मनोरंजन

कतरिना आणि विकी होणार आई-बाबा? 'या' महिन्यात करणार पहिल्या बाळाचे स्वागत

बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल लवकरच आई-बाबा होणार असल्याच्या बातम्या चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण करत आहेत. विशेष म्हणजे, कतरिनाने गेल्या काही महिन्यांपासून सार्वजनिक ठिकाणी हजेरी कमी लावल्यामुळे या चर्चांना आणखी वेग आला आहे.

Mayuri Gawade

बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असणारी जोडी म्हणजे अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल. गेल्या काही महिन्यांपासून ही जोडी लवकरच आई-बाबा होणार असल्याच्या चर्चेत आहे. मात्र या दोघांनीही याबाबत कोणतंही अधिकृत विधान केलेलं नाही. तरीदेखील कतरिनाच्या सार्वजनिक ठिकाणी अचानक कमी झालेल्या उपस्थितीमुळे चाहत्यांमध्ये कुतूहल अधिक वाढलं आहे.

एनडीटीव्हीने दिलेल्या माहितीनुसार, कतरिना ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये आपल्या पहिल्या बाळाला जन्म देऊ शकते. या काळात विकीसुद्धा आपल्या कामातून ब्रेक घेणार असल्याची चर्चा आहे. कतरिनाने सध्या सर्व प्रोजेक्ट्स पुढे ढकलले असून ती पूर्णपणे आपल्या तब्येतीची काळजी घेत आहे. जर हे रिपोर्ट खरे ठरले, तर २०२५ मध्ये पालक झालेल्या सेलिब्रिटींच्या यादीत कतरिना-विकीची भर पडेल.

जुलै महिन्यात ही जोडी अलिबागला जाताना फेरी बोटमध्ये दिसली होती. तेव्हा कतरिनाने पांढरा, लूज शर्ट परिधान केला होता. यावेळी तिच्या चालण्याच्या ढंगामुळे सोशल मीडियावर गरोदरपणाविषयी चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतरपासून ती कुठेही दिसली नसल्याने या चर्चांना आणखी वेग मिळाला आहे.

कतरिना आणि विकी या दोघांनीही याबाबत कोणताही अधिकृत खुलासा केलेला नसला, तरी चाहते या दोघांकडून आनंदाच्या बातमीची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता ही बातमी खरी ठरते का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

Gurugram Hit-and-Run : महिला बाईक रायडरला कारची जोरदार धडक; फरार आरोपी पोलिसांच्या ताब्यात, थरारक घटना कॅमेऱ्यात कैद

Mumbai : मेट्रो ९ टप्पा २ साठी विशेष वाहतूक ब्लॉक; १५ ते २५ सप्टेंबर दरम्यान सकाळी वाहतूक उशीरा सुरू होणार

Jio-Airtel चा Vi ला दणका; मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीवरून TRAI कडून चौकशी सुरू, नेमकं प्रकरण काय?

Mumbai : दादर पूर्व स्टेशन परिसर होणार कोंडीमुक्त; टॅक्सी, बेस्टसाठी स्वतंत्र मार्गीका, टॅक्सी स्टँड

परिचारिकांना महिन्याला आठ सुट्या द्या; राज्य शासनाच्या धर्तीवर ४० तासांचा आठवडा करा, परिचारिका संघटनेने BMC चे लक्ष वेधले