जाॅन टर्नस आणि टीम कूक Apple
आंतरराष्ट्रीय

जाॅन टर्नसच्या हाती ॲपल! टीम कूक लवकरच सोडणार कंपनीचे मुख्याधिकारीपद

टर्नस यांच्यासमोर आता अलीकडच्या काळातील अत्यंत महत्त्वाच्या संक्रमण काळात कंपनीचे नेतृत्व करण्याचे आव्हान आहे. पुरवठा साखळ्यांचा सामना करताना कंपनीचे बाजारातील वर्चस्व टिकवणे, एआय केंद्रित वातावरणात वाढीचे मार्ग निवडणे ही प्रमुख जबाबदारी असेल.

Krantee V. Kale

कॅलिफोर्निया : आयफोन निर्माता ॲपलने नेतृत्वबदलाची घोषणा केली असून विद्यमान सीईओ टीम कूक पद सोडणार आहेत. ते दीर्घकाळ हार्डवेअर प्रमुख राहिलेले जाॅन टर्नस यांच्याकडे सूत्रे सोपवणार आहेत. यामुळे कुक यांच्या शांत नेतृत्वशैली आणि सातत्यपूर्ण वाढीने ओळखल्या जाणाऱ्या दीड दशकांच्या कार्यकाळाचा शेवट होत आहे.

ॲपलमध्येच जवळपास संपूर्ण कारकीर्द घालवलेले टर्नस सध्या हार्डवेअर इंजिनिअरिंगचे वरिष्ठ उपाध्यक्ष आहेत. ते १ सप्टेंबर २०२६ पासून सीईओपदाची जबाबदारी स्वीकारतील, तर कुक संचालक मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष बनतील.

ॲपलमध्ये येण्यापूर्वी त्यांनी व्हर्च्युअल रिसर्च सिस्टीम्स येथे मेकॅनिकल इंजिनिअर म्हणून काम केले. त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हॅनिया येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी मिळवली आहे. कंपनीच्या मते, कुक उन्हाळ्यापर्यंत सीईओ म्हणून कार्यरत राहतील आणि टर्नस यांच्यासोबत संक्रमण प्रक्रिया सुरळीत पार पाडतील. कार्यकारी अध्यक्ष म्हणून ते धोरणात्मक बाबींमध्ये, विशेषतः जागतिक धोरणकर्त्यांशी संवाद साधण्यात, भूमिका निभावतील.

टर्नस यांच्यासमोर आता अलीकडच्या काळातील अत्यंत महत्त्वाच्या संक्रमण काळात कंपनीचे नेतृत्व करण्याचे आव्हान आहे. पुरवठा साखळ्यांचा सामना करताना कंपनीचे बाजारातील वर्चस्व टिकवणे, एआय केंद्रित वातावरणात वाढीचे मार्ग निवडणे ही प्रमुख जबाबदारी असेल.

हार्डवेअर प्रमुख ते सीईओ

टर्नस हे २००१ मध्ये ॲपलच्या प्रॉडक्ट डिझाइन टीममध्ये सहभागी झाले. २०१३ मध्ये हार्डवेअर इंजिनिअरिंगचे उपाध्यक्ष बनले. २०२१ मध्ये ते वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून कार्यकारी टीममध्ये दाखल झाले. मॅक संगणक क्षेत्रातील त्यांच्या कामामुळे श्रेणीला नवसंजीवनी मिळाली. चार दशकांच्या इतिहासातील लोकप्रियता प्राप्त झाली आहे. अलीकडेच त्यांनी आयफोन १७ प्रो, प्रो मॅक्स, अल्ट्रा-थिन आयफोन एअर आणि सुधारित आयफोन १७च्या निर्मितीचे नेतृत्व केले. एअरपॉड्समध्ये ॲक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशनसह अनेक सुधारणा करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. टिकाऊपणा, साहित्य नवकल्पना आणि पर्यावरणीय परिणाम कमी करण्यासाठी त्यांनी उपक्रम राबवले आहेत. यामध्ये पुनर्वापरित ॲल्युमिनियमचा वापर, ॲपल वॉच अल्ट्रा ३ मध्ये थ्री-डी-प्रिंटेड टायटॅनियमचा समावेश आणि उत्पादनांची दुरुस्ती सुलभ करणे यांचा समावेश आहे.

Thane : सर्व्हिस सेंटरमध्ये १० जूनपर्यंत वाहने धुण्यावर निर्बंध; पाणीटंचाई टाळण्यासाठी महापालिकेचा मोठा निर्णय

विश्रांती कक्षाचा वापर धार्मिक विधींसाठी पुण्यातील बहुराष्ट्रीय कंपनीची चौकशी करण्याचे निर्देश

अयान अहमद आईचे दागिने विकून करायचा शौक; अमरावती लैंगिक शोषणप्रकरणी धक्कादायक खुलासा

तमिळनाडूमध्ये प्रचाराच्या तोफा थंडावल्या; ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य EVMमध्ये बंद होणार, ४ मे रोजी निवडणुकीचा निकाल

मुंबईकरांचा प्रवास होणार अधिक सुखकर; बेस्ट ५०० मिडी बसेस भाडेतत्त्वावर घेणार