मनोरंजन

National Film Award 2023 : सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून पुष्पा भाऊ, तर अभिनेत्री म्हणून गंगूबाई काठियावाडी आणि क्रिती सेनन

सलील कुलकर्णी यांनी दिग्दर्शीत केलेला 'एकदा काय झालं' हा मराठी चित्रपट सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे.

नवशक्ती Web Desk

६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची आज (२४ऑगस्ट) रोजी घोषणा करण्यात आली. यात 'रॉकेट्री - द नम्बी इफेक्ट' या सिनेमाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला., तर सलील कुलकर्णी यांनी दिग्दर्शीत केलेला 'एकदा काय झालं' हा मराठी चित्रपट सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे.

याचबरोबर 'गोदावरी' या मराठी सिनेमाचे दिग्दर्शक निखिल महाजन यांना उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून गौरवण्यात आलं आहे. तर चंद्रकांत कुलकर्णी निर्मित आणि प्रतिमा जोशी दिग्दर्शित 'चंद सासे' या शॉर्टफिल्मला कौटुंबिक सिनेमा पुरस्कार घोषित झाला आहे.

दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जून याला पुष्पा या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून गौरवण्यात आलं आह. तर अभिनेत्री आलिया भट्टला गंगूबाई काठियावाडी साठी तर अभिनेत्री क्रिती सेननला मीमी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून गौरवण्यात आलं आहे.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

‘बटेंगे तो कटेंगे’, ओबीसीने भाजपला तारले