मनोरंजन

आधी लगीन कोंढाण्याचं, लवकरच येतोय ‘सुभेदार’...

दिग्पाल लांजेकर यांच्या 'शिवराज अष्टक' मधील नवा चित्रपट

नवशक्ती Web Desk

“आधी लगीन कोंढाण्याचं आन मग माझ्या रायबाचं " म्हणत दंड थोपटून कोंढाण्यावर चढाई करत, अखेरच्या श्वासापर्यंत लढणाऱ्या सुभेदार नरवीर तान्हाजी मालुसरे हे शिवछत्रपतींच्या योद्ध्यांपैकी महत्त्वाचे नाव! सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या पराक्रमाचा सुवर्ण इतिहास रुपेरी पडद्यावर मांडणाऱ्या ‘सुभेदार’ चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

‘पहिला मानाचा मुजरा’ असं म्हणत प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या या टीझरमधून अतुल्य शौर्याची झलक पहायला मिळतेय. लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या शिवराज अष्टकातील पाचवे चित्रपुष्प असलेला ‘सुभेदार’ चित्रपट २५ ऑगस्ट २०२३ ला चित्रपटगृहांत झळकणार आहे. 'शिवराज अष्टक'मधील 'फर्जंद', 'फत्तेशिकस्त', 'पावनखिंड' आणि 'शेर शिवराज' चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर ‘सुभेदार’ या पाचव्या चित्रपुष्पासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

या चित्रपटात अजय पुरकर तान्हाजीच्या भूमिकेत दिसतील, तर चिन्मय मांडलेकर पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसतील.

Ind Vs Pak Asia Cup : भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज लढत आज; दुबईत रंगणार मैदानातील महायुद्ध

Ind Vs Pak Asia Cup : भारत-पाक सामन्यावरून राजकीय घमासान!

Ind Vs Pak Asia Cup : ''भारतासमोर खेळण्याशिवाय पर्याय नाही''; अखेर BCCI ने सांगितले कारण

भारत-पाकिस्तान सामना : शिवसेना ठाकरे गटाची महिला आघाडी रस्त्यावर; 'माझं कुंकू, माझा देश' आंदोलन, पंतप्रधान मोदींना पाठवलं 'सिंदूर'

९९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ठरले; पानिपतकार विश्वास पाटलांच्या नावावर शिक्कामोर्तब