Photo : X (@IndianTechGuide)
आंतरराष्ट्रीय

पँगाँग सरोवराजवळ चीन उभारतोय हवाई सुरक्षा संकुल; चीनचे कटकारस्थान उघड

पँगाँग सरोवराजवळील नियंत्रण रेषेजवळ चीन एक नवे हवाई सुरक्षा संकुल (एअर डिफेन्स कॉम्प्लेक्स) उभारीत आहे. हे ठिकाण २०२० साली गलवान येथे भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये संघर्ष झालेल्या ठिकाणापासून ११० किमी अंतरावर आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : चीनचे एक नवे कारस्थान उघडकीस आले असून पँगाँग सरोवराजवळील नियंत्रण रेषेजवळ चीन एक नवे हवाई सुरक्षा संकुल (एअर डिफेन्स कॉम्प्लेक्स) उभारीत आहे. हे ठिकाण २०२० साली गलवान येथे भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये संघर्ष झालेल्या ठिकाणापासून ११० किमी अंतरावर आहे.

लडाखमधील गलवान खोऱ्यात चीनच्या सैन्याने केलेल्या घुसखोरीमुळे भारत आणि चीनमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला होता. तेव्हापासून आतापर्यंत भारत आणि चीन यांच्यामधील संबंध म्हणावे तसे सुधारलेले नाहीत. याचदरम्यान, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील चीनच्या कुरापती सुरूच असून, उपग्रहाद्वारे टिपण्यात आलेल्या छायाचित्रांमधून आता चीनचे नवे कटकारस्थान उघडकीस आले आहे.

या डिझाइनची ओळख सर्वप्रथम ‘ऑलसोर्स ॲनॅलिसिस’ने पटवली होती. ती प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून सुमारे ६५ किमी दूर अंतरावर आहे. तसेच भारताच्या ॲडव्हान्स न्योमा हवाई तळाच्या अगदी समोर आहे. इतर स्पेस इंटेलिजन्स एजन्सीच्या स्वतंत्र संकेतस्थळावरील फोटोंमध्ये संशयास्पद मिसाईल लॉन्च साईट्सवर स्लायडिंगचे छप्पर दिसत आहे. त्यामधील प्रत्येक छप्पर एवढे मोठे आहे की, त्यामध्ये दोन वाहने आरामात सामावू शकतात. ‘इमेजरी’च्या २९ सप्टेंबरच्या फोटोंमध्ये काही लॉन्च पोझिशन्सवर खुले छप्पर दिसत आहे. त्यामधून खाली काही लॉन्चर्स असू शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे. ही बाब ऑपरेशनल क्षमतेच्या ॲडव्हान्स स्टेजकडे इशारा करत आहे.

साइटवर वेगाने बांधकाम सुरू

चीनकडून सुरू असलेले हे बांधकाम त्याच्या अत्याधुनिक, झाकलेल्या मिसाईल लॉन्चिंग पोझिशन्स आणि मोठ्या पायाभूत रचनेमुळे लक्ष वेधून घेत आहेत. संरक्षण तज्ज्ञांच्या मते या भक्कम शेल्टर्समध्ये चीनच्या लाँग रेंज एचक्यू-९ सरफेस टू एअर मिसाईल्स ठेवण्यात आल्या आहेत. त्यावरून या भागातील एअर डिफेन्सच्या क्षमतेमध्ये हे कॉम्प्लेक्स महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते. या कॉम्प्लेक्सचे बांधकाम पँगाँग लेकच्या साईटवर सुरू आहे.

ऑफिसमध्ये WhatsApp Web वापरताय? लॉगआउट न करताच निघू नका; गृह मंत्रालयाचा इशारा, वाचा सविस्तर

Dhruv Rathee : यूट्यूबर ध्रुव राठीच्या अडचणीत वाढ; २०१८ च्या मानहानी प्रकरणात दिल्ली कोर्टाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी

Solapur : बोअरवेलमध्ये पडून दीड वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू; रात्रभर बचावकार्य सुरू, पण प्रयत्न अपयशी, पंढरपुरात हळहळ

Bisleri Water Controversy : बिस्लेरीच्या बाटलीबंद पाण्यावर FSSAI ची कारवाई; कंपनीचं स्पष्टीकरण समोर, नेमकं प्रकरण काय?

Chhatrapati Sambhajinagar : प्रवासी झोपेत असतानाच खासगी बसची पुलाच्या कठड्याला जोरदार धडक; २ जणांचा मृत्यू, २७ जखमी