मनोरंजन

'याच्यासाठी मी स्वतःला संपवायला निघाले होते; इंस्टाग्रामवर Live येत इन्फ्लुएन्सर दीक्षा गुलाटीचा BF उदित राजपूतवर 'चिटिंग'चा आरोप

“माझ्या वडिलांनी विचारलं होतं की, तुला त्याच्याशी लग्न करायचं आहे का? आणि मी होकार दिला होता,” असेही ती लाईव्ह व्हिडिओमध्ये सांगते.

किशोरी घायवट-उबाळे

लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि टिकटॉक स्टार दीक्षा गुलाटी हिने तिचा बॉयफ्रेंड आणि इन्फ्लुएन्सर उदित राजपूतवर फसवणूकीचा आरोप केला आहे. दीक्षाने थेट इन्स्टाग्रामवर लाईव्ह येत उदितवर आरोप केला असून त्या लाईव्हमधील व्हिडीओ क्लिप्स सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

इन्स्टाग्राम लाईव्हमध्ये, दीक्षा भावुक झालेली दिसतेय. उदित तिच्यासोबत नात्यात असतानाच दुसऱ्या महिलेसोबत संबंध ठेवत होता. तसेच, तिच्या लोकप्रियतेचा आणि ओळखीचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करत होता, असेही तिने व्हिडिओमध्ये म्हटले आहे. तिने उदितची ओळख आपल्या पालकांशी करून दिली होती आणि लग्नाबाबतही चर्चा झाली होती. “माझ्या वडिलांनी विचारलं होतं की, तुला त्याच्याशी लग्न करायचं आहे का? आणि मी होकार दिला होता,” असे ती लाईव्ह व्हिडिओमध्ये सांगते.

“असे पुरुष महिलांचा फक्त स्वार्थासाठी उपयोग करतात”

लाईव्ह व्हिडीओमध्ये दीक्षाने स्वतःचा हात दाखवत म्हटले, “मी त्याच्यासाठी स्वतःला त्रास देण्याचा, स्वतःला मारण्याचा प्रयत्न केला होता. मी सगळं केलं, आणि शेवटी मला हेच मिळालं. अशा पुरुषांना फक्त स्वतःचा फायदा हवा असतो,” असेही तिने म्हटले आहे. तसेच, उदितने तिच्या प्रसिद्धीचा वापर करत तिच्या पाठीमागे दुसऱ्या व्यक्तीसोबत संबंध ठेवले, असंही तिने म्हटले आहे. लाईव्हदरम्यान दीक्षाने चाहत्यांना आवाहन केले की, "या कठीण काळात मला साथ द्या."

एकमेकांना केले अनफॉलो

या प्रकरणानंतर दीक्षा आणि उदित यांनी एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्याचेही समोर आले आहे. या आरोपांमुळे सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक युजर्सनी दीक्षाच्या बाजूने उभे राहत उदितवर टीका केली आहे. तर काहींनी हा प्रकार प्रसिद्धीसाठीचा स्टंट असू शकतो, अशी शंका व्यक्त केली आहे. मात्र, दीक्षाच्या जवळच्या सूत्रांनी हा प्रकार खरा असून ती मानसिकदृष्ट्या खूप त्रस्त असल्याचे म्हटले आहे. दीक्षा गुलाटी ही फॅशन, डान्स आणि लाईफस्टाईल कंटेंटसाठी ओळखली जाते आणि तिचा मोठा चाहतावर्ग आहे. उदित राजपूत हा देखील विनोदी व्हिडीओ आणि ओमेगल (Omegle) चॅट कंटेंटसाठी प्रसिद्ध असणारा इन्फ्लुएन्सर आहे. हे दोघे सोशल मीडियावर नेहमी एकत्र दिसत होते. दरम्यान, व्हायरल व्हिडीओच्या कमेंट सेक्शनमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. अद्याप उदित राजपूतने या आरोपांवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

बदलीच्या तक्रारीसाठी पोलिसांना कार्यालयात आणणे गैरवर्तन; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल

प्रियकरासोबत पळून गेल्यास कुटुंबाची बदनामी झाली असती; मग होणाऱ्या नवऱ्यालाच दरीत ढकललं, केतन अग्रवाल प्रकरणात नवी माहिती

Mumbai : महापौरांसमोरच मॅनहोलमध्ये पडला सफाई कर्मचारी; अधिकाऱ्यांना निलंबनाचा इशारा, Video

Mumbai Rain : मुसळधार पावसाने मुंबईची दाणादाण! ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर परिणाम, पुढील ४८ तास महत्त्वाचे

Mumbai : मुसळधार पावसात धावत्या लोकलमध्ये क्षुल्लक वाद विकोपाला; २२ वर्षीय तरुणाची चाकू भोसकून हत्या, आरोपी फरार