प्रसन्नतेने सजलेल्या शेवटच्या सार्वजनिक क्षणांनी चाहत्यांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं असून, त्या आठवणी आता अधिकच भावूक करत आहेत.

केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार ६,९०८ रुपयांचा बोनस

Kolkata Stampede : कोलकात्यात दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी; १९ जणांचा मृत्यू, मृतांच्या कुटुंबीयांना २५ लाखांची मदत

FSSAI चा नेस्ले इंडिया, हिंदुस्थान युनिलिव्हरला दणका; दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींमुळे नोटीस

दांडिया खेळताना अचानक कोसळला लाइटचा स्टँड; इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीचा मृत्यू, हादरवणारा VIDEO

दसऱ्याला दारात लावा झेंडू-आंब्याच्या पानांचं खास तोरण; पाहा ७ सुंदर, हटके आणि बजेट-फ्रेंडली डिझाईन्स