मनोरंजन

'लेकिन मैं भाईजान के नाम से जाना जाता हू' म्हणत आला सलमानच्या आगामी चित्रपटाचा दमदार ट्रेलर

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा आगामी बहुचर्चित चित्रपट 'किसी का भाई किसी की जान'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

वृत्तसंस्था

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने आपला आगामी चित्रपट 'किसी का भाई किसी की जान'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित केला आहे. सिनेप्रेमी या चित्रपटाच्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत होते. दरम्यान, जानेवारीमध्ये या चित्रपटाचा पहिला टीझर दर्शकांच्या भेटीला आला आणि तेव्हापासूनच चाहत्यांमध्ये या चित्रपटाच्या ट्रेलरबद्दल उत्सुकता वाढू लागली. अशातच, चित्रपटाचा ट्रेलर अखेरीस प्रदर्शित झाला असून काही मिनिटांतच हा ट्रेलर सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे.

३ मिनिटे आणि काही सेकंदांच्या या ट्रेलरमध्ये कमर्शियल हिंदी चित्रपटाकडून अपेक्षित असलेले सर्व घटक आहेत. अशातच, 'किसी का भाई किसी की जान'च्या ट्रेलरमध्ये फॅमिली इमोशन्स, कॉमेडी, रोमांस, ड्रामा, संगीत आणि अर्थातच अ‍ॅक्शनची झलक पाहायला मिळते. सलमान खान फिल्म्स प्रोडक्शनचा 'किसी का भाई किसी की जान'या सिनेमाची निर्मिती सलमान खानने केली असून, फरहाद सामजी यांनी दिग्दर्शन केले आहे. तसेच, या चित्रपटात सलमान खान, वेंकटेश दग्गुबाती, पूजा हेगडे, जगपती बाबू, भूमिका चावला, विजेंदर सिंग, अभिमन्यू सिंग, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल, शहनाज गिल, पलक तिवारी आणि विनाली भटनागर यांच्या भूमिका आहेत. अशातच, अ‍ॅक्शन, कॉमेडी, ड्रामा आणि रोमान्सने भरपूर असलेला 'किसी का भाई किसी की जान'हा चित्रपट २०२३च्या ईदला प्रदर्शित होणार असून, जगभरात झी स्टुडिओजद्वारा रिलीज करण्यात येणार आहे.

Maharashtra MLC Elections : राज्यातील विधान परिषदेच्या ५ जागांसाठी निवडणूक जाहीर; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Mumbai Ganeshotsav 2026 : अवघ्या '१ इंच'चा बाप्पा; शिवलिंगात विराजमान झालेल्या गणरायाचा Video व्हायरल

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणातील CCTV फुटेज पोलिसांच्या हाती; परीक्षा केंद्रातील 'त्या' १५ मिनिटांत नेमकं काय घडलं?

Bihar Viral Video : अल्पवयीन विद्यार्थिनीला घेरून गैरवर्तन; मुख्य आरोपी पोलिसांच्या चकमकीत जखमी

सोनिया गांधी मतदार यादी प्रकरणाला नवे वळण; कायदेशीर त्रुटींमुळे कनिष्ठ न्यायालयाचा आदेश रद्द, तक्रारीवर नव्याने सुनावणी