गोल्ड ज्वेलरी अन् जांभळा लेहंगा; जान्हवी कपूरचा देसी गर्ल लूक, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव (Photo-Instagram)
मनोरंजन

गोल्ड ज्वेलरी अन् जांभळा लेहंगा; जान्हवी कपूरचा देसी गर्ल लूक, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

'पेड्डी' चित्रपटाच्या म्युझिक लॉन्च इव्हेंटमध्ये जान्हवीने पुन्हा एकदा तिच्या रॉयल एथनिक लूकने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

किशोरी घायवट-उबाळे

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या फॅशन सेन्समुळे कायम चर्चेत असते. वेस्टर्नपासून ट्रेडिशनलपर्यंत प्रत्येक लूकमध्ये ती चाहत्यांचं लक्ष वेधून घेते. आता 'पेड्डी' चित्रपटाच्या म्युझिक लॉन्च इव्हेंटमध्ये जान्हवीने पुन्हा एकदा तिच्या रॉयल एथनिक लूकने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. अभिनेता राम चरणसोबत ती या कार्यक्रमाला उपस्थित होती.

जांभळ्या लेहंग्यात दिसला रॉयल टच

या कार्यक्रमासाठी जान्हवीने जांभळ्या रंगाचा आकर्षक लेहंगा परिधान केला होता. या लेहंग्यावर सुंदर जरीवर्क करण्यात आले होते. तिच्या ब्लाउजला राउंड नेकलाइन आणि एल्बो लेंथ स्लीव्ह्ज देण्यात आल्या होत्या, ज्यामुळे संपूर्ण लूक अधिक एलिगंट दिसत होता.

तिने या ब्लाउजसोबत भरजरी डिझाइन असलेला फ्लेअर लेहंगा परिधान केला होता. त्यावर वेलीसारखी एम्ब्रॉयडरी करण्यात आली होती. यासोबत तिने मॅचिंग शिफॉन दुपट्टाही कॅरी केला होता. दुपट्ट्यावर जरीवर्क आणि बॉर्डरमुळे तिचा लूक आणखी उठून दिसत होता.

गोल्ड ज्वेलरीने वाढवली शोभा

जान्हवीच्या या लूकमध्ये तिच्या ज्वेलरीनेही विशेष लक्ष वेधलं. तिने मोठा गोल्ड चोकर, मोत्यांची डिटेलिंग असलेले झुमके, हस्तफूल आणि रिंग्स परिधान केल्या होत्या. या पारंपरिक दागिन्यांमुळे तिच्या लूकला परफेक्ट रॉयल टच मिळाला.

सॉफ्ट ग्लॅम मेकअप

मेकअपसाठी जान्हवीने सॉफ्ट ग्लॅम लूक निवडला होता. ग्लोइंग स्किन, गोल्डन आयशॅडो, स्मोकी आयलाइनर आणि न्यूड लिपस्टिकमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. तिने सेंटर पार्टेड ब्रेडेड हेअरस्टाईल केली होती. छोट्याशा जांभळ्या टिकलीने तिचा संपूर्ण ट्रेडिशनल लूक उठून दिसला. सध्या सोशल मिडियावर जान्हवीचे फोटो व्हायरल होत असून तिच्यावर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Nepal Floods : 'मदत नाही, नुकसानभरपाई हवी'; महाप्रलयानंतर नेपाळची भारत, चीनसह अमेरिकेकडे मागणी

गणेशोत्सवापूर्वी कोकणवासीयांना गुड न्यूज! मुंबई-सावंतवाडी नवी एक्सप्रेस उद्यापासून धावणार; गाडीचे वेळापत्रक पाहा

Mumbai : व्हीआयपी गाडीला वाट देण्यासाठी मजुराची सायकलच उचलून फेकली; पोलिसाचा संतापजनक Video व्हायरल

पत्नीने BSF उपनिरीक्षक पतीला दुसऱ्या महिलेसोबत रंगेहाथ पकडलं; पोलिसांना घेऊन थेट हॉटेल गाठलं अन्..., Video

दिशा सालियन मृत्यू प्रकरणी CBI चौकशीचे आदेश; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय