"त्यांचा आवाज, कबाबची चव कायम स्मरणात राहील"; जावेद अख्तर आणि शबाना आझमींनी सांगितल्या आशा भोसले यांच्या आठवणी 
मनोरंजन

"त्यांचा आवाज, कबाबची चव कायम स्मरणात राहील"; जावेद अख्तर आणि शबाना आझमींनी सांगितल्या आशा भोसले यांच्या आठवणी

ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर आणि त्यांच्या पत्नी अभिनेत्री शबाना आझमी यांच्यासाठी लॉकडाऊनचा काळ आशा भोसले यांच्यासोबतच्या अनेक आठवणींनी जोडलेला आहे.

किशोरी घायवट-उबाळे

भारतीय संगीतविश्वातील ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनानंतर अनेकांकडून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. केवळ सुरांनी नव्हे, तर आपल्या मनमोकळ्या स्वभावाने त्यांनी रसिकांची मनं जिंकली होती. ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर आणि अभिनेत्री शबाना आझमी यांनीही त्यांच्या काही खास आणि जिव्हाळ्याच्या आठवणी शेअर केल्या आहेत.

एका जवळच्या मैत्रिणीला आपण मुकलो

ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर आणि त्यांच्या पत्नी अभिनेत्री शबाना आझमी यांच्यासाठी लॉकडाऊनचा काळ आशा भोसले यांच्यासोबतच्या अनेक आठवणींनी जोडलेला आहे. "आशा भोसले यांना त्यांच्या गायकीपेक्षा त्यांच्या पाककलेचे कौतुक केलेले अधिक आवडायचे. या महान गायिकेच्या निधनामुळे केवळ एका सहकाऱ्यालाच नव्हे, तर एका जवळच्या मैत्रिणीला आणि उत्तम किस्से सांगणाऱ्या व्यक्तीला आपण मुकलो आहोत", अशी भावना अख्तर आणि आझमी यांनी व्यक्त केली.

"कोविडच्या काळात अख्तर आणि आझमी खंडाळ्यात होते, तर आशा भोसले या लोणावळ्यात आपल्या कुटुंबासोबत राहत होत्या. आशा यांना त्यांच्या गाण्याचे कितीही कौतुक केले तरी त्यांना तितका आनंद व्हायचा नाही, पण जर कोणी त्यांच्या हाताच्या कबाब किंवा डाळीचे कौतुक केले, तर त्या खूप आनंदी व्हायच्या", असे अख्तर यांनी सांगितले.

आशा अतिशय उत्तम स्वयंपाक करायच्या आणि त्या स्वतः कबाब बनवत असत. त्यांच्या हाताच्या कबाबची चव इतर कुठेही मिळणे शक्य नाही.
ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर
लॉकडाऊनमध्ये आम्ही खूप जवळ आलो होतो. त्या आमच्यासाठी अत्यंत चविष्ट जेवण बनवायच्या. आशा आणि जावेद अख्तर यांच्यात मनोरंजनसृष्टीतील अनेक मजेशीर किस्से रंगायचे.
अभिनेत्री शबाना आझमी

"आशाजींची स्मरणशक्ती अफाट होती आणि त्या खूप मनमोकळ्या स्वभावाच्या होत्या. आशाजींच्या आवाजात एक प्रकारची ऊर्जा, मस्ती आणि शरारत होती. लता मंगेशकर यांच्यासारखी महान गायिका घरात असतानाही आशाजींनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली, ही साधी गोष्ट नाही", असेही अख्तर म्हणाले.

केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार ६,९०८ रुपयांचा बोनस

Kolkata Stampede : कोलकात्यात दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी; १९ जणांचा मृत्यू, मृतांच्या कुटुंबीयांना २५ लाखांची मदत

FSSAI चा नेस्ले इंडिया, हिंदुस्थान युनिलिव्हरला दणका; दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींमुळे नोटीस

दांडिया खेळताना अचानक कोसळला लाइटचा स्टँड; इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीचा मृत्यू, हादरवणारा VIDEO

दसऱ्याला दारात लावा झेंडू-आंब्याच्या पानांचं खास तोरण; पाहा ७ सुंदर, हटके आणि बजेट-फ्रेंडली डिझाईन्स