मनोरंजन

Manoj Bajpayee : मनोज बाजपेयीच्या आगामी कोर्टरूम ड्रामाचे फोटो आले समोर, मुंबईत शूटिंग सुरू!

मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee), विनोद भानुशाली आणि अपूर्व सिंग कार्की यांच्या कोर्टरूम ड्रामाचे फोटो झाले इंटरनेटवर व्हायरल...

प्रतिनिधी

तीन वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) यांनी अलीकडेच त्यांच्या आगामी शीर्षकहीन कोर्टरूम ड्रामाची घोषणा केली. विनोद भानुशाली यांच्या भानुशाली स्टुडिओ लिमिटेड, सुपर्ण एस वर्मा आणि झी स्टुडिओजद्वारा समर्थित असलेल्या या कोर्टरूम ड्रामाच्या सेटवरील चित्रे इंटरनेटवर व्हायरल होऊ लागली आहेत.

या कोर्टरूम ड्रामाचे चित्रीकरण गेल्या महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यात सुरू झाले असून, मुंबईत सुरू असलेल्या शूटिंगच्या काही झलक आता समोर येऊ लागल्या आहेत. ही छायाचित्रे मुंबईच्या शेड्यूलमधील आहेत, ज्यामध्ये कोर्ट रूमचे काही इंटेन्स सीन्स शूट केले जाणार आहेत. तसेच सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत या शेड्युलचे चित्रीकरण मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहे.

अलीकडेच, टीमने जोधपूरमध्ये शूटिंग शेड्यूल पूर्ण केले. मनोज बाजपेयी यांनी या दौऱ्यादरम्यान शहरातील आदरातिथ्य अनुभवल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. शिवाय, चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असतानाच, २०२३मध्ये रिलीज होण्याची अपेक्षा निर्माते करत आहेत.

या हार्ड हिटिंग कथेसह दिग्दर्शक अपूर्व सिंग कार्की यांचे हिंदी चित्रपटांमध्ये पदार्पण होत आहे, ज्यांनी अनेक एस्पिरेंट्स, सास बहू आचार प्रायव्हेट लिमिटेड, आणि फ्लेम्स यांसारखे लोकप्रिय ओटीटी शो तयार केले आहेत. सुपर्ण एस वर्मा आणि मनोज बाजपेयी हे पुरस्कार विजेती मालिका 'द फॅमिली मॅन'नंतर एकत्र येत आहेत. तसेच, या चित्रपटात उत्कृष्ट कलाकारांचाही समावेश आहे.

झी स्टुडिओ आणि भानुशाली स्टुडिओ लिमिटेडद्वारे प्रस्तुत, सुपर्ण एस वर्माचा कोर्टरूम ड्रामा अपूर्व सिंग कार्की दिग्दर्शित, आणि विनोद भानुशाली, कमलेश भानुशाली, आसिफ शेख आणि विशाल गुरनानीद्वारा निर्मित आहे.

हरिनामाच्या गजराने विठ्ठलाची पंढरी दुमदुमली! पंढरीत १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी; आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा !

महागड्या शक्तिपीठ महामार्गाला आमचा विरोध; सुप्रिया सुळे यांचे ठाम प्रतिपादन

आवाज मराठीचाच! उद्धव-राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर एकाच मंचावर; राज्यभरातील मराठी माणसांमध्ये आनंदाचे वातावरण

डोममध्ये रंगला झिम्मा; शर्मिला ठाकरे, सुषमा अंधारे यांची फुगडी

देशात गरीबांची संख्या वाढणे ही चिंता वाढवणारी बाब; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन