मनोरंजन

आला महेश मांजरेकरांच्या 'देवमाणूस'चा उत्कंठावर्धक टीझर; चित्रपट 'या' दिवशी राज्यभर होणार रिलीज!

कधीही न पाहिलेल्या भूमिकेत महेश मांजरेकर दिसत आहेत. तसेच रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि सिद्धार्थ बोडके यांचीही भूमिका अतिशय आकर्षक आणि जबरदस्त दिसत आहे. लक्ष वेधून घेणारे दृश्य आणि वेगवान साउंडट्रॅकसह, "देवमाणूस" चित्रपटाची भव्यता समजून येते.

Krantee V. Kale

लव फिल्म्स निर्मित "देवमाणूस" सिनेमाचा टीझर गुरूवारी (दि.१३) रिलीझ झाला. या टीझरमध्ये आपण अभिनेता महेश मांजरेकर यांना कधीही न पाहिलेल्या वारकरीच्या भूमिकेत पाहू शकतो, तसेच रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि सिद्धार्थ बोडके यांचीही भूमिका अतिशय आकर्षक आणि जबरदस्त दिसत आहे. लक्ष वेधून घेणारे दृश्य आणि वेगवान साउंडट्रॅकसह, "देवमाणूस" चित्रपटाची भव्यता समजून येते.

या मल्टीस्टारर चित्रपटात मराठी सिनेसृष्टीतील दमदार कलाकार महेश मांजरेकर, रेणुका शहाणे आणि सुबोध भावे यांच्या प्रमुख भूमिका आहेत आणि त्यांच्यासोबत लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ बोडके सुद्धा आहे.

चित्रपट कधी होणार प्रदर्शित?

टीझर रिलीझवेळी, दिग्दर्शक तेजस प्रभा विजय देऊस्कर म्हणाले, “देवमाणूस हा माझ्यासाठी अतिशय रोमांचक प्रोजेक्ट आहे कारण त्याची विलक्षण बांधणी आणि त्यातील पात्रांची सखोलता या प्रतिभावान कलाकारांनी जिवंत केली आहे. हा चित्रपट बनवण्याचा संपूर्ण प्रवास खूपच मनोरंजक आहे आणि या टीझरद्वारे प्रेक्षकांपर्यंत या सिनेमाची एक झलक शेअर करताना मला खूपच आनंद होत आहे. देवमाणूस २५ एप्रिल २०२५ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होईल.” या चित्रपटाचे दिग्दर्शन तेजस प्रभा विजय देऊस्कर यांनी केले आहे. लव रंजन आणि अंकुर गर्ग निर्मित आहे.

Mumbai : दसरा मेळाव्यासाठी दादरमधील वाहतुकीत मोठे बदल! २० ऑक्टोबरला 'हे' रस्ते बंद; पर्यायी मार्ग, पार्किंगची व्यवस्था जाणून घ्या

Mumbai : अजय देवगणच्या जुहूतील बंगल्यावर BMC चा हातोडा! अनधिकृत बांधकामावर कारवाई; नेमकं प्रकरण काय?

Delhi Protest : अभिजीत दिपकेंना आज न्यायालयात हजर करणार; AISA च्या नेहा बोरा यांची सुटका

Mumbai : कफ परेड मरिना प्रकल्पाला स्थगिती; MMRDA च्या मंजुरीची एमसीझेडएमएची मागणी

Nagpur : शाळकरी विद्यार्थ्यांचं कृत्य; यूट्यूबवर व्हिडीओ पाहून अल्पवयीन मैत्रिणीचा गर्भपात करण्याचा प्रयत्न, आरोपी अटकेत