मनोरंजन

Vikram Gokhale Health Update : विक्रम गोखले यांच्या निधनाची बातमी ही अफवा असून ते सध्या व्हेंटिलेटरवर

अजय देवगण, जावेद जाफरी यांसारख्या सेलिब्रिटींनीही रात्री उशिरा विक्रम गोखले यांना श्रद्धांजली वाहणारे ट्विट केले, ज्यामुळे गोखले यांच्या निधनाबद्दल संभ्रम

प्रतिनिधी

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या पत्नी वृषाली यांनी पुण्यातील त्यांच्या निधनाचे वृत्त चुकीचे असल्याचे म्हटले आहे. विक्रम गोखले यांच्या निधनाची बातमी ही अफवा असून ते सध्या व्हेंटिलेटरवर असल्याचे वृषालीने म्हटले आहे.

काल संध्याकाळी ते कोमात गेल्यानंतर ते स्पर्श करूनही प्रतिसाद देत नसल्याने त्यांना सध्या व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती सुधारत आहे, डॉक्टर सकाळी निर्णय घेतील की ते प्रतिसाद देत आहे की नाही,” विक्रम गोखले यांच्या पत्नी वृषाली यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले. अधिकृत ट्विटर हँडलवरून, अजय देवगण, जावेद जाफरी यांसारख्या सेलिब्रिटींनीही रात्री उशिरा विक्रम गोखले यांना श्रद्धांजली वाहणारे ट्विट केले, ज्यामुळे गोखले यांच्या निधनाबद्दल संभ्रम निर्माण झाला. यासंदर्भात स्पष्टीकरण देताना पत्नी वृषाली यांनी ही माहिती दिली आहे.

RBI New Rules : आता एका क्लिकवर थांबवता येणार डिजिटल पेमेंट; 'स्टॉप स्विच'सह आरबीआयचे नवे नियम, वाचा सविस्तर

Mumbai : गुरुवारी, शुक्रवारी पाणीबाणी; धारावी, वांद्रे, सांताक्रूझ, अंधेरी, भांडुपमध्ये पाणी नाही

दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टला पुन्हा बॉम्बने उडवण्याची धमकी; FIR दाखल, पोलिसांकडून तपास सुरू

Pune : साडेतीन वर्षांचे प्रेमसंबंध, लग्नालाही घरच्यांचा होकार; तरीही संशयावरून वाद, प्रियकराने आयटी इंजिनिअर प्रेयसीला संपवलं

नवरा वारंवार माहेरी पाठवायचा, संशय आल्याने बायकोने घरात लावले CCTV; फुटेज पाहून पायाखालची जमीनच सरकली