मनोरंजन

Kantara : आता 'कांतारा'चा येणार प्रीक्वेल; ऋषभ शेट्टीने केली अधिकृत घोषणा

देशभरात गाजलेला कन्नड चित्रपट 'कांतारा'ने (Kantara) १०० दिवसांचे जंगी सेलिब्रेशन केले

वृत्तसंस्था

देशभरात गाजलेल्या 'कांतारा' चित्रपटाने १०० दिवस पूर्ण केले. यावेळी चित्रपटाच्या संपूर्ण टीमने जंगी सेलिब्रेशन केले. 'कांतारा'ने आपल्या उत्कृष्ट कथानक आणि सीन्सने दर्शकांची मने जिंकली. फक्त १६ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ४५० कोटींची बक्कळ कमाई केली. तसेच, बॉलिवूड सेलिब्रिटींपासून जगातील अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी या चित्रपटाचे कौतुक केले. 'कांतारा' हा २०२२चा धमाकेदार ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला. चित्रपटाला मिळालेल्या उदंड यशानंतर, प्रेक्षक याच्या सिक्वेलच्या घोषणेची वाट पाहत असतानाच, निर्मात्यांनी आता अखेर चित्रपटाच्या प्रीक्वेलची घोषणा केली.

चित्रपटाला १०० दिवस पूर्ण झाल्याप्रसंगी चित्रपटाचे लेखक, अभिनेता आणि दिग्दर्शक ऋषभ शेट्टी यांनी 'कांतारा'च्या सिक्वेलबद्दल खुलासा केला आहे. तो म्हणाला "आम्ही प्रेक्षकांचे खूप आभारी आहोत. त्यांनी 'कांतारा'ला अपार प्रेम आणि पाठिंबा देऊन हा प्रवास पुढे नेला. सर्वशक्तिमान देवाच्या आशीर्वादाने या चित्रपटाने यशस्वीरित्या १०० दिवस पूर्ण केले आहेत. अशातच, या विशेष प्रसंगी मी 'कांतारा'च्या प्रीक्वेलची घोषणा करत आहे. तुम्ही पाहिलेला पार्ट २ आहे, पार्ट १ पुढील वर्षी येईल. 'कांतारा' चित्रपटाचे शूटिंग करत असताना ही कल्पना माझ्या मनात आली. कारण कांताराचा इतिहास अधिक खोल आहे. तसेच, या चित्रपटाच्या लिखाणावरही आम्ही काम करत आहोत. संशोधन अद्याप सुरू असल्याने चित्रपटाबद्दल तपशील उघड करणे फार लवकर होईल."

IND vs SA: मालिका विजयाची आज संधी; अहमदाबाद येथे भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिकेशी पाचवा टी-२० सामना

बांगलादेश पुन्हा पेटले! शेख हसीनांचा कट्टर विरोधक उस्मान हादीच्या मृत्यूनंतर हिंसाचार; हिंदू तरुणाला ठार केले, मीडिया कार्यालयांना जाळले

Thane: शिंदेंच्या मतदारसंघात भाजपला सेनेसोबत युती नको; भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आक्रमक

शेजाऱ्याने ५ वर्षांच्या चिमुकल्याला 'फुटबॉल'सारखं तुडवलं; धक्कादायक CCTV Video व्हायरल, गुन्हा दाखल

निवृत्तीपूर्वी जज फारच षटकार मारत आहेत! सुप्रीम कोर्टानेच न्यायव्यवस्थेतील भ्रष्ट कारभारावर ओढले ताशेरे