मनोरंजन

मोदींच्या ७५व्या वाढदिवशी खास भेट! 'मां वंदे' बायोपिकची घोषणा, 'हा' अभिनेता साकारणार मोदींची भूमिका, पहिली झलक प्रदर्शित

Maa Vande : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, १७ सप्टेंबर रोजी, आपला ७५ वा वाढदिवस साजरा करत आहेत. या दिवशी सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत असताना, दक्षिणेतील चित्रपटसृष्टीतून मोदींना एक मोठं सरप्राईज मिळालं आहे. त्यांच्या जीवनप्रवासावर आधारित भव्य बायोपिकची घोषणा करण्यात आली आहे.

Mayuri Gawade

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज १७ सप्टेंबर रोजी, आपला ७५ वा वाढदिवस साजरा करत आहेत. या दिवशी सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत असताना, दक्षिणेतील चित्रपटसृष्टीतून मोदींना एक मोठं सरप्राईज मिळालं आहे. त्यांच्या जीवनप्रवासावर आधारित भव्य बायोपिकची घोषणा करण्यात आली आहे. 'सिल्वर कास्ट क्रिएशन्स' या निर्मिती संस्थेकडून 'मां वंदे' या चित्रपटाचे अनावरण करण्यात आले असून यात मलयाळम अभिनेता उन्नी मुकुंदन नरेंद्र मोदींची भूमिका साकारणार आहेत.

उन्नी मुकुंदनने देखील या चित्रपटाचे पहिले पोस्टर आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले. पोस्टरमध्ये मोदींच्या भूमिकेतील त्याची झलक पाहायला मिळाली आहे. त्याचसोबत त्याने मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत भावनिक संदेश लिहिला आहे - "माझा पुढील चित्रपट 'मां वंदे'मध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र दामोदरदास मोदी यांची भूमिका साकारत असल्याची घोषणा करताना मला अभिमान वाटतो."

उन्नी मुकुंदनने आपल्या आठवणींना उजाळा देत म्हटलं की, "माझं बालपण अहमदाबादमध्ये गेलं आणि मी मोदीजींना प्रथम मुख्यमंत्री म्हणून पाहिलं. एप्रिल २०२३ मध्ये मला त्यांची वैयक्तिक भेट घेण्याची संधी मिळाली, तो क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय असून ही आठवण माझ्या आयुष्यात कायमची कोरळी गेली आहे. त्यांच्या भूमिकेत पडद्यावर उतरणं माझ्यासाठी प्रेरणादायी आहे."

या चित्रपटात मोदींचा बालपणापासून ते देशाचे पंतप्रधान होण्यापर्यंतचा संघर्षमय प्रवास दाखवला जाणार आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी क्रांती कुमार सीएच यांच्याकडे असून, हा चित्रपट इंग्रजीसह विविध भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

शासकीय जमिनीवरील पात्र घरांना कायदेशीर मान्यता; २०११ पूर्वीच्या पात्र घरांसाठी सुवर्णसंधी; ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Mumbai : पोलिसांची गाडी रोखणाऱ्या 'त्या' तरुणीची सायबर सेलमध्ये धाव; ऑनलाइन छळ, अश्लील ट्रोलिंगविरोधात तक्रार

Thane : सिग्नलवरील प्रतीक्षा अवधी १५ सेकंदांवर येणार; वाहतूक सुधारणा प्रकल्पाचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

आता पैशामुळे शस्त्रक्रिया थांबणार नाहीत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

मुंबईत ३३ ठिकाणी फ्लड गेट; पूरस्थितीचा इशारा देणारी सेन्सर यंत्रणा उभारणार; २०२९ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट