आंतरराष्ट्रीय

...तर १ नोव्हेंबरपासून चीनवर १५५ टक्के टॅरिफ लादणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा

रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवली तर भारतावर आणखी टॅरिफ लादण्याचा इशारा दिल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता चीनलाही टॅरिफवरून इशारा दिला आहे. ट्रम्प यांनी सोमवारी इशारा दिला की, जर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी...

Swapnil S

न्यू यॉर्क : रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवली तर भारतावर आणखी टॅरिफ लादण्याचा इशारा दिल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता चीनलाही टॅरिफवरून इशारा दिला आहे. ट्रम्प यांनी सोमवारी इशारा दिला की, जर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी अमेरिकेबरोबर निष्पक्ष करार केला नाही तर १ नोव्हेंबरपासून चिनी वस्तूंवर १५५ टक्क्यापर्यंत कर लागू केले जाऊ शकतात, असे ट्रम्प यांनी म्हटले. ट्रम्प यांच्या या विधानामुळे जगातील दोन मोठ्या अर्थव्यवस्था असलेल्या देशांत व्यापारावरून पुन्हा तणाव निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांनी मागील काही महिन्यांपासून जगातील अनेक देशांवर मोठ्या प्रमाणात टॅरिफ लादण्याचा धडाका लावला आहे. एवढेच नाही, तर ट्रम्प हे सातत्याने भारत आणि चीनला लक्ष्य करत असल्याचे दिसून येत आहे. एका आठवड्यापूर्वीच ट्रम्प यांनी चीनला लक्ष्य करत चिनी वस्तूंवर १०० टक्के आयात शुल्क (टॅरिफ) लादण्याची घोषणा केली. त्यामुळे चीनला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. यातच आता ट्रम्प यांनी चीनवर पुन्हा एकदा आणखी टॅरिफ लादण्याची धमकी दिली आहे. ट्रम्प यांच्या या नव्या भूमिकेमुळे जगातील दोन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमधील व्यापार तणाव आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण याआधी चीनने ट्रम्प यांच्या व्यापार कराला जशास तसे प्रत्युत्तर दिलेले आहे. आता ट्रम्प यांनी म्हटले आहे की, आम्ही आता चीनवर आणखी १५५ टक्के टॅरिफ लादू. दरम्यान, अमेरिकेने आता चीनवर आणखी टॅरिफ लादले, तर चीनसाठी हे मोठे आर्थिक संकट ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

ट्रम्प यांनी सोमवारी इशारा दिला की, जर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी अमेरिकेबरोबर निष्पक्ष करार केला नाही तर १ नोव्हेंबरपासून चिनी वस्तूंवर १५५ टक्क्यांपर्यंत कर लागू केले जाऊ शकतात. ट्रम्प यांच्या या विधानामुळे जगातील दोन मोठ्या अर्थव्यवस्था असलेल्या देशांत व्यापारावरून तणाव निर्माण होण्याची चिन्हे आहेत. ट्रम्प म्हणाले, मला वाटते की चीन आमचा खूप आदर करतो. ते आम्हाला टॅरिफच्या स्वरूपात भरपूर पैसे देत आहेत. तुम्हाला माहिती आहेच की, ते ५५ टक्के देत आहेत, ते खूप पैसे आहेत. आम्ही करारावर पोहोचलो नाही, तर त्यांना १ नोव्हेंबरपासून १५५ टक्के टॅरिफ भरावा लागू शकतो. पण मला अपेक्षा आहे की आम्ही कदाचित चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत एक अतिशय निष्पक्ष व्यापार करार करू.

ट्रम्प यांनी शुक्रवारी चीनला लक्ष्य करत नव्याने टॅरिफ लादण्याची घोषणा नुकतीच केलेली आहे. १ नोव्हेंबरपासून चीनच्या सर्व वस्तूंवर अतिरिक्त १०० टक्के आयातशुल्क (टॅरिफ) आकारले जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केलेले आहे. तसेच अमेरिकेत निर्माण केलेल्या क्रिटिकल सॉफ्टवेअरवरही कठोर नियंत्रण आणण्याची योजना त्यांनी जाहीर केली. यापुढे असे सॉफ्टवेअर निर्यात करण्यावर बंधने येतील, असेही त्यांनी म्हटले होते.

भारताची रशिया, यूएईकडून तेल खरेदीत मोठी वाढ; होर्मुझ सामुद्रधुनीतील वाहतूक पूर्ववत होण्यापूर्वीचा दिलासा

Mumbai : एचपीव्ही लसीकरणामुळे गर्भाशय कर्करोगावर नियंत्रण; केईएम रुग्णालयात २८२ लाभार्थ्यांना एचपीव्हीची मात्रा

Mumbai Rain : मेघगर्जनेसह पावसाचे जोरदार पुनरागमन! वांद्रे-वरळीसह अनेक भागांत मुसळधार सरी, ऑरेंज अलर्ट जारी

'मुलगा अडथळा ठरतोय'; प्रियकराच्या सांगण्यावरून आईने घेतला दोन वर्षांच्या चिमुकल्याचा जीव

NEET UG 2026 Re-Exam : फ्लश टँकमध्ये मोबाईल लपवून परीक्षेत कॉपीचा प्रयत्न; १८ वर्षीय विद्यार्थ्याला अटक