@colorsmarathi/ Instagram
मनोरंजन

Bigg Boss Marathiच्या घरात रंगणार कॅप्टनसीचा टास्क; कोणाचं गोड पाणी कोणाची तहान भागवणार?

Captaincy Task: 'बिग बॉस मराठी'च्या घरात कॅप्टनसी पदासाठी सर्व प्राण्यांची तहान भागवावी लागणार आहे.

Tejashree Gaikwad

Bigg Boss Marathi Day 55 : 'बिग बॉस मराठी'च्या घरात सतत कोणा ना कोणामध्ये वाद होत असतात. घरात आता खेळाला रंग चढू लागला आहे. आठव्या आठवड्यात बिग बॉसच्या घरात कॅप्टनसी कार्य पार पडणार आहे. या कॅप्टनसी कार्यात कोण जिंकणार? हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कोणाचं गोड पाणी कोणाची तहान भागवणार हे पाहताना प्रेक्षकांना मात्र मज्जा येईल.

'बिग बॉस मराठी'च्या घरात कॅप्टनसी पदासाठी भागवावी लागणार सर्व प्राण्यांची तहान. दरम्यान प्रोमोमध्ये वर्षा ताई म्हणत आहेत,"आपली तहान भागवा". अरबाज म्हणतोय,"हे खूप गोड पाणी आहे". अरबाजला निक्की विचारतेय,"कालपासून तू इतका गोड होतास...अचानक तुझं पाणी गोड कसं झालं?".

पॅडी दादा वर्षा ताईंना विचारत आहेत,"आम्ही पाणी पिऊ यावर तुमचा विश्वास होता का?". त्यावर वर्षा ताई "हो असं वाटलं होतं", असं उत्तर देतात. पुढे पॅडी दादा वर्षा ताईंना स्पष्टच म्हणतात,"स्टॅटर्जी करताना तुम्ही त्यांच्यासोबत बसणार आणि आमच्यावर विश्वास ठेवणार".

Satyacha Morcha Mumbai : काढ रे तो पडदा! राज ठाकरे थेट पुरावा घेऊनच आले; म्हणाले, "त्यांना आधी बडवायचं मग...

Satyacha Morcha Mumbai : उद्धव ठाकरेंचे मतदारांना आवाहन; म्हणाले, "मतचोर जिथे दिसेल तिथे फटकवला...

पुण्यात पुन्हा टोळीयुद्ध पेटले? रिक्षाचालकाची भर रस्त्यात हत्या

मुंबईत राजकीय रणकंदन; विरोधकांच्या सत्याच्या मोर्चाला भाजपचे 'मूक आंदोलन' करून प्रत्युत्तर

Andhra Pradesh : एकादशीला भाविकांवर काळाचा घाला; वेंकटेश्वर मंदिरात चेंगराचेंगरी, ९ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी