मनोरंजन

Singham 3: 'सिंघम 3' चित्रपटातील अजय देवगनचा लूक आऊट; चित्रपटाबाबत प्रेक्षकांची आतुरता शिगेला

या चित्रपटाची आणि अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' या सिनेमाची बॉक्स ऑफिसवर चांगलीच टक्कर होणार आहे.

नवशक्ती Web Desk

बॉलीवूड अभिनेता अजय देवगणच्या 'सिंघम 3' या बहुचर्चित चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. 'सिंघम ३' हा चित्रपट 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित या चित्रपतील अजय देवगनचा लूक आता आऊट झाला आहे. बाजीराव सिंघमच्या अंगावर शहारे आणणाऱ्या लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

'सिंघम 3' या चित्रपटात अजय देवगन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आता या सिनेमातील अभिनेत्याचा फर्स्ट लूक आऊट झाला आहे. अभिनेता अजय देवगनने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फर्स्ट लूकची झलक चाहत्यांना दाखवली आहे. त्यामुळे चाहत्यांची चित्रपटाबाबत उत्सुकता आणखी शिगेला पोहचली आहे.

अजयने सोशल मीडियावर 'सिंघम 3' या सिनेमाचं मोशन पोस्टर शेअर केलं आहे. 'सिंघम 3'च्या पोस्टरमध्ये अजयच्या सिंघम अवतार पाहायला मिळत आहे. पोस्टरमध्ये अजयसह सिंहाची झलकही पाहायला मिळत आहे. पोस्टर शेअर करत अजय देवगणने लिहिलं आहे की ,"तो पराक्रमी आहे, त्याच्याकडे शक्ती आहे, तो खतरा आहे, तो ताकद आहे..सिंघम परत येतोय".

'सिंघम 3' या चित्रपटाचे दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी केलं आहे. अजय देवगनसह या सिनेमात करीना कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसंच दीपिका पादुकोण आणि टायगर श्रॉफ यांच्या देखील या चित्रपटात महत्तवाच्या भूमिका असतील. 'सिंघम 3' हा सिनेमा 15 ऑगस्ट 2024 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची आणि अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' या सिनेमाची बॉक्स ऑफिसवर चांगलीच टक्कर होणार आहे.

Navi Mumbai : खारघरमधील भूखंडाला सर्वाधिक बोली; सेंट्रल पार्कलगतचा प्लॉट तब्बल २१०० कोटींना

Mumbai : तिन्ही रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक; प्रवाशांची होणार गैरसोय

निवडणुकीच्या तोंडावर सरकारला गरीबांची आठवण; 'शिवभोजन थाळी'ची पुन्हा घेता येणार चव; २८ कोटींचा निधी उपलब्ध

मतदार यादीतील घोळ दूर करण्यासाठी कोलंबिया पॅटर्न; आज महाराष्ट्रात येणार कोलंबियाचे पथक

Mumbai : सर्व मेट्रो संस्थांच्या एकत्रीकरणासाठी समिती; ३ महिन्यांत अहवाल शासनास करणार सादर