मनोरंजन

Bigg Boss Marathi 5: "वैभव त्याच्या बॉडीमुळे दिसतोय...." निक्कीने केलं वैभवला टार्गेट

घरातला सदस्यांमध्ये मतभेद होण्यास सुरुवात झाली आहे. टीम A मध्ये फूट पडलेली पाहायला मिळत आहे.

Tejashree Gaikwad

Bigg Boss Marathi Day 39 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सहाव्या आठवड्याची सुरुवात चांगलीच दणक्यात झाली आहे. घरातला सदस्यांमध्ये मतभेद होण्यास सुरुवात झाली आहे. टीम A मध्ये फूट पडलेली पाहायला मिळत आहे.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या व्हिडीओत आपण पाहू शकतो की, निक्की आणि अरबाज वैभव विषयी बोलताना दिसत आहेत. निक्की अरबाजला म्हणते की," वैभवला तुझ्या आणि माझ्यापासून जेलीसी आहे. एका गोष्टीवरून नाही तर अनेक गोष्टीवरून त्याला आपल्यासोबत जेलेसी आहे. तुझा राग, गेम जास्त उभरून दिसतो. विकेंडच्या वार पण तूझ्याबद्दल बोलले जाते. तुझी निगेटिव्ह का होईना पण भाऊच्या धक्यावर बोलले जाते. त्यांना जेलिसी आहेत की त्याच्या बद्दल बोलले जात नाही. वैभव फक्त त्याच्या बॉडीमुळे इथे दिसत आहे."

'बिग बॉस मराठी'च्या या आठवड्यात अजून काय काय आपल्याला पाहायला मिळेल. निक्कीच्या अश्या बोलण्याने वैभव काय रिॲक्ट करेल. हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.

Maratha Reservation : मराठा वादळाने मुंबईला हादरा; आता माघार नाही – मनोज जरांगेंचा निर्धार; पावसामुळे आंदोलकांचे प्रचंड हाल

मुंबईला पावसाने झोडपले; पुढील तीन दिवस मध्यम पावसाची शक्यता

नाकापेक्षा मोती जड

जीवनसाखळी संरक्षित करूया!

आजचे राशिभविष्य, ३० ऑगस्ट २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत