सुरज चव्हाणची लगीनघाई! अंकिताने केलं थाटात केळवण; झापूकझूपुक अंदाजात घेतला उखाणा, व्हिडिओ व्हायरल 
मनोरंजन

सुरज चव्हाणची लगीनघाई! अंकिताने केलं थाटात केळवण; 'झापूक झूपुक' अंदाजात घेतला उखाणा, व्हिडिओ व्हायरल

कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरने सूरज आणि त्याची होणारी बायको संजना यांचं केळवण अगदी थाटामाटात केलं. या समारंभात सूरज आणि संजनाने एकमेकांसाठी घेतलेले उखाणे चाहत्यांच्या मनात घर करून गेले आहेत.

Mayuri Gawade

‘बिग बॉस मराठी ५’मधून प्रेक्षकांची मनं जिंकलेला आणि विजेता ठरलेला रीलस्टार सूरज चव्हाण सध्या त्याच्या आयुष्यातील आणखी एका खास टप्प्यात प्रवेश करतोय. रिअॅलिटी शोमधून लोकप्रिय झालेला सूरज लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. नुकतंच सूरजच्या लग्नाआधीचा केळवण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला असून, त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

कोकण हार्टेड गर्ल अंकिताने केले केळवण

कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरने सूरज आणि त्याची होणारी बायको संजना यांचं केळवण अगदी थाटामाटात केलं. या समारंभात सूरज आणि संजनाने एकमेकांसाठी घेतलेले उखाणे चाहत्यांच्या मनात घर करून गेले आहेत. “बिग बॉस जिंकून झालं माझं पूर्ण स्वप्न, संजनाचं नाव घेतो... बोललो होतो ना आधी करियर मग लग्न!” असा सूरजचा उखाणा ऐकून सर्वांनी टाळ्या वाजवल्या, तर संजनानेही हटके अंदाजात “बिग बॉसचा विनर झाला माझ्या प्रेमात सायको, सूरजरावांचं नाव घेते मीच त्यांची होणारी बायको!” असा भारी उखाणा घेतला.

सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

सूरजने काही दिवसांपूर्वी लग्नाची गुडन्यूज दिली होती, मात्र त्यावेळी त्याने बायकोचा चेहरा उघड केला नव्हता. आता अंकिताने शेअर केलेल्या व्हिडिओमधून संजनाचं रूपही समोर आलं आहे. दोघांच्या लग्नाची चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली असून, सोशल मीडियावरून शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.

CJP Protest : रांका, दास यांना ५ दिवसांची न्यायालयीन कोठडी; तिहारमध्ये रवानगी, दिपके आक्रमक, म्हणाले - "हिंमत असेल तर...

पत्नीशी वाद टाळण्यासाठी बाल्कनीतून पळण्याचा प्रयत्न जीवावर; २१ व्या मजल्यावरून पडून पतीचा मृत्यू

Bihar Boat Tragedy : गंगा नदीत प्रवाशांनी भरलेली नाव उलटली; एकाच कुटुंबातील १३ मुलांचा करुण अंत, VIDEO

Ahmedabad : चनिया चोली घालून महिला पोलिसांचा गरबा; स्त्रियांच्या सुरक्षेसाठी 'तिच्या टीम'ची अनोखी शक्कल

Nalasopara Fire : नालासोपाऱ्यात १४ मजली इमारतीला भीषण आग; दोन महिलांचा मृत्यू, २५ रहिवाशांची सुटका, VIDEO