अमेरिका लवकरच ‘काम फत्ते’ करणार; ट्रम्प यांचे पहिले देशाला संबोधन 
आंतरराष्ट्रीय

अमेरिका लवकरच ‘काम फत्ते’ करणार; ट्रम्प यांचे पहिले देशाला संबोधन

अमेरिका-इस्राएल आणि इराणमधील युद्धाला महिना उलटून गेल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशाला उद्देशून प्रथमच केलेल्या भाषणामध्ये, अमेरिकेच्या सैन्याचे "मुख्य धोरणात्मक उद्दिष्ट पूर्ण होत आले असून" लवकरच हे सैन्य तेथील "काम फत्ते" करेल, असे प्रतिपादन केले.

Swapnil S

वॉशिंग्टन :   अमेरिका-इस्राएल आणि इराणमधील युद्धाला महिना उलटून गेल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशाला उद्देशून प्रथमच केलेल्या भाषणामध्ये, अमेरिकेच्या सैन्याचे "मुख्य धोरणात्मक उद्दिष्ट पूर्ण होत आले असून" लवकरच हे सैन्य तेथील "काम फत्ते" करेल, असे प्रतिपादन केले. बुधवारी रात्री देशाला उद्देशून केलेल्या आपल्या भाषणात त्यांनी या युद्धाचा जोरदार बचाव केला.

एका मोठ्या जनसमुदायासमोर बोलताना त्यांनी अमेरिकन मोहिमेच्या यशाचा पाढा वाचला. वॉशिंग्टनची आतापर्यंतची सर्व उद्दिष्टे साध्य झाली आहेत किंवा त्याहून अधिक यश मिळाले आहे, असा दावा त्यांनी केला. मात्र, तरीही इराणला नजीकच्या काळात हल्ल्यांचा सामना करावा लागेल असे स्पष्ट करताना, येत्या दोन ते तीन आठवड्यांत आपण त्यांच्यावर अत्यंत भीषण प्रहार करणार आहोत, असे ट्रम्प म्हणाले. आम्ही त्यांना पुन्हा अश्मयुगात पाठवू, ते त्याच योग्यतेचे आहेत, असेही ते म्हणाले.

ट्रम्प यांनी आपल्या भाषणात इराणच्या झालेल्या नुकसानीचा पाढा वाचला. त्यांच्या मते, इराणची नौसेना आता अस्तित्वात नाही आणि त्यांची वायुसेना पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. इराणच्या 'इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स' या मुख्य लष्करी कमानला अमेरिकेने गंभीर इजा पोहोचवली आहे. अमेरिकेचे मुख्य लष्करी उद्दिष्ट पूर्ण झाले असून, इराणची अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्र क्षमता निर्णायकपणे नष्ट करण्यात आली आहे, असे ते म्हणाले.

Mumbai Local Mega Block : उद्या मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक; अनेक लोकल रद्द, एक्स्प्रेस गाड्यांनाही फटका

मुंबईत उष्माघाताचा धोका; दुपारी ११ ते २ प्रकल्प कामे बंद ठेवा, नगरसेविकेचे महापालिका आयुक्तांना पत्र

'देव त्यांचं भलं करो'; तनुश्री दत्ताच्या आरोपांवर नाना पाटेकरांचा मुलगा मल्हारने सोडलं मौन

Mumbai : अजय देवगणच्या जुहूतील बंगल्यावर BMC चा हातोडा! अनधिकृत बांधकामावर कारवाई; नेमकं प्रकरण काय?

Delhi Protest : अभिजीत दिपकेंना आज न्यायालयात हजर करणार; AISA च्या नेहा बोरा यांची सुटका